चर्चा:मुथिया मुरलीधरन


  • मुत्तैया मुरळिदरन ह्यांचे नाव हे स्थानिक भाषेनुसार (सिंहली) आणि त्यांच्या मातृभाषेनुसार (तमिळ) नमुद करण्यात आले आहे,रोमन समरूपातील उच्चार आणि लिखाणानुसार नाव भिन्न भासू शकते.मुथैय्या किंवा मुथया असा शब्द अयोग्य आहे,मुरली-धरन हे देखील अयोग्य आहे. मुरळिदरन(फारतर मराठी व्याकरणानुसार मुरळी असा शब्द होऊ शकतो) हा शब्दप्रयोग स्थानिक प्रमाण भाषेनुसार आहे.
  • स्थानिक वृत्तपत्रात काय येते किंवा दूरचित्रवाणीवरील बातम्यांमध्ये काय नाव घेतली जातात ह्यांचा आधार न घेता आधी योग्य तो शब्दप्रयोग समजून घ्यावा,

मिडीयामध्ये काम करणारे लोक अनेकदा शुद्धलेखनाच्या चुका करतांना ,तसेच वेळप्रसंगी अनेक अमराठी शब्दांचा उपयोग करतांना आढळतात त्यामुळे त्यांच्या शब्दांना प्रमाण माणण्यात काहीच अर्थ नाही,मी वरतीच योग्य शिर्षक स्पष्ट केले आहे तसेच मराठी व्याकरण नियमानुसार जर वाटला तर आवश्यक बदल सूचविला आहे,कळावे,

  • मी ह्यापूर्वीही अनेकदा स्पष्ट केले आहे ,मराठी वाचक दाक्षिणात्य शब्दांशी विशेष परिचीत नसल्याने खालील चुका घडतातः
  1. दक्षिण भारतीय शब्दांचे रोमन प्रतिरूपे /लिप्यंतरे अनेकदा चुकीची वाचली,लिहीली,किंवा अनुवादीत केली जातात.
  2. शब्दांची ओळख नसल्याने त्यास स्थानिक शब्दसंबंध (मातृभाषा सदृश्य एखादा शब्द)जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
  3. किंवा अनेकदा लिपी साधर्म्यामुळे हिंदीतील (देवनागरी) समरूपेच मराठीत जशीच्या तशी उतरविली जातात.

ह्यावर सविस्तर लिखाण होण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते,जी मागे एकदा झाली होती,परंतु काही वादांमुळे ती पुढे गेलीच नाही.असो.सर्वमत घेऊन लवकरच ह्याविषयावर विशेष लेख निर्माण करू अशी अपेक्षा करतो.कळावे.चे.प्र.कुमार ०६:३७, ३० जुलै २०१० (UTC)

  • ह्याच लेखात मला एक चूक आढळली ती म्हणजे एका ठिकाणी तामिल युनियन असे लिहीलेले आहे,जे बहूदा रोमन शब्दानुसार कुणीतरी भाषांतरीत/लिप्यंतर करून लिहीले आहे,योग्य शब्द तमिळ आहे ,"तामिल" हा शब्द उर्दू आहे ,उर्दू कुराणात व भाषेत आढळणारा हा शब्द "पालन" किंवा "अंमलबजावणी" ह्या अर्थाने वापरला जातो.तसेच हिंदी भाषेत तमिळ शब्दास प्रतिरूप "तमिल" असे आहे, तामिल नाही.चे.प्र.कुमार ०६:४७, ३० जुलै २०१० (UTC)

इंग्लिश विकि संदर्भ

संपादन

इंग्लिश विकिपीडियावर काही माहिती ह्या विषयी आहे, भाषा जाणकारांनी हे पाहुन योग्य तो निर्णय घ्यावा.

Muttiah_Muralitharan

Even though his name has been widely romanised as Muralitharan since the commencement of his career, the cricketer himself prefers to romanise his name as Muralidaran. The different spellings have arisen because the Tamil letter த can be pronounced as both 't' and 'd' depending on its place in a word. It is often transliterated as 'th' to distinguish it from another letter, ட, which is a retroflex 't' or 'd'. In 2007, when Cricket Australia decided to unveil the new Warne-Muralidaran Trophy, to be contested between Australia and Sri Lanka, Muralitharan was requested to clarify how his name should be spelt. Cricket Australia spokesman Peter Young confirmed that "the spelling he's given is Muralidaran".[31]

The first day cover involving Muralitharan bears an official seal captioned as "The highest wicket taker in Test cricket, MUTHIAH MURALIDARAN, First Day of Issue 03.12.2007, Camp Post Office, Asgiriya International Cricket Stadium, Kandy".[32]

The name Muralidaran means "the bearer of the flute", which is a synonym for Lord Krishna, a deity in Hinduism who is said to play upon his bamboo flute while looking after cattle.

अधिक माहिती

संपादन

हो अगदी बरोबरच आहे इंग्रजी विकिवरील,मला तमिळ भाषा कळते म्हणजे मी बोलू/लिहू शकतो त्यामुळे मला हा फरक माहित आहे तमिळ भाषेत त आणि द चा उच्चार एकाच अक्षराने दर्शवितात परंतु त्यात ध असा उच्चार कधीच होत नाही.तमिळ भाषेत मुळाक्षर कमी प्रमाणात आहेत त्यामुळे अनेक उच्चार ठराविक अक्षरांनीच दर्शविले जातात.रोमन लिप्यंतरांच्या बाबतीत तमिळ आणि दक्षिणेकडील भाषा अगदी योग्यच लिप्यंतर करतात असे माझे वैयक्तिक मत आहे,त्यामानाने मराठी लिप्यंतरे फारच गोंधळ उडविणारी असतात उदा. Dravid ह्यात कोणता डी काय दर्शवितो हे सहसा न कळल्याने ते ड्रविड,द्रविद,ड्रविद किंवा द्रविड असे ह्यापैकी काहीही होऊ शकते विशेषत: Tendulkar-तेंडूलकर,टेंदुलकर,तेंदुलकर,टेंडूलकर असे चार प्रकार होऊ शकतात. अशा शब्दांसाठी तमिळ मध्ये स्पष्ट फरक दर्शविला जातो उदा:Thendulkar अधिक माहिती खालील उदाहरणावरून कळू शकेल.

  • मराठी अक्षरांचा गोंधळः
  1. त साठी Ta
  2. ट साठी Ta
  3. थ साठी Tha
  4. ठ साठी Tha
  5. ड साठी Da
  6. द साठी Da
  7. ढ साठी Dha
  8. ध साठी Dha
  9. ळ साठी La
  10. ल साठी La

Marathi Way of Writing तमिळ : Tamil (हे अनेकदा टमिल,तमिल,तामिल,काहीजण टॅमिल,असेही म्हणतात)

  • तमिळ अक्षर रचना
  1. त साठी Tha(த)
  2. ट साठी Ta (ட)
  3. थ साठी Thha(த்த)(हे अक्षर आणि हा उच्चार स्थानिक भाषेत नाही पण आवश्यक असल्यावर इतर भाषांसाठी वापरात येऊ शकतो)
  4. ठ साठी Tta(ட்ட) (हे अक्षर आणि हा उच्चार स्थानिक भाषेत नाही पण आवश्यक असल्यावर इतर भाषांसाठी वापरात येऊ शकतो)
  5. ड साठी Da (ட)
  6. द साठी Dha/Tha(த)
  7. ढ साठी Dda (ட்ட) (हे अक्षर आणि हा उच्चार स्थानिक भाषेत नाही पण आवश्यक असल्यावर इतर भाषांसाठी वापरात येऊ शकतो)
  8. ध साठी Dhha(த்த)(हे अक्षर आणि हा उच्चार स्थानिक भाषेत नाही पण आवश्यक असल्यावर इतर भाषांसाठी वापरात येऊ शकतो)
  9. ळ साठी Zha (आणखी एक "ळ्" आहे,पण त्याच्या उच्चार "ळ आणी ल" मधला असल्याने तो la ह्या अक्षराने दर्शविला जातो)
  10. ल साठी La (हा स्वतंत्र ल ह्याच उच्चारासाठी वापरला जातो)

(उदा.पुळल (एका भागाचे नाव आहे) हा शब्द असा लिहीतात Puzhal इथे स्पष्ट फरक कळून येतो कि आधीचा तो "ळ"च आहे नंतर मात्र ल म्हणू शकतो.) Tamil way of writing तमिळ : Thamizh (हा सर्वच स्थानिक माध्यमात आणि व्यवहारात प्रचलीत शब्द आहे,आणि उच्चारात ळ असाच उच्चार होतो.)

चे.प्र.कुमार ११:४७, ३० जुलै २०१० (UTC)

"मुथिया मुरलीधरन" पानाकडे परत चला.