चर्चा:वसंतसंपात
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by प्रथमेश ताम्हाणे
>वृषभ तारकासमूहातून मेष तारकासमूहामध्ये प्रवेश केला, इ.स.पू. ६८ साली मीन मध्ये प्रवेश केला, इ.स. २५९७ मध्ये कुंभ मध्ये प्रवेश करेल आणि इ.स. ४३१२ साली मकर ...<
मेष, वृषभ, मकर, कुंभ, मीन आदी तारकासमूहांना साधारणपणे रास किंवा राशी म्हणतात, लेखात आवर्जून तारकासमूह हा शव्द का वापरला आहे?...ज (चर्चा) २२:२१, १२ मे २०१६ (IST)
- ही माहिती मला या पानाच्या इंग्रजी विकिपीडियावरून मिळाली. तिथे Zodiac च्या ऐवजी Modern constellations असा शब्दप्रयोग आहे. या राशी त्यांच्याकडे पण आहेत. मला वाटतं, कदाचित आधुनिक तारकासमूहांची रचना करताना पुरातन राशींच्या खगोलावरील आकारामध्ये काही बदल झाले/केले असतील तर ही वर्षे जुन्या राशींच्या तुलनेत वेगळी असतील. हे गणित आधुनिक तारकासमुहांसाठीचे आहे त्यामुळे... प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:४८, १३ मे २०१६ (IST)