चर्चा:मुत्तैया मुरळिदरन

मुत्तैया मुरळिदरन ह्यांचे नाव हे स्थानिक भाषेनुसार (सिंहली) आणि त्यांच्या मातृभाषेनुसार (तमिळ) नमुद करण्यात आले आहे,रोमन समरूपातील उच्चार आणि लिखाणानुसार नाव भिन्न भासू शकते.मुथैय्या किंवा मुथया असा शब्द अयोग्य आहे,मुरली-धरन हे देखील अयोग्य आहे. मुरळिदरन(फारतर मराठी व्याकरणानुसार मुरळी असा शब्द होऊ शकतो) हा शब्दप्रयोग स्थानिक प्रमाण भाषेनुसार आहे.செ.प्रसन्नकुमार १८:१८, २२ जुलै २०१० (UTC)

चर्चा करूनच पान स्थानांतरीत करावे, कारण तुम्ही वर दिलेल्या माहिती तुम्हीच दोन नावे सुचवली आहेत. तात्पुरता उपाय म्हणुन नविन नावाचे पान सद्य पानाकडे पुननिर्देशित करावे.
Maihudon ०५:२६, ३० जुलै २०१० (UTC)

मी वरतीच स्पष्ट केले आहे.

संपादन
स्थानिक वृत्तपत्रात काय येते किंवा दूरचित्रवाणीवरील बातम्यांमध्ये काय नाव घेतली जातात ह्यांचा आधार न घेता आधी योग्य तो शब्दप्रयोग समजून घ्यावा,

मिडीयामध्ये काम करणारे लोक अनेकदा शुद्धलेखनाच्या चुका करतांना ,तसेच वेळप्रसंगी अनेक अमराठी शब्दांचा उपयोग करतांना आढळतात त्यामुळे त्यांच्या शब्दांना प्रमाण माणण्यात काहीच अर्थ नाही,मी वरतीच योग्य शिर्षक स्पष्ट केले आहे तसेच मराठी व्याकरण नियमानुसार जर वाटला तर आवश्यक बदल सूचविला आहे,कळावे,

  • मी ह्यापूर्वीही अनेकदा स्पष्ट केले आहे ,मराठी वाचक दाक्षिणात्य शब्दांशी विशेष परिचीत नसल्याने खालील चुका घडतातः
  1. दक्षिण भारतीय शब्दांचे रोमन प्रतिरूपे /लिप्यंतरे अनेकदा चुकीची वाचली,लिहीली,किंवा अनुवादीत केली जातात.
  2. शब्दांची ओळख नसल्याने त्यास स्थानिक शब्दसंबंध (मातृभाषा सदृश्य एखादा शब्द)जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
  3. किंवा अनेकदा लिपी साधर्म्यामुळे हिंदीतील (देवनागरी) समरूपेच मराठीत जशीच्या तशी उतरविली जातात.

ह्यावर सविस्तर लिखाण होण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते,जी मागे एकदा झाली होती,परंतु काही वादांमुळे ती पुढे गेलीच नाही.असो.सर्वमत घेऊन लवकरच ह्याविषयावर विशेष लेख निर्माण करू अशी अपेक्षा करतो.कळावे.चे.प्र.कुमार ०६:३७, ३० जुलै २०१० (UTC)

"मुत्तैया मुरळिदरन" पानाकडे परत चला.