चर्चा:शिरंबे
आशयाची वारंवारता टाळावी
संपादनलिखाणात एकाच गोष्ट अनेकदा लिहिल्या जात आहे. हे अनावधानाने पण होवू शकते.
उदारणार्थ आपण लिहिलेल्या शिरंबे ह्या लेखात " ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे" हे वाक्य वरवर लिहिल्या गेले आहे (१३ ते १५ दा ). विश्वकोशिय लिखाणात अश्या आशयाची वारंवारता टाळण्यास हवी.
सदर लेखात दुरुस्ती करून जवळील मोठे गाव आणि गावाचे नाव द्यावे ज्या मागे त्या सुविधा तिथे उपलब्ध असतील असे अभिप्रेत असते. त्या गावाचा लेख उपलब्ध असल्यास त्याचे नावाला दुवा द्यावा. - तात्या (चर्चा) ०९:५२, ८ मे २०१६ (IST)
हे गावांचे प्राथमिक अवस्थेतले लेख आहेत. यथावकाश सुधारणा जरूर होतील. आपल्या सुचानाचे स्वागत आहे. ---सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:१०, ८ मे २०१६ (IST)
मराठीतील आकडे लिहिण्याचे संकेत
संपादन१. शून्य ते दहा हे अंक अक्षरी लिहितात.
२. ११ ते २० हे अक्षरी किंवा आकड्यात लिहितात.
३. वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ, शंभर, हजार, लाख, कोटी...परार्ध हे अक्षरीच लिहावेत.
४. उरलेले २९, ६९, ८७, ११२, ३४,५७८ असले आकडे अंकीच लिहावेत.
५. टेलिफोन नंबर, पिन कोड, सेन्सस इंडेक्स नंबर वगैरे अंकीच लिहावेत.
६ गणिताच्या पुस्तकात किंवा अंकलिपीतल्या पाढ्यांत आकडेच लिहावेत.
६. थोडक्यात, वाचायला सोपे वाटेल असेच लिहावे.
हे संकेत पाळले गेल्यास लेख अधिक आकर्षक होईल. सुरुवातीच्या काही लेखांमध्ये या सुधारणा करायचा मी प्रयत्न केला आहे, पण पुढेपुढे असे करणे सोडून दिले.... ज (चर्चा) १४:५४, ८ मे २०१६ (IST)