चर्चा:हस्ताक्षरशास्त्र
शीर्षक
संपादनया लेखाचे शीर्षक पुरातनहस्ताक्षरशास्त्र असावे का?
अभय नातू (चर्चा) २३:५२, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
@अभय नातू: नाही सर मी हे पान तयार केलेलं आहे. हे नाव बरोबर आहे तुम्ही जे बोलत आहात कदाचित ते नाव दुसरं असेल. AShiv1212 (चर्चा) ००:००, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
पुरातत्वशास्त्र (Archaeology) हे एक पान आहे या नावाचं. पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत AShiv1212 (चर्चा) ००:०३, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @AShiv1212:
- माझा रोख हस्ताक्षरशास्त्र कि पुरातनहस्ताक्षरशास्त्र याकडे आहे. हस्ताक्षरशास्त्र मध्ये कोणत्याही काळातील हस्ताक्षराचा अभ्यास गृहित आहे. तुम्ही लिहिलेला लेख पुरातन/ऐतिहासिक हस्ताक्षराचा अभ्यास करण्याच्या शास्त्राबद्दल दिसत आहे.
- अभय नातू (चर्चा) ००:०७, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
मी जे माहिती जोडलेलं आहे सेम माहिती संदर्भ मध्ये आहे आणि हे मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये शिकवलं जातं. तुम्ही जे माहिती बोलत आहात ते माहिती त्याच्यामध्ये तशा प्रकारचे बिलकुल नाही. तुमचा गैरसमज व्हायला नको एकदा तुम्ही संदर्भ तपासून पहा. संदर्भ ची लिंक पान नंबर सर्व व्यवस्थित मी जोडलेलं आहे. संदर्भ पाहून तुम्ही कॉपीराईटचा उल्लेख नका करू कारण कॉपीराईटचा चा प्रॉब्लेम नाही.[१] AShiv1212 (चर्चा) ००:१९, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
- भाऊ,
- माझा प्रश्न संदर्भाबद्दल नाही आहे. पुन्हा एकदा -- हा लेख हस्ताक्षरशास्त्राबद्दल आहे कि ऐतिहासिक/पुरातन हस्ताक्षरशास्त्राबद्दल?
- सेम माहिती संदर्भ मध्ये आहे
- ही माहिती थेट येथे घातली आहे का? संदर्भ प्रताधिकारित आहेत का?
- या दोन्ही प्रश्नांची उत्तरे हो असतील तर ही माहिती टाकोटाक बदलून तुमच्या शब्दात घालावी. प्रताधिकारित स्रोत आणि संदर्भांमधून थेट नकल-डकव येथे करता येत नाही.
- अभय नातू (चर्चा) ०३:४७, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)