सूर्य क्रांतिवृत्तावर दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये जाताना विषुववृत्ताला संपात बिंदूमध्ये जेव्हा छेदतो, त्या घटनेला वसंतसंपात म्हणतात आणि त्या संपात बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हणतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. तो दर २६ हजार वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे जसा जसा पृथ्वीचा अक्ष फिरतो, तसा तसा वसंतसंपात बिंदू पश्चिमेकडे सरकत जातो. प्रत्येक वर्षी तो ०.०१४ अंशांनी (५०.४ विकला) सरकतो.[] ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार वसंतसंपात दर वर्षी १९ ते २१ मार्च यापैकी एका दिवशी येतो. भारत शासनाची कालगणना ज्या घटनांवर आधारित आहे (वसंतसंपात, दक्षिणायन, शरदसंपात व उत्तरायण) यापैकी वसंतसंपात हा एक महत्त्वाचा घटक आहे.[][]

वसंतसंपाताला इंग्रजीमध्ये मार्च इक्विनॉक्स (March equinox), नॉर्थवर्ड इक्विनॉक्स (Northward equinox) किंवा उत्तर गोलार्धामध्ये व्हर्नल इक्विनॉक्स (vernal equinox) म्हणून संबोधले जाते.

संदर्भ

संपादन
  1. ^ ठाकूर, अ. ना. "सायन व निरयन पंचांगे". मराठी विश्वकोश. खंड ९. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.
  2. ^ खडपेकर, रवींद्र द. "राष्ट्रीय वर्षगणना". 2009-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-12 रोजी पाहिले.
  3. ^ खडपेकर, रवींद्र द. "कालगणना".