चर्चा:रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द

एका कार्यशालेच्या माध्यमातुन या लेखाचे संपादन करण्यासाठी मला खालील शिक्षकांनी सहकार्य केले, १.श्रीम. विद्या, श्रीम. सुवर्णा, श्री. आशिष, श्री. किसन, श्री. निखिल, श्री. गणेश, श्री. नागार्जुन, श्रीम. रेखा, श्री. रफिख

वरील संदेश सदस्य:Spkhalapur यांनी लिहिला

काढून टाकावे

संपादन

बोरगाव खुर्द हे गावाचे नाव आहे असे दिसते आहे. शाळेला काही वेगळे नाव नसावे. लेखातली माहिती हा लेख विकिपीडियावर ठेवावा अशा योग्यतेची नाही. तस्मात्‌ हे पान काढून टाकावे.--J १७:१३, ९ मार्च २०११ (UTC)

पान ठेवावे

संपादन
क्षमा असावी माझे मत हा लेख ठेवावा असे आहे. लेख शीर्षकातील त्रूटी मी दूर केली आहे.नगरपालिका आणि जिल्हापरिषद शाळांची नावे अशीच असतात काही ठिकाणी चक्क केवळ शाळा क्रमांकही असतात.शाळेचे नावकसे आहे हा तरी लेख न ठेवण्यामागचा मुद्दा निश्चित होऊ शकत नाही.
शाळांबद्दल लेख असावेत का ? शाळांबद्दल किंवा कोणत्याही विषयाबद्दल लेख असुनयेत असा सरसकट नियम म्हणून करण्याचे कारण नाही.लेख निर्माता/ती विश्वकोशीय स्वरूपातील किमान दोनपरिच्छेदभर माहिती पुरवू शकतात का हा कळीचा प्रश्न असतो.पण या लेखात माहिती बर्‍यापैकी विश्वकोशीय ठरते.त्यांच्या लेखनात विश्वकोशीय लेखन शैलीस धरून नसल्याची काहिशा वर्णनात्मक शैलीचा प्रभाव असण्याची त्रुटी होती ती मी बर्‍यापैकी दुर केली असे वाटते. लेखाचा लेखनाचा उद्देश निव्वळ माहिती नमुदकरण्याचा स्पष्टपणे दिसतो,कुठेही जाहिरातबाजीचा उद्देश नाही.
ग्रामीण भागातून येणार्‍यामाहितीत संदर्भांचा अभावही एक त्रूटी उरते पण आपण संदर्भ का मागतो माहितीच्या विश्वासार्हतेकरिता. या लेखातील माहितीची निर्मिती कशीकेली गेली तो मार्गही प्रथमदर्शनी विश्वासार्हता निर्माण करणारा आहे. शेवटचा आक्षेप कोणत्याही व्यक्तीने स्वतःबद्दलची किंवा संस्थेबद्दलची माहिती लिहवून घेऊ नये असा राहतो,पण इथे जाहिरातीकरिता माहिती लिहवून घेण्याचा प्रयत्न नाही अती स्वस्तुतीचा दोषही नाही,तर कार्यशाळेच्या माध्यमातून लेखन झालेल असल्यामुळे हा मुद्दा माफ करावा असे माझे मत आहे.
शिवाय संदर्भांच्या बाबतीत ग्रामीण भागातून येणार्‍या माहितीबद्दल मराठी विकिपीडियाने बर्‍यापैकी फ्लेक्झबिलिटी ठेवावयास हवी नवे मार्ग आणि निकषांचा शोध घ्यावयास हवा.सरते शेवटी आम्हा शहरीलोकांच्या मुलांनी इंग्रजी शिक्षाणाची कास धरली आहे.मराठी आणि पर्यायाने मराठी विकिपीडिया बोरगाव खुर्द सारख्या शाळातूनच जगणार आहे त्यांना त्यांचा विकिपीडिया घडवण्याकरिता पुरेशी मोकळीक देऊया असे सुचवाववेसे वाटते. शिवाय उल्लेखनीयता साचाही काढता आलातर पहावे असे वाटते.मराठी विकिपीडियावर लेखनकरवून घेण्याच्या प्रामाणिक शालेय प्रयत्न हतोत्साहीत होऊ नयेत असे वाटते. माहितगार १९:३३, ९ मार्च २०११ (UTC)

साचेबदल

संपादन
लेखाचा लेखनाचा उद्देश निव्वळ माहिती नमुदकरण्याचा स्पष्टपणे दिसतो,कुठेही जाहिरातबाजीचा उद्देश नाही.
मराठी आणि पर्यायाने मराठी विकिपीडिया बोरगाव खुर्द सारख्या शाळातूनच जगणार आहे त्यांना त्यांचा विकिपीडिया घडवण्याकरिता पुरेशी मोकळीक देऊया असे सुचवाववेसे वाटते

  - समर्थन. अर्थात, याचा अर्थ कोणताही मजकूर खपवून घ्यावा असे नाही. अशा लेखनाचे येथील अनुभवी संपादकांनी परीक्षण करुन योग्य ते बदल करावे. त्याच बरोबर मूळ लेखकांनाही विकिपीडियावरील लेखनशैली, लेखांची ठेवण, इ. बद्दल माहिती द्यावी.

प्रस्तुत लेखातील {{उल्लेखनीयता}} काढून {{बदल}} साचा घालावा. लेखातील अनुल्लेखनीय वाक्ये काढावीत किंवा त्यात बदल करुन त्यांतील (शाळा)स्तुतीपर रोख बदलावा.

अभय नातू २०:१२, ९ मार्च २०११ (UTC)

हा एक प्रयत्न

संपादन

धन्यवाद, मी विकीपिडीया मराठीचा आभारी आहे या लेखावर चर्चा करुन आवश्यक बदल केल्याबद्दल. हा लेख विकीपिडीयावर टाकण्या मागचे कारण थोडे स्पष्ट करु इच्छीतो. आम्ही डाँ नागार्जुन व मी, Gnowledge Lab, होमी भाभा ‌वि‌ज्ञान शिक्षण केंद्र येथुन बोरगाव खुर्द व खालापुर तालुक्यातील काही शाळा येथे मुक्त साँफ्टवेअर वापरुन विद्यार्थी व शिक्षक याना शिकवण्याचे प्रयत्न करत आहोत ज्यासाठी विकीपिडिया हा विश्वकोष खूप महत्वाच शैक्षणीक साधन म्हणुन वापरत आहोत.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अजुनही इंटरनेटची सोय नाही, तेथील विद्यार्थाना व बहुतेक शिक्षकांना ते नक्की कसे उपयोगात आणता येउ शकते हे माहीत नाही. किविक्स हे आँफलाइन साँफ्टवेअर वापरुन जेव्हा आम्ही त्यांना विकिपिडिया दाखवले तेव्हा ते खुपच आंनदित होते. म्हणुनच आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला. सर्व शिक्षकांना एकत्रीतपणे त्यांच्या शाळेबद्दल, गावाबद्दल त्याची भौगोलीकता वैगरे विषयावर माहीती देणारा लेख लिहायला सांगीतला, व तोच लेख त्यांच्याकडुन मुद्देसुद टाईप करुन घेतला. तेथील एकाही शिक्षकाकडे स्वत:चा ई-मेल आय.डी सुद्धा नाही, तेव्हा नविन ई-मेल आय.डी बनवुन त्यापैकी एका शिक्षकांना आम्ही ती माहीती लिहायला सांगीतले.

माहीती जतन केल्यावर त्यांच्या चेहर् यावरील आनंद काही वेगळाच होता. एक आत्मविश्वास की हे शिक्षकसुद्धा आता विकीपिडिया वापरु शकतात व माहीती टाकु शकतात.

यामागचा आमचा उद्देश हाही की महाराष्ट्रातील प्रत्येक छोटे गाव ही स्वत:हुन एक ओळख निर्माण व्हायला हवी, व हे काम त्या गावच्याच शिक्षकांनी करावे, कारण ही त्याना शिकण्याची एक संधि आहे व विकीपिडिया हे साधन.

अभयने बोलल्याप्रमाणे, मराठी व मराठी विकीपीडिया अशाच गावातुन व शाळातुन जगणार आहे. --गणेश गजरे

प्रयत्न

संपादन

नमस्कार गणेश,

तुमच्या या उपक्रमाबद्दल वाचून खूप आनंद झाला. असे गावोगावी फिरुन माहिती, तंत्रज्ञान आणि संगणक-साक्षरता पसरवणार्‍या तुमच्यासारख्यांना माझा सलाम! हे काम साधे नाही, सोपेही तर नाही आणि मार्जिनल[मराठी शब्द सुचवा] तर नाहीच नाही. तुम्हाला यासाठी शुभेच्छा आणि विकिपीडियाकडून काही मदत लागली तर ती देण्याचे आश्वासन.

अभय नातू १७:१८, १० मार्च २०११ (UTC) ता.क. मराठी विकिपीडिया आणि शाळाशाळांतून तो जगवण्याबद्दलचे उद्गार मूळ माहितगारांचे आहेत.

टुमदार आणि एक्स्ट्राकरिक्युलर

संपादन

टुमदार म्हणजे छोटी असून सुबक. अशी इमारत प्रशस्त कशी असू शकेल? एक्स्ट्रा-करिक्युलर म्हणजे शालाबाह्य. शाळेतल्या शाळेत चालणार्‍या जास्तीच्या कार्यव्यापारांना हल्ली को-करिक्युलर activity म्हणतात. मराठीत सहशालेय उपक्रम!

मार्जिनलसाठी क्षुल्लक, किरकोळ हे शब्द चालावेत.

मूळ हे कशाचे विशेषण? उद्गारांचे की माहितगारांचे? ---59.95.32.131 १८:१२, १० मार्च २०११ (UTC)

मूळ माहितगार

संपादन

उद्गार मुळात माहितगारांचे आहेत....पण माहितगारही मूळच आहेत. हाहा

नेमकी चूक पकडलीत :-)

अभय नातू १८:२५, १० मार्च २०११ (UTC)

:) मूळ असणे म्हणजे काय ? मूळावर असण्याची पुढची पायरी अभिप्रेत नसावी हाहाहाहा :) बाकी 'जे' या एवढ्या त्रोटक सदस्य नावाचे गमक माहिती नव्हते, पण आता खात्री झाली आहे 'जे दिसेल ते सारं !' त्यात सर्व काही आलं माहितगार १९:२७, १० मार्च २०११ (UTC)

लेखाबद्दल

संपादन
चला वरील हास्य विनोदानंतर मुख्य लेखविषयाच्या चर्चेकडे परत वळतो आहे .डाँ नागार्जुन आणि गणेश गजरे यांच्या उपक्रमाच स्वागत आणि भविष्यातील प्रगतीकरिता शुभेच्छा आणि एक मराठी विकिपीडियन या नात्याने सहकार्याचे आश्वासन देतानाच,श्री.अभयने लेखचर्चेत नमुद केल्या प्रमाणे लेखामध्ये अजून सुधारणांना वाव आहे.मराठी विकिपीडिया ज्ञानकोश आहे,विकिपीडियाच ध्येय ज्ञान सर्व स्तरातून संकलीत करण्याच आहे,अर्थात ज्ञान आणि माहिती स्विकारताना तीकडे हिर्‍यास पैलू पाडण्याच्या नजरेने पहाणे आणि तसे पहाताना/स्विकारताना ती माहिती सर्व बाजूने जोखणे महत्वाचे आहे हे लेखाचे प्रथमतः लेखन करणारी सर्व मंडळी मान्य करतील असा विश्वास आहे.(लिहिणे चालू आहे)

मराठी विकिपीडीयाच्या परिघास स्वतःच्या मर्यादा आहेत.अभयने म्हटल्या प्रमाणे स्वस्तुतीपर भाग वगळला जाणे क्रमप्राप्त ठरते खासकरून व्यवस्थापन विभागात दिलेली माहिती व इतर काही माहितीस संदर्भांची आत्यंतीक जरूरी आहे हे खरे. त्या दृष्टीने सध्या बदल हा साचा लावला आहे, संदर्भ उपलब्ध न होणार्‍या सर्व नव्हे पण काही माहितीस कालौघात विकिपीडियाच्या विवीध निकषांना अनुसरून पुन्हा कापून नीट नेटके केले जाण्याचा संभव आहे.आणि तसे करण्यात आपण स्वतःही सहभागी होऊ शकाल तसे स्वागतच आहे.

तशी आपल्या या चर्चासत्रातून पुढे आलेल्या माहितीत मुद्देसूदपणा होता त्यामुळे त्याचा स्विकार काही प्रमाणात सुलभ झाला.आपल्या कार्याच्या दृष्टीने कार्यशाळेतील सहभागी सर्वांना सहज जोडणारा सुलभ दुवा त्यांची स्वतःची शाळा आहे हे खरे.या पुढेही आपल्या सुविधेनुसार आपण संबधीत शाळा हा विषय निवडू शकता,पण सोबत आपल्या उद्देशांना बाधा न आणता संबधीत श्रोत्यांच्या संबधीतच पण किंचीत अधीक व्यापक स्तरावरील लेखविषय निवडता आलेतर एक तर संदर्भांची उपलब्धता अधीक सहज होऊ शकते शिवाय परिसराबद्दल अधीक माहिती विकिपीडियास मिळून लेखक विद्दार्थ्यांच्या आणि इतर विकिपीडीया वाचकांच्या ज्ञानात पडणार्‍या भरीचे मुल्य वाढू शकते. जसे कि संबधीत गावा बद्दल/नदी बद्दलचे/तालूका जिल्हा लेख,सह्याद्री,अरबी अमुद्र,कोकण विभाग , कोकण जनजीवन आणि संस्कृती असे अनेक विषय निवडता येऊ शकतील किंवा कसे हे trial and error पद्धतीने पहात रहावे अशी एक विनंती आहे.

"रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द" पानाकडे परत चला.