चर्चा:समर्थ रामदास स्वामी
नमस्ते,
रामदास स्वामींनी समाधी १६८१ की १६८२ ला घेतली ? कॄपया स्पश्ट करा.
विजय काटकर
I think it is 1681. Even Wiki Eng says the same thing. http://en.wikipedia.org/wiki/Samarth_Ramdas
हेरंब एम. १५:१३, ७ जानेवारी २००९ (UTC)
मी टाकलेल्या फोटोपेक्षा दुसरा चांगला फोटो असल्यास जरुर टाकावा.
वि. नरसीकर (चर्चा) ०९:२५, ८ डिसेंबर २००९ (UTC)
पूर्णपणे नवीन पान कसे तयार करायचे ?
लेखातील चित्र हलविले
संपादनअभय नातू यांनी अनिता पाटील या लेखातील चित्र हलविले आहे. लेखात व्यक्तीचे चित्र अपेक्षित आहे, असे नातू यांचे म्हणणे आहे. नातू यांचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. तथापि, हा नियम फक्त अनिता पाटील यांच्या लेखालाच लागू करता येणार नाही. तो इतरत्रही लावावा लागेल. याच नियमानुसार मी समर्थ रामदासांच्या लेखातील चित्र हलविले आहे. रामदासाचे म्हणून जे चित्र लेखात टाकले गेले आहे, ते रामदासांचेच आहे, याला काहीही पुरावा नाही. त्यामुळे ते रामदासांचे म्हणून टाकता येणार नाही.
आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, रामदास संन्यासी होते. संन्याशाच्या गळ्यात जानवे नसते. रामदासांच्या या चित्रामध्ये मात्र त्यांच्या गळ्यात जानवे चितारलेले आहे. त्यामुळे हे चित्र रामदासांचे आहे, असे गृहीत धरता येत नाही. बनावट चित्र लेखासोबत असू नये, म्हणून मी ते हलविले आहे.
संन्यास घेतल्यानंतर पूर्वायुष्याची कोणतीही ओळख शिल्लक राहू नये, यासाठी बाह्य चिन्हांचा त्याग करण्याचा नियम आहे. म्हणून जानवे, कडदोरा वगैरे चिन्हे काढली जातात.
- brurthari (चर्चा) १६:१५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
रेखाचित्रे काढा
संपादनसमर्थ रामदास स्वामी या लेखात रामदासांच्या चरित्रातील प्रसंग दाखविणारी काही रेखाचित्रे दिली आहेत. विकी नियमानुसार, अशी रेखाटने देता येत नाहीत. विकीपीडिया हे प्रचाराचे साधन होत आहे. प्रचालकांना विनंती आहे की, ही नियमबाह्य कामे रोखावीत. अन्यथा आम्ही संपादन करून ती काढून टाकू.
- brurthari (चर्चा) १६:३८, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
ब्राह्मणांना सोयीची विचारधाराच विकिपीडियावर राहील, असे धोरण तुम्ही ठरवून टाकले आहे
संपादनश्री अभिजित साठे,
तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. अनिता पाटील आणि समर्थ रामदास स्वामी यांची होऊ शकत नाही. खरे म्हणजे, जगातील कोणत्याही दोन व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. अभिजित साठे आणि भृर्तहरी यांचीही तुलना होऊ शकत नाही.
हीच बाब विचारधारांचीही आहे. दोन विचार धारांची तुलना होऊ शकत नाही. पण ते तुम्हाला आणि तुमच्या चेल्या चपाट्यांना मान्य होत नाही, असे दिसते. अनिता पाटील ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात, ती विचारधारा तुम्हाला विकिपीडियावर दिसायलाच नको आहे. ब्राह्मणांना सोयीची विचारधाराच विकिपीडियावर राहील, असे धोरण तुम्ही ठरवून टाकले आहे. त्यामुळेच अनिता पाटील या पानाला विरोध होत आहे, या पानाला वारंवार टॅग लावले जात आहेत.
अनिता पाटील हे पान ब्राह्मणांना खटकत असेल, तर आम्हालासुद्धा समर्थ रामदास स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरची पाने खटकतात. अनिता पाटील यांचे पान काढले जाणार असेल, तर ही पानेही काढली जायला हवीत. काढून टाकणयाजोगी इतरही अनेक पाने आहेत. पण त्यांची यादी मी नंतर देईन.
तुम्ही जातीयवादी भूमिका घेणार असला, तर आरोप हे होणारच. तुमची भूमिका निरपेक्ष आहे, हे कृतीतून दिसू द्या.
- अत्यंत महत्त्वाचे :
श्री अभिजित साठे, रामदासांच्या लेखातील बदल परतवण्यासाठी तुम्ही जी तत्परता दाखविली ती अनिता पाटील या लेखातील बदल परतवण्यासाठी दाखविली असती, तर बरे झाले झाले असते. तुमची भूमिका जातीय नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले असते. तथापि, तशी तत्परता तुम्ही दाखविली नाही. याचाच अर्थ अनिता पाटील यांच्या विचारधारेच्या बाबतीत तुमच्या मनात अढी आहे. म्हणून मी अनिता पाटील या लेखातील बदल परतवत आहे.
- brurthari (चर्चा) १७:२२, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)
चर्चा
संपादननमस्कार,
चर्चा/वाद करताना लक्षात ठेवावे --
१. निरर्थक जातीयवादाचा मुद्दा करू नये नये. प्रत्येकास असेच वाटते की माझ्यावर/माझ्या समाजावर सारखाच अन्याय होत असतो. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विकिपीडिया हा मंच नव्हे.
२. सदस्यांसाठीचे संदेश त्यांच्या चर्चा पानावर लावावे. कारण नसताना लेखांच्या चर्चा पानांवर लावू नये.
३. विकिपीडिया हा माहितीसंग्रह आहे. वैचारिक हाणामारी करण्याची जागा नव्हे.
४. वाद विकोपाला जात असल्यास दोन-तीन दिवस विकिसुट्टी घेउन मग पुन्हा चर्चेस हात घालावा. याने विनाकारण निर्माण होणारी कटुता कमी होण्यास मदत होते.
वरील संदेश फक्त येथे चर्चा करणाऱ्यांसाठीच नसून सगळ्यांसाठी आहे.
अभय नातू यांच्यावर त्वरीत कारवाई करा
संपादनश्री. अभय नातू हे वेगवेगळ्या नावांचे मुखवटे धारण करून आरएसएसप्रणीत खेळ मराठी विकिपीडियावर खेळत आहेत. पुणेरीपुणेकर या नावाने कारवाया करणारी व्यक्ती अभय नातूच आहे, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. तसेच नातू हे संघाचे हस्तक आहेत, हे सांगायलाही कोणा तज्ज्ञाची गरज नाही. त्यामुळे वाद/चर्चा करताना अमुक नियम पाळा आणि तमुक नियम पाळा हे सांगण्याचा अधिकारच नातू यांना नाही.
माझी विकिपीडियाच्या प्रचालक/प्रबंधकांना विनंती आहे की, श्री. अभय नातू यांना त्वरीत समज देण्यात यावी. मराठी विकिपीडिया ब्राह्मणांची आणि आरएसएसची बटिक बनली आहे, असे वारंवार दिसून येत आहे. नातू यांच्यावर कारवाई करून प्रचालक/प्रबंधकांनी जातीनिरपेक्ष धोरण दाखवून द्यावे. अन्यथा मराठी विकीवरील लेखांची विश्वासार्हता पूर्णत: संपेल. - brurthari (चर्चा) १६:०४, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
- कोणत्याही पुराव्याविना केलेले पांचट आरोप कोणीही गंभीरपणे घेणार नाही अशी माझी अपेक्षा आहे, तरीही मी तुम्हाला विचारतो पुणेरीपुणेकर या नावाने कारवाया करणारी व्यक्ती अभय नातूच आहे, तसेच नातू हे संघाचे हस्तक आहेत हे निष्कर्ष आपण कोणत्या आधारावर काढले? खाजगी आयुष्यात अभय संघाचा सदस्य आहे की नाही ह्याचा त्याच्या येथील कामाशी काहीही संबंध नाही. मी अभयचे वकीलपत्र घेतलेले नाही पण एक जबाबदार विकिपीडियन म्हणून विचारावेसे वाटते की आपणास येथे नक्की काय साधायचे आहे? लेखांत भर घालणे आपल्याच्याने होणे नाही. उगाच आठवड्यातून एखाद्या वेळेला येथे यायचे, ५-१० पानांवर साचे लावायचे व निष्कारण वाद निर्माण करायचा हाच आपला उद्देश आहे काय? आपल्याला विकिपीडियाचा विकास करायचा नसेल तर अकारण तंटे उभारून किमान नुकसान तरी करू नका. - अभिजीत साठे (चर्चा) १९:४६, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
अभिजित साठे, तुमची भूमिका आणि कृती भेदभाव करणारी आहे
संपादनश्री. अभिजित साठे,
तुम्ही अभय नातू यांच्यावर काहीही कारवाई करणार नाही आहात, हे मला आधीच माहिती होते. तुमची भूमिका नि:पक्ष नाही, हे तुमच्या वक्तव्यांतूनच स्पष्ट होते. श्री. नातू यांना मी संघाचा हस्तक कशाच्या आधारे ठरविले, असा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे. माझा तुम्हाला प्रतिप्रश्न असा आहे की, तुम्ही तरी नातू यांना क्लिनचीट कशाच्या आधारे देत आहात. माझे आरोप तुम्हाला पांचट वाटतात. त्याचप्रमाणे तुमची क्लिनचीटही आम्हाला पांचट आणि पुचाट वाटते. ‘मी अभयचे वकीलपत्र घेतलेले नाही,' असे म्हणत तुम्ही त्यांची छान वकिली केली आहे.
अनिता पाटील आणि रामदास यांची तुलना होऊ शकत नाही, असे तुम्ही या आधी म्हटले आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. विकीवरची कोणतीही दोन पाने समान महत्त्वाची आहेत. समर्थ रामदास स्वामी जातीने ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांच्या पानाला विशेष महत्त्व आणि अनिता पाटील यांच्या आडनावात पाटील आहे, म्हणून त्याला कमी महत्त्व ही तुमची भूमिका भेदभाव करणारी आहे. कमालीची आक्षेपार्ह आहे.
तुमचा हा भेदभाव तुमच्या कृतीमधूनही दिसतो. अनिता पाटील या पानाला लावलेले साच्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करता, समर्थ रामदास स्वामी या पानाला लावलेले साचे मात्र तत्परतेने काढता. मी रामदासांच्या चित्राला आक्षेप घेतलेला आहे, तो तुम्ही आज तातडीने काढला. पण त्या आधी अभय नातू यांनी अनिता पाटील या पानावरील चित्राला लावलेला साचा तुम्ही अजूनही काढलेला नाही. विकिपीडियावरील ब्राह्मण टोळीने कारवाया करीत आहेत आणि तुम्ही या टोळीच्या म्होरक्यासारखे वागत आहात. हे अयोग्य आहे.
- brurthari (चर्चा) १७:५५, १ नोव्हें. २०१२ (IST)
बिनबुडाची टीका
संपादनब्रुतहारी,
माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे आणि माझी बदनामी करणे त्वरित् थांबवा.
तसेच विकिपिडीयावर विनाकारण जातीयवाद पसरवणे लगेचच बंद करा.
अभय नातू (चर्चा) २०:१७, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
तुलना
संपादन- अनिता पाटील आणि रामदास यांची तुलना होऊ शकत नाही, असे तुम्ही या आधी म्हटले आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. विकीवरची कोणतीही दोन पाने समान महत्त्वाची आहेत. समर्थ रामदास स्वामी जातीने ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांच्या पानाला विशेष महत्त्व आणि अनिता पाटील यांच्या आडनावात पाटील आहे, म्हणून त्याला कमी महत्त्व ही तुमची भूमिका भेदभाव करणारी आहे. कमालीची आक्षेपार्ह आहे.
१. विकिपीडियावरील दोन पाने समान महत्वाची असतीलच असे नाही. आपण येथे काम केल्यावर लक्षात येईल की मुखपृष्ठ, अनेक क्लिष्ट साचे, वर्गवारी इ. पाने इतर पानांपेक्षा अधिक महत्वाची आहेत.
२. अनिता पाटील आणि रामदास या व्यक्तींची तुलना जातीवरुन तुम्ही केलीत (वर उतारा उद्धृत केला आहे). तुलना करा त्यांच्या लेखनबाहुल्याची, लेखनप्रभावाची आणि लेखनविषयांची. असे केले असता लक्षात येईल की रामदासांच्या कृती पाटीलबाईंच्या लेखनापेक्षा अनेक स्तरावर उजव्या ठरतात. यात रामदास ब्राह्मण/संन्यासी असल्याचा संबंध नाही.
३. नावात पाटील असल्यामुळे त्याला कमी महत्व ही अभिजीतची भूमिका आहे हा चमत्कारिक निष्कर्ष तुम्ही कसा काढलात हे मला कळलेले नाही. येथे दुसऱ्याच्या तोंडात आपले शब्द घालून त्यावरुन आगपाखड करण्याची तुमचीच भूमिका स्पष्ट होते (पहा - स्ट्रॉमॅन)
कारवाया थांबवा आरोप आपोआप थांबतील
संपादनश्री. अभय नातू, माझी आपल्याला विनंती आहे की, आपण विकीपीडियावर जातीयवादी कारवाया थांबवा. तुम्ही जातीवादी कारवाया थांबविल्यास कोणाला तुमच्यावर जातीयवादाचे आरोप करण्याची संधीच मिळणार नाही. - brurthari (चर्चा) १७:५३, १ नोव्हें. २०१२ (IST)
जातीयवादी?
संपादनआपण माझ्या कोणत्या कारवायांना जातीयवादी लेबल लावीत आहात? जातपात तुम्ही (आणि इतर निवडक मंडळींनी) पहिल्यांदा उच्चारलीत. तुमची संपादने पाहता त्यात जात-पात काढून त्यावरुन निष्कारण वाद निर्माण करणे याचे बाहुल्य आहे.
तुम्हास आधी सुचवल्याप्रमाणे लेखांच्या चर्चापानांवर सदस्यांसाठीचे संदेश लावू नयेत ही पुन्हा एकदा विनंती.
कृपया माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नये.
धन्यवाद.
होय तुम्ही जातीयवादीच
संपादनश्री. अभय नातू, होय तुम्ही जातीयवादी आणि ब्राह्मणवादी आहात. अनिता पाटील यांच्या फोटोला आक्षेप घेतला, तसाच तुम्ही रामदासाच्या फोटोला का घेतला नाही. रामदासाचा फोटोसुद्धा चुकीचाच आहे ना? अनिता पाटील यांचा ब्लॉग ब्राह्मणवादावर प्रहार करतो, म्हणून त्याच्या विषयीचे पान तुम्हाला विकीवर नको आहे. त्यासाठीच बनावट नावांनी तुम्ही या पानाला आक्षेप घेत आहात.
रामदासांचे कार्य अनिता पाटील यांच्यापेक्षा मोठे आहे, हे तुमचे व्यक्तिगत मत आहे. आम्हाला रामदासापेक्षा अनिता पाटील यांचे कार्य मोठे वाटते. लोकशाही देशात असे मतभेद होणारच. - brurthari (चर्चा) १८:००, ३ नोव्हें. २०१२ (IST)
बिना जानव्याचे रामदास शोधा
संपादनसमर्थ रामदास स्वामी या लेखासोबत दिलेले चित्र रामदासाचे असू शकत नाही, हे मी वर समप्रमाण दाखवून दिले आहे. तरीही वारंवार जानवेधारी खोटे चित्र येथे टाकले जात आहे. असे चित्र पुन्हा कोणीही टाकू नये. बिना जानव्याचे रामदास शोधावेत. मी या आधी केलेले विवरण याच चर्चेमध्ये वर आहे. कृपया सर्वांनी पाहून घ्यावे. संन्याशाला जानवे घालण्याचा अधिकार नाही. तरीही संन्याशी रामदासांच्या गळ्यात जानवे दाखविले जात आहे. हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे.
सोबतचे छायाचित्र कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचे आहे. परमाचार्यांच्या गळ्यात जानवे नाही, हे स्पष्टपणे दिसावे यासाठी मुद्दाम उघडे छायाचित्र येथे देत आहे. हिंदूमध्ये १२ फेब्रुवारी २००७ रोजी हे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. भारतातील चारही प्रमुख पीठाचे शंकराचार्य जन्माने ब्राह्मण असावे लागतात, हे सर्वश्रुत आहेच. तरीही कोणत्याच शंकराचार्यांच्या गळ्यात ते नसते. या पाश्र्वभूमीवर जानवेधारी संन्यासी रामदास ही कल्पनाच चुकीची आहे, हे सर्वांनी लक्षात घेऊन. रामदासांचे बिना जानव्याचे चित्र तयार करून, ते या लेखासोबत टाकावे. - brurthari (चर्चा) २०:३२, ३ नोव्हें. २०१२ (IST)
- एकदंडी सन्यासी यज्ञोपवित(जानवे) आणि शिखा यांचा त्याग करतात पण त्रिदंडी सन्यासी त्या गोष्टी तशाच ठेवतात. शंकराचार्य एकदंडी सन्यासी होते. रामानुजाचार्यांच्या पंथातील सन्यासी त्रिदंडी असतात. खाप्रे.ऑर्ग येथे विविध सन्यासांची माहिती आहे. अनुदिनम य़ेथेही त्रिदंडी सन्यास्यांची माहिती आणि यज्ञोपवितासह चित्रे आहेत. म्हणजे सन्यासी जानवे घालतच नाहीत असे नाही . आता रामदास कुठल्या प्रकारात मोडतात हे शोधले पाहिजे. - पुणेरीपुणेकर (चर्चा) २१:४९, ३ नोव्हेंबर २०१२ (IST)
आता तरी सुधरा निद्रिस्तांनो!!!
संपादनसर्वांनाच हात जोडू एक कळकळीची विनंती आहे...रात्र वै-याची आहे...आधीच अपल्या देशावर अनेक बाजूंनी आक्रमक तुटून पडत आहेत...समर्थांच्या काळात होते काहीसे तसेच वातावरण आज आहे... त्याही काळी एतद्देियांमध्ये अशीच दुफ़ळी माजविली जात होती...परतु तीस सांधणारा संन्यस्त योद्धा छत्रपती राजा त्या काळात होता! त्यास पूरक कार्य करणारा योद्धा संन्यासीही त्याकाळीच होता! आज हे दोन्हीही नाहीत...जर काही असेल तर त्यांच्या विचारांचा अनमोल ठेवा...तो वाचा...तोआभ्यासा आणि इतिहासात आपण केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका... समर्थ जानवे धारण करत का नाही, कोणत्या साली गेले, याचा निरस काथ्याकुट करत बसण्यापेक्षा ते कसे आणि किती जगल तसेच, त्यांनी विचार कोणते धारण केले, याचा अभ्या करा! तरच तराल! नाहीतर गनिमांच्या हातून हाकनाक मराल! आज एक एक देश पडतो आहे. मूलतत्त्ववादी त्या त्या देशाचा ताबा घेत आहेत..भरतातही तेच करण्याचे उघड उघड बोलत आहेत...अशा वेळी एक रहा! शत्रूसाठी ब्राह्मण आणि मराठा एकच आहेत...मह तुम्ही का २ रहाता आहात? क्षात्रतेज हरपू नका...ब्राह्मतेज गमवू नका...नाहीतर हा देश पुन्हा गुलामगिरीत जाईल...आणि आता कोणी रामदास वा शिवाजी उपजेल असे वाटत नाही...(सूज्ञांना आवाहन: मुद्दामहून चिथावीखोर वितंडवाद घालणार्यांना प्रत्युत्तर देण्यात ऊर्जा दवडू नका...हत्ती मार्गावरील श्वानांकडे ढुंकुनही पहात नसतो) -रामदासी (चर्चा ०९:४९, १२ डिसेंबर २०१२ (IST)
पुन्हा भृतहरी
संपादनभृतहरी, आपण ह्या लेखात लावलेल्या अनावश्यक पाट्या मी पुन्हा काढून टाकत आहे. कृपया काही तरी constructive करायचे असेल तरच संपादने करा ही कळकळीची विनंति. आपला - अभिजीत साठे (चर्चा) १८:११, २२ डिसेंबर २०१२ (IST)
उन्मन
संपादनलेखातील
"एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले - 'महाराज, माझ्या मनाचे उन्मन कसे होईल ?समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले - ' मनाचे ऐकू नकोस म्हणजे तुझ्या मनाचे उन्मन होईल.'धोंडीबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला.'आपण आता घरी जावे' असे त्याच्या मनात आले पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरविले. मग मनात आले, रानात जावे.पण मनाचे ऐकायचे नसल्यामुळे रानातही जाता येईना. धोंडीबाच्या लक्षात आले की, मनात परस्परविरोधी विचार येत राहतात. अशा वेळी काय करावे? एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये.मग मनाचे ऐकायचे नाही म्हणजे काय?धोंडीबाच्या लक्षात आले की, मनात सतत विचार येत राहतात. ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडीबाने 'श्रीराम जयराम जय जय राम' हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून तो ७२ तास जप करीत राहिला. ७२ तासांनंतर त्याच्या मनाचे उन्मन झाले.अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडीबाने ते ऐकले.आणि त्याच्या मनाचे उन्मन झाले. अध्यात्मात श्रद्धा असली की लगेच काम होते."
या परिच्छेदात ’उन्मन’ हा शब्द अनेकदा आला आहे. त्या शब्दाच्या वापराबद्दल शंका आल्याने संस्कृत शब्दकोश धुंडाळला. संस्कृतात उन्मनस् किंवा उन्मस्क म्हणजे क्षुब्ध; अस्वस्थ; खिन्न; उत्सुक, विमनस्, विमनस्क, किंवा मानी. प्रस्तुत लेखात यांतला कुठलाच अर्थ लागू पडत नसल्याने लेखात ’मनाचे उन्मन’ऐवजी ’मनाची उन्मनी अवस्था’ अशी दुरुस्ती केली.
दुरुस्त्या करून झाल्यावर मराठी शब्दकोश पाहिला. त्यात ’उन्मन’ या शब्दाचा मराठी अर्थ ’विरक्त’ असा दिसला. त्याप्रमाणे पाहिले तर, मनाचे उन्मन कसे होईल ऐवजी मन उन्मन कसे होईल हे वाक्य बरोबर ठरले असते. संस्कृत शब्दकोशात उन्मनीचा अर्थ ईश्वरस्वरूपी मिळून जाणे असा दिला आहे, तर मराठी शब्दकोशातील अर्थ अध्यात्म्यातील एक वरची अवस्था असा आहे. ....J (चर्चा) २१:२०, २२ डिसेंबर २०१२ (IST)
Copyvio
संपादन[१] शिवाजी महाराजांची सनद @अभय नातू: सदर लेखावरील चर्चा वाचली. पण या सर्व प्रक्रियेत लेखाचे काम मात्र मागे पडलेले दिसते आहे. या लेखाला https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 नुसार नकल डकव आहे. मी या लेखावर काम करायला सुरुवात करीत आहे. --आर्या जोशी (चर्चा) १२:१२, २४ फेब्रुवारी २०२० (IST)
- Another fake copyright violation claim can be seen here. A candidate for RFA has no idea what is copyright violation and what is not! This text was taken from Wikipedia to the Facebook post and that can be clearly seen by page histories. I still don't know why is this fake copyright claims will end. Please stop! --Tiven2240 (चर्चा) २०:१३, २५ फेब्रुवारी २०२० (IST)