"बाळ" हे पान वाचले आणि मला काही शंका मनात आल्या.

बाळ या लेखात बाळाविषयी माहिती अपेक्षित आहे. जसे की नवजात बाळ, त्याचे सरासरी वजन , उंची, हालचाली इत्यादी. तेव्हा "बाळ" या नावापासून सुरु होणाऱ्या नावांचे प्रयोजन काय? विश्वकोशाच्या चौकटीत हे बसते काय? मला असे वाटते की या विषयाचा वेगळा लेख केलेला जास्त चांगला .....

उद्या 'वाघ' या लेखात वाघाच्या माहितीबरोबरच कोणी 'वाघ' या आडनावाच्या माणसांची यादी किंवा माहिती दिली चालेल का? जसे - मोहन वाघ इत्यादी.

मंदार कुलकर्णी

नावात बाळसंपादन करा

नावातील बाळाबद्दलची माहिती वेगळ्या उपशीर्षकात तूर्त घातली आहे. त्याचे वेगळे पान करावे कि नाही यावर मते पाहिजेत.

आता विद्या बाळ किंवा पी. बाळू यांनी आपल्या बाळाचे नाव बाळ ठेवले तर गंमत होईल :-S

अभय नातू १७:४६, २२ मार्च २०११ (UTC)

ता.क. - बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख उपरोधाने टी. बाळू असा झालेला ऐकला आहे, पण त्याला लेखात बहुधा जागा नसावी.

उपशीर्षकसंपादन करा

उपशीर्षकाने हेतू साध्य झाला आहे. वेगळे पान केले तर ’नावात बाळ’ असा शोध कोणी घेईल असे वाटत नाही. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव बाळ आहे, पण आणखी काही आठवत नाही असा प्रसंग ओढवू शकतो. (हा लेख लिहिताना अनेकदा झाला.) त्या व्यक्तीच्या आडनावाचा शोध कसा घेणार? बाळ या लेखात प्रत्येक नावाला दुवे दिल्यामुळे हा अडचण दूर होऊ शकते. अर्धवट माहिती असणार्‍याला पूर्ण माहिती मिळवून देणे हाच तर विकीचा उद्देश आहे.

वाघ आडनावाची पुरेशी प्रसिद्ध माणसे आढळली तर ’बाळ’प्रकारचाच ’वाघ’ असा लेख लिहायला हरकत नसावी.-- J १८:४८, २२ मार्च २०११ (UTC)

उपशीर्षक योग्य आहे का?संपादन करा

मला उपशीर्षक देणे फारसे योग्य वाटत नाही. जर एकाच नावाच्या २ गोष्टी असतील किंवा एकाच नावाचे २ संदर्भ असतील तर आपण विकिपीडिया मध्ये

आणि नि:संदिग्धीकरण करून उदा.

अशा प्रकारे वापरतो. मग बाळ आणि बाळ नावाच्या / आडनावाच्या गोष्टी एकाच लेखात का घालायच्या?

आपण बाळ(आडनाव/नाव) असे शीर्षक देऊन नवीन लेख लिहायला हवा. जो शोधायला ही सोपा जाईल. आणि दोन्ही मध्ये

भरून संदर्भ ही देता येईल.

हा नियम विकीपेडिया वरील सर्व लेखांना लागू करावा अशी माझी नम्र विनंती आहे. मंदार कुलकर्णी

उपशीर्षक दिले होते ते योग्य होतेसंपादन करा

आता मला, बाळ(नाव-आडनाव-वडिलांचे नाव- मेव्हण्याचे नाव-टोपणनाव आदी आदी’ असलेल्या माणसांची माहिती हवी असेल तर मी काय करावे? गूगलवर नुसते बाळ म्हटले की हजारो पानांची जंत्री समोर येईल, तिच्यातून भरपूर वेळ घालवून हवी ती माहिती नक्की शोधता येईल. विकीवर अशी माहिती शोधता येईल? माझ्यासारखा एखादा आलतू फालतू माणूस ‘बाळ(नाव/आडनाव/वडिलांचे नाव वगैरे‘ किंवा ‘बाळ : वर्ग निःसंग्धीकरण’ असले शब्द ’शोध’मध्ये भरून माहिती मिळवू शकणार नाही. लोकांना सहज माहिती मिळवून मिळावी असे वाटत असेल तर त्यासाठी मूळचा बाळ हा लेख पुनरुज्जीवित करावा आणि या नवीन लिहिलेल्या लेखाला ’लहान बाळ’ असे नाव द्यावे.

बाळ नावाची आणखी तीस माणसे मला आठवली आहेत, ती नावे आणि त्या माणसांची माहिती आता कुठे भरायची? -- J ०६:४६, २७ मार्च २०११ (UTC)

बाळ नावाची आणखी तीस माणसे मला आठवली आहेत, ती नावे आणि त्या माणसांची माहिती आता कुठे भरायची
बाळ (नाव/ आडनाव) येथे. ही नावे लिहिताना त्यांचे काम/लक्षणीयताही लिहावी म्हणजे हे कोण असा प्रश्न वाचणार्‍याला पडणार नाही आणि पुढील व्यर्थ वाद टळतील.
नुसते बाळ या शब्दाचा शोध घेतला असता बाळ (नाव/ आडनाव) हे पानही पुढे येईल म्हणजे शोध घेणार्‍याला पाहिजे तर वाचता येईल.
अभय नातू ०७:१८, २७ मार्च २०११ (UTC)


अगदी योग्य.अभय नातू यांनी जे सांगितले तेच माझेही मत आहे.....
मंदार कुलकर्णी ०७:१८, २७ मार्च २०११ (UTC)

शीर्षकातील बदलसंपादन करा

मानवी वाढ व विकासाच्या संपूर्ण कालखंडातील एका कालखंडावरील ("वाढ व विकास" या वर्गातील) हा लेख असल्याने लेखाचे शीर्षक "अर्भकावस्था" असावे असे वाटते. तसेच शीर्षकातील सुसूत्रतेच्या दृष्टीने भ्रूणावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शिशुवय, बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य अशी शीर्षके असावीत असे वाटते.

तसेच यामुळे "बाळ" या शीर्षकातील संदिग्धता दूर होण्यालाही मदत होईल.

सुसूत्रीकरणाची सुरुवात करण्यासाठी "शिशु" या लेखाचे नाव बदलून "शिशुवय" असे बदलले आहे (स्थानांतरण). कारण यात 2 ओळीच मजकूर आहे, या कालखंडाला उद्देशून "शिशुवय" असा उल्लेखही आहे आणि फार जोडण्या नसाव्यात असे वाटते.

तसेच हळूहळू वरील सर्व लेखांचा विस्तार व विकीकरण करण्याचाही विचार आहे.

याविषयीच्या आपल्या काही सूचना असल्यास त्या याच पानावर द्याव्यात म्हणजे सोय़ीचे होईल.

--Rajendra prabhune १३:१८, २५ सप्टेंबर २०१७ (IST)

सदस्य:Rajendra prabhune

"बाळ" पानाकडे परत चला.