चर्चा:भा.ग. केतकर
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by श्रीनिवास हेमाडे
या लेखात केतकरांपेक्षा त्यांनी अनुवादित केलेल्या ग्रंथाबद्दलची माहिती जास्त दिसत आहे. या ग्रंथाबद्दलचा वेगळा लेख तयार करून ही माहिती तेथे हलवावी असा प्रस्ताव मी मांडत आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:२०, २२ सप्टेंबर २०१५ (IST)
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. मी हे माहितगार यांना मागे एकदा सुचविले होते. तसे केल्यास 'मराठीतील तत्त्वज्ञानाची पुस्तके' असे एखादे दालन खोलता येईल. दि. य. देशपांडे यांच्या पानात ही त्यांच्या त्रिखंडी पुस्तकांची माहिती मी दिली आहे. तीही अशीच हलविता येईल. प्रस्ताव मला मंजूर आहे. जुन्या लोकांची माहिती मिळणे तसे फार कठीण आहे, त्यांची पुस्तके आहेत. पण त्यावर त्यांचे चरित्र क्वचितच असते. तरीही मी प्रयत्न करेन.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १३:४६, २४ सप्टेंबर २०१५ (IST)