चर्चा:मौ
इतर भाषांमधील विशेष नामांची मराठीत भाषांतर वजा रूपांतरे होतात. उदाहरणार्थ जीजस् क्राइस्ट् चे येशू ख्रिस्त. तसेच मौ किंवा मऊ चे महू. हा लेख महू नावाखाली स्थानांतरित करावा. कोचिन चे कोची करण्याचीसुद्धा गरज नव्हती. मराठीत कोचीन(ची दीर्घ) हे नाव अजूनही वापरात आहे. ग्रामनामाचे लेखी स्वरूप सतत बदलायला लागलो तर अनर्थ होईल. बेळगावचे आपण बेळ्गावी, बंगलोरचे वंगळुरु, कालिकतचे कोळ्हिकोड करणार आहोत का? कलकत्ता हा शब्द खुद्द कलकत्त्यात कलकत्ता, कालिकता, कालिकाता, कोलिकाता अशा विविध प्रकारे लिहिलेला मी पाहिला आहे. मराठीत तो कलकत्ताच राहणार आहे, त्याला कोलकाता करू नये असे मला वाटते.
इंग्रजांनी मुंबईचे बॊम्बे केले, हिदुस्थानचे इंडिया केले, चेन्नईचे मद्रास केले अशा आपल्या घोर अडाणी समजुती आहेत. इंग्रजांनी जेव्हा मुंबईची बेटे पोर्तुगीजांकडून घेतली तेव्हा त्या परिसराचे नाव~बॊम्बे(म्हणजे चांगला उपसागर) होते. वास्को द गामाने इंडियाचा शोध लावला, हिंदुस्थानचा नाही. चेन्नईपेट्ट आणि मद्रासपेट्ट अशी दोन खेडेगावे होती. तेथे इंग्रजाची एक आणि डचांची एक अशा वखारी होत्या. पुढे डच निघून गेल्यावर ब्रिटिशांनी शहराच्या नावाचे स्पेलिंग मद्रास असे दिले. तमिळमध्ये चेन्नई वापरात होतेच. जसे मराठी-गुजराथीत मुंबई, हिंदीत बंबई, गावागावातून म्हमई, तसेच. चिनी भाषेत पेकिंगचे फक्त स्पेलिंग बीजिंग केले आहे, उच्चार अजूनही पीकिंग आहे. चिनी नावांचे रोमनायझेशन करण्यासाठी वापरात असलेली वेड्-गाइल्स् पद्धत बदलून पिन्यिन् आली तेव्हा हे स्पेलिंगबदल १९७९ पासून झाले.--J--J ०६:५४, ५ जुलै २००७ (UTC)
ग्रामनामे
संपादनआपण मांडलेला विचार प्रस्तुत आहे परंतु येथे आपण सत्यमाहिती (Facts) देण्याचा प्रयत्न करतो. जरी कोचीनचे कोची करणे गरजेचे नसले तरी जो कोणता मूळ लेख असेल त्याला इतर नावांचे पुनर्निर्देशन आवश्यकच आहे. असे केल्यामुळे कोची/कोचिन/कोचीन शोधण्याला पाहिजे ती माहिती (कोची/कोचिन/कोचीन नावाने) मिळेल. बंगळूरचे बंगळूरू किंवा बेळगांवचे बेळगावी जरी केले नाही तरी बंगळूरु, बंगळुरु, बंगळुरू ही पुनर्निर्देशने बंगळूर कडे पाहिजेतच.
लेख शक्यतो अधिकृत नावानेच ठेवावा, इतर नावांची पुनर्निर्देशने असावी, पण योग्य ठिकाणी या नियमात अपवाद करावा हे माझे मत आहे.
अभय नातू ०७:०३, ५ जुलै २००७ (UTC)
ता.क. मराठीत तो कलकत्ताच राहणार आहे, त्याला ... या आपल्या विधानाशी मी पूर्णतः असहमत आहे. कालांतराने == प्रचलित/रूढ नावे बदलतात (माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला इष्टुर फाकडा कोणी म्हणल्याचे अलिकडे ऐकिवात नाही :-])
कोलकाता(?)
संपादनबंगालीत बोलताना आद्य अकाराचा ओकार करतात. लिहिताना नेहमीच अकार लिहिला जातो. म्हणके उच्चार आणि लिखाण यात फरक आहे. त्यामुळेच मला वाटते कलकत्ता शहरात जवळजवळ सर्वत्र 'कलकत्त्या'तले पहिले लिखित अक्षर "क" आहे. आत्ता माझ्यासमोर एक बंगाली लिपीतले जुने पुस्तक आहे. त्यात कलकाता असेच लिखाण आहे. नवीन पुस्तकात किंवा आंतरजालावर कसे लिहितात ते बघावे लागेल.
इष्टुर फाकडा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेतला अधिकारी कॅप्टन स्टुअर्ट! मुंबईचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन नव्हे. (त्यांना सामान्य माणसे अलपिस्टनसाहेब म्हणत.) असे असले तरी कागदोपत्री कॅप्टन स्टुअर्ट आणि एल्फिन्स्टन हीच नावे होती. कॅप्टन स्टुअर्टच्या काळातच मराठ्यांकडे एक शूर सरदार होता, त्याला मानाजी फाकडा म्हणायचे. त्याला तोडीसतोड हा इंग्रज अधिकारी. म्हणून तो इष्टुर फाकडा!
परभाषेतील शब्दाचे उच्चार नीट न करता आल्याने त्याचे अपभ्रष्ट रूप होणे वेगळे आणि काही अतिउत्साही लोकांनी केवळ स्वस्त राजकारणासाठी वर्षानुवर्षे चालत आलेल्या नावाचे तथाकथित शुद्धीकरण करणे वेगळे!! चिनी लोकांच्या भाषेत सारखे चिन चुन ऐकू यायचे म्हणून आपण त्यांच्या देशाचे नाव चीन ठेवले. इंग्रजांनी त्याचे स्पेलिंग China केल्याने मूळ उच्चार बदलून चायना झाला. हली चीनला त्यांच्या देशात झोन्ग्गुओ Zhongguo म्हणतात. आपण नवीन नाव स्वीकारले तर हा उच्चार तरी करू शकू?---J--J १७:१४, ६ जुलै २००७ (UTC)
- इष्टुर फाकड्या बद्दलचा माझा (गैर)समज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
- परभाषेतील शब्दाचे उच्चार नीट न करता आल्याने त्याचे अपभ्रष्ट रूप होणे वेगळे आणि काही अतिउत्साही लोकांनी केवळ स्वस्त राजकारणासाठी वर्षानुवर्षे चालत आलेल्या नावाचे तथाकथित शुद्धीकरण करणे वेगळे
- मग मुंबईचे बॉम्बेच राहील आणी पुण्याचे पूना, इ. इ. माझा म्हणण्याचा रोख असा आहे की नावांचे शुद्धीकरण, तथाकथित, इ. subjective विषय आहेत, त्याबद्दल दुमत असू शकते (सहसा असतेच.) एतद्देशीयांनी स्वीकारलेली नावे ही शक्यतो प्रमाण मानून बाकी सगळ्या उच्चार व variationsची पुनर्निर्देशने करणे असा (बव्हंशी) objective नियम विकिपीडियावर असावा हे माझे मत आहे. जेथे शक्य नाही किंवा ज्या नावांच्या वापराने ambtiguity (पॅरिस/पारी, चीन/झॉँग्ग्वो/चुंग्-ह्वा, नुअर्क/न्यूआर्क/नुवर्क, इ.) निर्माण होईल अशा नावांसाठी मराठी नावे वापरावी व प्रमाणित नावांचा स्पष्ट व prominent उल्लेख लेखात करावा हा त्याला पूरक-नियम असावा.
- कोणते नाव बरोबर व असे का, हे ठरवणे विकिपीडियाचा प्रदेश नव्हे, व असूही नये. ही चर्चा करण्यास इतर (संकेत)स्थळे जास्त उपयुक्त आहेत.
- आपण नवीन नाव स्वीकारले तर हा उच्चार तरी करू शकू?
- पहिले काही दिवस/महिने/वर्षे नाही करता येणार पण कालांतराने ही नावे रूढ होतील. कदाचित विकिपीडियामुळेच ही नावे रूढ होतील असाही एक (शेखचिल्ली) विचार मनात येतो. सामान्य मराठी माणसाच्या सामान्य ज्ञानात याने भरच पडेल. भारतात व परदेशातही बोलीभाषेत बॉम्बेचे मुंबई व पूनाचे पुणे होण्यास काही दशके लागली, पण ती झालीच.
अभय नातू ०५:११, ९ जुलै २००७ (UTC) _____________________________________________________________________________________________
चेरापुंजी
संपादन_"मेघालय सरकारनेच चेरापुंजीचे नाव बदलले आहे. ते आता आहे...सोहरा! ....
म्हणे ब्रिटिशांना "सोहरा'चा उच्चार नीट करता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी या "सोहरा'चे केले चेरा. हा बदल १८३० च्या आसपास झाला असावा, कारण याच काळात ब्रिटिशांनी सोहराला आपले विभागीय मुख्यालय बनवले होते या "चेरा'च्याही पुढे बंगालीतला "पुंजो'(समूह) हा शब्द जोडला. तेव्हापासून नाव झाले चेरापुंजी.
स्थानिकांचा आणि खासी विद्यार्थी संघटनेचा (केएसयू) दबाव यांमुळे मेघालय सरकारने चेरापुंजीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला." ब्रिटिशांना , सोहो, सोहराब (आणि रुस्तुम) यांचा उच्चार करता येत होता. श्रीनगर, सेराक्यूझ हे उच्चार जमायचे, मात्र सोहरा चा येत नव्हता. आता नवी विद्यार्थी संघटना गादीवर आली की परत नावबदलाची तयारी ठेवणेच फक्त आपल्या हाती.---J--J ०९:५३, ९ जुलै २००७ (UTC)
चेन्नै वगैरे तमिळ नावे
संपादनपरकीय भाषेतली नावे मराठीत लिहावयाची असतील तर त्यांचे रूपांन्तर करणे नेहमीच योग्य ठरते. इंग्रजांनी हजारो हिंदुस्थानी नावांचे रोमनायझेशन केले होते, आणि ते करणे अटळ असते. रोमन लिपीत खछठथफघझढधभषळ ही अक्षरे नाहीत तरी त्यांचे काही अडले नाही. त्यांनी त्यांच्या लिपीतील उपलब्ध अक्षरांचा उपयोग करून जवळपास आहे तसाच उच्चार होईल अशी स्पेलिंग्ज केली. मराठीत हलन्त शब्द नाहीत, तसेच ऐकारान्तसुद्धा नाहीत. तमिळमध्ये बहुसंख्य शब्द तसे आहेत, त्यामुळे ते मराठीत लिहिल्यास फार विचित्र दिसते. दोसै, वडै, अडै, इट्टलि ही खाद्यपदार्थांची नावे मराठीत लिहिणे प्रशस्त वाटत नाही. तद्वतच चेन्नै, मदुरै ही ग्रामनामे. त्यामुळे स्थानिक उच्चार कसेही असले तरी परकीय नावांची मराठीत मराठीच्या प्रकृतीला साजेल अशी रूपान्तरे करणे अत्यावश्यक आहे.--J---J १५:१६, १३ जुलै २००७ (UTC)
नि:संदिग्धीकरण आणि सुसूत्रीकरण विनंती
संपादन@अभय नातू:
माझा काही तरी गोंधळ उडतोय. गुंता झाला असावा. हे चर्चा पान नेमके कोणत्या लेखाचे चर्चा पान असावयास हवे याचा बोध होत नाही. महू लेखाचे चर्चापान इकडे उघडते आहे. पण या चर्चा पानाचा लेख मउ नावाच्या लेखात उघडतो मौ लेख वेगळीकडेच पुर्ननिर्देशीत होतोय.
नि:संदिग्धीकरण आणि सुसूत्रीकरण विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२७, २९ मार्च २०१७ (IST)
- {{साद|Mahitgar}
- मला वाटते आहे की मूळ लेखाचे पुनर्निर्देशन महू कडे झाले आणि चर्चा पानाचे झाले नाही (किंवा बदलाबदलीत गोंधळ झाला) आहे.
- असे असता चर्चा:महू पासून असलेले पुनर्निर्देशन काढले आहे आणि स्वतंत्र चर्चा पाने ठेवली आहेत.
- अभय नातू (चर्चा) ११:०८, ३१ मार्च २०१७ (IST)