श्रीनिवास हेमाडे (चर्चा) २१:२७, १८ ऑगस्ट २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे अभय नातू यांनी मी तयार केलेले पान पाहिले. त्याबद्दल मी आभारी आहे. पण मला बदल समजले नाहीत. कृपया सांगा.Reply

नमस्कार श्रीनिवास,
मराठी विकिपीडियावरील लेख/माहिती ही जाहिरातसदृश नसता विश्वकोशीय असावी अशी अपेक्षा आहे म्हणून मी येथे बदल करण्याची विनंती लावली. सदस्य mahitgar यांनी काही बदल केले आहेत ते नजरेखालून घालावेत म्हणजे आपल्या लक्षात येईल.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) ०५:०७, १९ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

उज्ज्वल या शब्दात दोन ज येत्तात, तर प्रज्वल या शब्दात एकच. त्यामुळे संस्थेचे ब्रीदवाक्य लिहिताना काही चूक झाली आहे का ते पहावे.... (चर्चा) ००:४७, २० ऑगस्ट २०१५ (IST)Reply

संदर्भ पडताळणीची विनंती संपादन

गांधी जयंतीनिमित्त ०२ ऑक्टोबर १९५९ रोजी पेटीट विद्यालयात श्रद्धांजली सभा

प्रथमदर्शनी दुजोऱ्याची गरज वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३९, ५ जानेवारी २०१६ (IST)Reply

संदर्भ दिलेल्या लेखात लेखिका कु. लेले यांनी "गांधीजयंतीनिमित्त सभा" असे म्हंटलेले आहे. वाक्यातील "श्रद्धांजली" हा मी भर घातलेला अधिकचा शब्द आहे. तरीही मी नगरपालिकेत तपास करून येईन. दुजोरा मिळतो का ते पाहतो.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १४:२१, ६ जानेवारी २०१६ (IST)Reply


प्रतिसादासाठी आभारी आहे. मी स्थापना विषयक माहितीचे पुन्हा एकदा वाचन केले, आपला उपरोक्त खुलासा पुरेसा वाटातो आहे. लेख ससंदर्भ आणि माहितीपूर्ण बनत आला आहे, थोडी संपादकीय कात्री वापरु इच्छितो पण तत्पुर्वी या लेखात संगमनेर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपादीत केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दलचा विभागही कदाचित जोडण्यास वाव असावा असे वाटते, त्या नंतर मी माझी संपादकीय कात्री जराशी चालवेन. आपल्या योगदानामुळे मराठी विकिपीडियावर एका चांगल्या लेखाची भर पडते आहे आपले अभिनंदन आणि आभार.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५३, ६ जानेवारी २०१६ (IST)Reply

अगदी निश्चितपणे संपादकीय कात्री वापराच. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलचा विभाग जोडणार आहेच. माहिती मिळवीत आहे. मला थोडी मदत हवी आहे ती संचिका त्या त्या उल्लेखांसमोर कशी आणावयाची याबाबत. प्रत्येक इमारतीच्या उद्घाटनाची माहिती मी लवकरच देईन. त्या समोर संचिका येणे आवश्यक आहे. म्हणजे विज्ञान इमारतीसमोर त्याची माहिती व फोटो. कृपया, संचिका त्या समोर लावाव्यात.

दुसरे असे की, काही दुर्मिळ जुने फोटो आहेत, पण त्यांचे फोटोग्राफर नाहीत, म्हणजे दिवंगत किंवा बेपत्ता ! उदाहरणार्थ शंकरराव गंगाधर जोशी यांचा एकुलता एक फोटो. हा जुना म्हणजे बहुधा १९५० सालातला असावा. असे बरेच फोटो आहेत, याबाबत काय करावे ते सांगावे. ही विनंती.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे

"संगमनेर महाविद्यालय" पानाकडे परत चला.