चिकुर्डे
चिकुर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. चिकुर्डेच्या हद्दीतच पण गावठाणाबाहेर वायव्येला धनगरांचे दैवत विठ्ठल-बीरदेव / विठोबा-बिरोबा यांचे एक मोठे मध्ययुगीन मंदिर आहे. इथला विठोबा मात्र पंढरीच्या विठुरायासारखा वैष्णवरूप धारण करून 'विटेवरी उभा' नाही तर चक्क त्याच्या आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे.या ठिकाणी नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या पाचव्या दिवशी येथे यात्रा भरली जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी गावातील लोक देवाला नैवेद्य दाखवतात.यात्रेच्या तिन्ही दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये ओव्या, धनगरी ढोल व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात्रेच्या शेवट गावचे सरकार सोमराज देशमुख यांच्या वाड्यातुन देवाची पालखी निघते.या पालखी वर भंडारा व खोबरे यांची उधळण केली जाते. अशा प्रकारे गावातील यात्रा शांततेत व भक्तीमय वातावरणात संपन्न होते.
?चिकुर्डे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाळवा |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | रणजित पाटील |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/१० |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
संपादनचिकुर्डे गाव वारणा नदीच्या काठावर वसलेले आहे. वारणेच्या बारमाही पाण्यावर इथली शेती सुफलाम सुजलाम झालेली आहे. शेतीप्रधान लोकजीवन इथले आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनविठोबाच्या मंदिर परिसरातील माळ हा प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या बाजूला लहानसे तळे आहे. मंदिर परिसरात गोरख चिंचेची दोन महावृक्ष आहेत. मंदिराच्या पाठीमागे मोठी वडाची झाडे आहेत. गावाजवळच डोंगरवाडीच्या गावाजवळ एक डोंगर आहे त्या डोंगराला कोटलिंग पर्वत म्हणतात. तिथे काही गुफांचे खोदकाम केलेले आहे. डोंगरावर गोड्या पाण्याची विहीर आहे.