चर्चा:मकरसंक्रांत

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

या लेखातील पृथ्वीचा आस उत्तरेस कलणे सुरू होते.: हे विधान चुक होते.सबब काढले.पृथ्वीच्या आसाच्या फिरण्यात बदल झाला तर प्रलय होईल.पृथ्वी नष्ट होईल.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३३, १४ जानेवारी २०१० (UTC) @अभय नातू आणि V.narsikar: माझा पूर्वीचा अनुभव आज पुन्हा आला आहे. निर्माणाधीन साचा लावला आहे हे मी हे बहुधा "ज" या संपादकांना कळत नाही असे दिसते आणि आपणही त्यांना समज देत नाही यापूर्वी मी तक्रार करूनही. आता या लेखनातही त्यांची लुडबुड आहे आहारशास्त्र दृष्ट्या महत्व या मुद्द्यांना मध्ये. महिला सदस्यांच्या लेखात त्रास देणारा पुरुष संपादक अशी आता मी यांची वरच्या पातळीवर तक्रार करीन नाहीतर. ही मी प्रचालकांना आदर राखून करून दिलेली जाणीव आहे असे समजा आणि माझा राग लक्षात येण्याइतपत आपण सुज्ञ आहात.कारवाई व्हावी ज यांच्यावर. आणि या तक्रारीवर केवळ अभय नातू आणि नरसीकर सर यांचीच मते मला हवी आहेत याची सर्व शहाण्या संपादकांनी नोंद घ्यावी.चार संपादने केली आहेत ज यांनी इतक्यात. मराठी साचा लावलेला असताना जर तो ही त्यांना वाचता येत नसेल आणि तयाचा अर्थ कळण्याऐतप्त ते शहाणे नसतील तर तर मराठी व्यसएपीठ समृद्ध करण्याचा फाजील अट्टहास "ज' यांनी थांबवावा.आर्या जोशी (चर्चा) १३:०२, ५ जानेवारी २०१९ (IST)Reply

@आर्या जोशी:,
दोन सदस्य एकाच वेळी संपादने करीत असताना एकमेकांच्या कामात व्यत्यय येऊ शकतो आणि केलेले संपादन व्यर्थ होऊ शकते हे खरे आहे. क्राउडसोर्स्ड प्रकल्पांमध्ये हे अनेकदा आणि वारंवार होते. इंग्लिश आणि इतर अनेक मोठ्या प्रमाणात संपादक असलेल्या प्रकल्पांत हे सर्रास होते. अशा ठिकाणी एखादा लेख बदलला जात असताना एकाच व्यक्तीने काम करावे ही अपेक्षा नाही. किंबहुना अनेक लोकांनी भर घालावी या अपेक्षेनेच तर विकिप्रकल्प उभारले गेले. एक-लेख-एक-व्यक्ती-एक-बदल ही संकल्पना जुनाट आहे आणि विकिमीडिया प्रकल्पांवर प्रॅक्टिकल नाही. तरीसुद्धा आपण त्यातल्यात्यात सोय करुन घेण्यासाठी निर्माणाधीन साचा लावलेला असताना इतरांनी संपादने करू नयेत हा संकेत आपण पाळतो. आपण असा नियम केलेला नाही. तुमच्या लेखनात व्यत्यय आलेला पाहून तुम्हाला उ्दवेग येणे साहजिक आहे. मी स्वतः आणि विकिपीडियावर संपादने करणाऱ्या सगळ्यांनाच हा अनुभव आलेला आहे हे निश्चित.
एखाद्या लेखात बदल करताना एकाच विभागात आणि त्यातही एकाच वाक्यावर किंवा जवळपासच्या मजकूरात दोन वेगवेगळे बदल एकाचवेळी झाले तर असे होते. इतर प्रसंगी (वेगवेगळ्या वाक्यांत किंवा वेगवेगळ्या विभागांत एकाचवेळी झालेले बदल) हाताळण्यासाठी मीडियाविकी सॉफ्टवेर सक्षम आहे. क्राउडसोर्स्ड माहिती गोळा करण्यासाठी हे अतिमहत्वाचे आहे.
एक-लेख-एक-व्यक्ती-एक-बदल हा नियम करण्यास आणि तो मोडणाऱ्यास शिक्षा करण्यास माझा ठाम विरोध आहे. असे करणे हे क्राउडसोर्सिंग आणि पर्यायाने विकिपीडियाच्या तत्त्वांबाहेर (पाच मूलतत्त्वे नाहीत) आहे. आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षा, समज, दंड करणे म्हणजे शाळा चालविणे झाले. आपण येथे छडी घेउन चूक होण्याची वाट बघत बसलेलो नाही तर सगळ्यांना (त्यात निर्बुद्ध पासून खट्याळ पर्यंत सगळ्यांचा समावेश होतो) सोयीचे होईल असे संकेत/नियम करण्यास आहोत.
तुमच्या महिला सदस्यांच्या लेखात त्रास देणारा पुरुष संपादक या आरोपात तथ्य नाही हे मी पूर्वी दाखविलेच आहे. इतर स्त्री सदस्यांच्या संपादनात इतर पुरुष सदस्यांनी लुडबुड केलेली आहे/करतात आणि प्रस्तुत सदस्य (ज) यांनी पुरुष सदस्यांच्या संपादनात लुडबुड केलेली आहे हे दिसून येते. हा निकष इतर अनेक सदस्यांनाही लागतो.
तरी येथून पुढे @: यांनी संपादने करताना, विशेषतः निर्माणाधीन साचा लावलेल्या लेखांमध्ये बदल करताना विशेष काळजी घ्यावी असे मी (पुन्हा एकदा) सांगत आहे आणि तुम्ही (आर्या जोशी) आपला राग/उ्दवेग शांत झाल्यावर वस्तुनिष्ठपणे दूरगामी विचार करावा ही विनंती करीत आहे. अर्थात तुम्ही हेच केले पाहिजे असा माझा आग्रह नाही. वरच्या पातळीवर तक्रार करण्यासाठी मराठी विकिपीडियावर कधीच कोणीही आडकाठी केलेली नाही. क्वचितप्रसंग सोडता गेल्या १०-१२ वर्षांमधले प्रश्न आपण येथेच अझ्यूम गुड फेथ हे तत्त्व समोर ठेवून सोडविलेले आहेत.
क.लो.अ.
अभय नातू (चर्चा) ०१:३१, ९ जानेवारी २०१९ (IST)Reply
यावर मी असे सुचवितो कि, या अशा प्रकाराने त्रास होत असेल तर, आवश्यक तो नवीन लेख अथवा जून्या लेखात बदल करणे असल्यास, तो मजकूर सरळ आपल्या धूळपाटीवर नेऊन आवश्यक तो लेख तयार करावा व तो पूर्ण झाल्यावरच योग्य त्या पानावर नकल-डकव करावा. अर्थात, हे सुचवणे आहे. पटत असल्यास जरूर करावे.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१९, ९ जानेवारी २०१९ (IST)Reply

@अभय नातू: @V.narsikar: आपणा उभयतांचे धन्यवाद! मला हे माहिती आहेच की एक लेख एक संपादक असे या व्यासपीठावर अपेक्षितही नाही, पण सहकार्य करण्याची मानसिकता नसेल तर किमान त्रास तरी देऊया नको ना एकमेकांना आणि तसेही माझे व्यक्तिगत अभ्यासपूर्ण लेखन केवळ माझ्याच नावाने ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध होता असताना येथे त्यासाठी अट्टहास करावा असे मला वाटत नाही. आपण इंगजीशी आपली तुलना नाही करू शकत हे मान्य पण मी आपल्याला प्रचालकांना विनंती मध्ये काही मुद्दे पाठविले आहेत त्यांचाही आपण जरूर विचार करावा. सध्या कार्यशाळा चालू आहेत, आम्ही यातील प्रशिक्षण घेतलेली मंडळी नवे संपादक इथे आणण्याचा प्रयत्न करीत असतो ते कशासाठी? जुन्यानी नव्याने येणार-या मंडळींना मदत करावी ही अपेक्षा करणे चुकीचे आहे काय? आणि जर आपला वाचकवर्ग वाढत असेल तर किती वर्षे आपण केवळ मानसिक पातळीवर विचार करणार आहोत? काही वेळेला काही नियमही अमलात आणावेत लागतील ना? मुक्त ज्ञानकोष म्हणजे कुणीही या आणि संपादन करा हे ठीक पण त्याला काहीतरी वैचारिक अधिष्ठान आहे हे विसरून चालणार नाही. असो. संशोधक म्हणून मला या संपादनांचा उपयोगच होतो आणि मला या वायसपीठाबद्दल आदर आहे म्हणून नोंदवावेसे वाटते. अन्यथा मी बरी आणि माझे काम बरे या भूमिकेतून मी काम करीत राहीन. आपण ज्येष्ठ आहात त्यामुळे आपल्याला माझे हे बोलणे कटू वाटू शकेल पण त्यामागील माझी तळमळ ही अझ्युमिंग गुड फेथ याला धरूनच आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा) १०:१४, ११ जानेवारी २०१९ (IST)Reply

@आर्या जोशी आणि :,

या लेखातील भौगोलिक संदर्भामध्ये आपण अयन म्हणजे अंतराळातील मार्ग असे टाकले आहे. माझे मते अयन म्हणजे सूर्य. कृपया तपासावे. आवश्यक असेल तर दुरुस्ती करावी अन्यथा माझे म्हणणे खोडावे. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:१५, १७ जानेवारी २०१९ (IST)Reply

@V.narsikar:धन्यवाद. तपासून घेते. आर्या जोशी (चर्चा) १५:०२, १८ जानेवारी २०१९ (IST)Reply

"मकरसंक्रांत" पानाकडे परत चला.