चर्चा:भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते

हा लेख काढून टाकून त्यातील यादीचा वर्ग करावा. तसेच अल्पायुषी म्हणजे किती वर्षे? २५? 11? ७५?

अभय नातू (चर्चा) २१:५७, १० जून २०१३ (IST)Reply

वर्गच आहे संपादन

ही यादी म्हणजे वर्गच आहे. वर्गाचे पान सहजासहजी उघडता येत नाही. यादी येते. वर्ग केला तर फक्त नावे येतील, माहिती नाही!

अल्पायुषी मरण म्हणजे धडधाकट असताना, ध्यानीमनी नसताना, ऐन उमेदीच्या काळात, अचानक येणारे मरण. याला वयाची अट नाही. ...J (चर्चा) २२:०३, १० जून २०१३ (IST)Reply

वर्गाचे पान सहजासहजी उघडता येत नाही.
कळले नाही. वर्गातील लेखात वर्गाचे नाव असते. त्यावर टिचकी दिली असता वर्गाचे पान उघडते.
वर्ग केला तर फक्त नावे येतील, माहिती नाही!
वर्ग तयार करताना त्यात वर्गाबद्दलची माहिती घालता येते. प्रत्येक लेखात त्या विषयावरील माहिती असतेच.
अल्पायुषी मरण म्हणजे धडधाकट असताना, ध्यानीमनी नसताना, ऐन उमेदीच्या काळात, अचानक येणारे मरण. याला वयाची अट नाही.
ध्यानीमनी मरण येणारे असे म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर आणि इतर थोर मंडळी. इतरांच्या ध्यानीमनी मरण कसे येणार? मरणाऱ्यांपैकी बहुतांश अजून दोन घटका, दिवस, महिने, वर्षे मिळावी याच आशेत असतो. ज्यांना अशी आशा नसते त्यांपैकी बोलून दाखवणारे किती?

असो वयाची अट नाही म्हणल्यावर या वर्गाचे नाव अचानक मृत्यू आलेले अभिनेते असे करावे. अल्पायुषी म्हणल्यास त्याला वेळ, वर्षे यांची अट असल्याचे वाटते.

अभय नातू (चर्चा) २२:२७, १० जून २०१३ (IST)Reply

उत्तर
"वर्गातील लेखात वर्गाचे नाव असते. त्यावर टिचकी दिली असता वर्गाचे पान उघडते." मुळात लेख असल्याचेच माहीत नाही, तर टिचकी कुठे मारणार?

संजीवकुमार या लेखाच्या खाली वर्ग घातला असता तेथे दिसेल. तेथे टिचकी मारावी.

"वर्ग तयार करताना त्यात वर्गाबद्दलची माहिती घालता येते." हो, फक्त वर्गाबद्दलची माहिती. लेखाबद्दलची माहिती नाही.

दुर्दैवाने विकीवर वर्गांची यादी उपलब्ध नाही. समजा असली तरी ती सापडवणे हे येरागबाळाचे काम नोहे ! यादी झटक्यासरशी सापडण्यासारखी असती, तर कदाचित हा लेख बनवायची गरजच नव्हती.

वर्गांची यादी कशाला हवी? हे कळल्यास सांगता येईल.

पु.ल. देशपांड्यांचा एक किस्सा आहे. पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहाकडे गाडी येत असताना पुलंचे लक्ष मार्गावरच्या दोन रस्त्यांच्या नावांकडे गेले. रस्त्यांना अतिमद्यपानामुळे अकाली मरण पावलेल्या दोन अल्पायुषी नाट्य‍अभिनेत्यांची नावे दिलेली त्यांनी वाचली. पुलं उद्‌गारले, ”आता मला समजले, मोटार या रस्त्यांनी दीनानाथकडे येताना झोकांड्या खात का येत होती !" आता समजा, एखाद्याला या दोन अल्पायुषी नटांची नावे हवी आहेत तर ती त्याने कशी शोधावीत? ’वर्ग’ शोधून काम होईल ?

होय. होईल. लेखांमध्ये अल्पायुषीपणाबद्दल उल्लेख असला (आणि असावाच) तर शोध घेता अनेक असे लेख सहज मिळतिल. त्यातील वर्गावर टिचकी मारल्यास अशा अनेकांची नावे मिळतील.

"ध्यानीमनी मरण येणारे असे म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर आणि इतर थोर मंडळी." जो मरतो त्याच्या ध्यानीमनी हा अर्थ येथे अभिप्रेत नाही, तर मरणाऱ्याच्या संपर्कात किंवा मरणाऱ्याला ओळखणाऱ्या माणसांच्या ध्यानीमनी. तुकाराम मरणार हे इतरेजनांच्या ध्यानीमनी नसावे. अचानक विमान येते आणि तुकोबांना घेऊन जाते, हे कुणाच्या तरी मनात आले असेल? तुकाराम वैकुंठाला चालले आहेत यावर आवडीचा(=आवलीचा=जिजाईचा) विश्वासच नव्हता, तर विमान येईल आणि तुकारामाचे पृथ्वीवरील अस्तित्व संपून जाईल असले काही मनात आलेच नसणार.

कोणाच्या ध्यानीमनी? सगळेच कधीतरी मरणार. कोण कधी मरणार याबद्दल अनेक मते असणार आणि काही खरी होणार, काही नाहीत. तुमचे वरील म्हणणे हे अजिबात तर्कसंगत वाटत नाही.

महात्मा गांधींचा खून त्यांच्या वयाच्या ७९व्या वर्षी झाला. ते वयाच्या १२० वर्षांपर्यंत जगतील असा त्यांचा, आणि त्यांना चाहणाऱ्या लोकांचा विश्वास होता. त्यामुळे ७९व्या वर्षी अकस्मात आलेले मरण हे अल्पायुषी मरण असेच म्हणायला हवे.

मग त्यांना अल्पायुषी म्हणावे? महर्षी कर्वे १०४ वर्षे जगले. १०३व्या वर्षी (आणि १०४व्या सुद्धा) त्यांची प्रकृती ठणठणीत होती असे वाचतो. ते सुद्धा अल्पायुषी?

"अचानक मृत्यू आलेले अभिनेते" हे नाव जास्त योग्य आहे, कबूल. पण केवळ लांबलचक आहे म्हणून टाळले. आणि ’असले’ नाव कसे शोधणार? आणि कुठेतरी ’अल्पायुषी’ नटांची नावे एकत्र वाचायला मिळावी असे नाही वाटत? ...

मला नाही वाटत. पण कोणास वाटले तर ही नावे वर्गात एकत्रित करावी असे मला वाटते.

J (चर्चा) २३:४७, १० जून २०१३ (IST)Reply

० ते २० वर्षे बाल,

२० ते ४० वर्षे युवा
४० ते ६० वर्षे प्रौढ
तर ६०+ वर्षे वृद्ध मानले जातात.

त्यानुसार ४० च्या आतील मृत व्यक्ती ही अल्पायुषी मानली जाते.

पण हा नियम कुठे लिखित आहे की नाही ते माहीत नाही.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:३५, २४ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

बदल केला आहे, कृपया पहावा.--संदेश हिवाळेचर्चा १३:५३, २४ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

वर्गांची यादी कशाला हवी? संपादन

"वर्गांची यादी कशाला हवी? हे कळल्यास सांगता येईल."  :" नावे वर्गात एकत्रित करावी" नावे वर्गात एकत्र करून काय फायदा? मला जर वर्गाचे नावच माहीत नाही, तर लेख कसा शोधता येईल? लेखात फक्त जन्माची आणि मृत्यूची तारीख असते, तो मृत्यू अपघाती आहे, की अल्पायुषी हे बहुधा नसते. "आजाराने अल्पायुषी ठरलेल्या, किंवा अतिरिक्त मद्यसेवनाने अकाली मृत्यू पावलेल्या किंवा अपघातात मरणाऱ्या वा आत्महत्या करणाऱ्या नटांची नावे" या नावाचा वर्ग जरी केला तर त्यातील लेखांची नावे कशी माहीत होणार? अज्ञात वर्गातले समाविष्ट पान उघडायची माझ्या मते काहीच सोय नसते....J (चर्चा) ००:३७, ११ जून २०१३ (IST)Reply

@ आणि अभय नातू: अल्पायुषी अभिनेते म्हणजे कमाल किती वयाचे अभिनेते? ५०-६० वय असणाऱ्यांना अल्पायुषी म्हणावे का? --संदेश हिवाळेचर्चा २३:२२, १३ मार्च २०२० (IST)Reply

कल्पना नाही. सांख्यिकी तत्त्वांनुसार सरासरीपेक्षा एक तरी सिग्मा कमी असलेल्या व्यक्तींना अल्पायुषी म्हणावे. ही आकडेवारी उपलब्ध नसल्याने अल्पायुषी असे विशेषण कोणास लावावे याचा नियम करता येत नाही.
अभय नातू (चर्चा) ०६:४५, १४ मार्च २०२० (IST)Reply
"भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते" पानाकडे परत चला.