चर्चा:प्रतिष्ठाने
"प्रतिष्ठान समाजकार्यांसाठी स्थापन झालेली संस्थेची संज्ञा आहे." म्हणजे काय?
"महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल." ही नावाची व्युत्पत्ती आहे?
- विकिपीडियावर किंवा कोणत्याही ज्ञानकोशात लेखाची सुरुवात करताना लेखविषयाची एखाद्या वाक्यात व्याख्या द्यावी. तुम्हाला अधिक नेमकी (आणि थेट) व्याख्या देता आल्यास जरूर द्यावी.
- तुमचीच वाक्ये काढून न टाकता त्यांचा काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. जर वरील पटले नाही तर खाली लिहीलेला इतिहास लिहावा. अंतुल्यांचा आणि प्रतिष्ठाने शब्दाच्या इतिहासाचा थेट संबंध नाही. लिहिताना मोघम किंवा व्यक्तिगत वाटणारी मते शक्यतो वगळावी.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:५३, ८ एप्रिल २०१३ (IST)
प्रतिष्ठान शब्दाचा इतिहास
संपादनप्रतिभा प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातील आद्य प्रतिष्ठान आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी १९८० साली ’इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले. पुढे या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला इंदिरा गांधी हा शब्द गाळायला लावला.
हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’, प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना, मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेले. (हा इतिहास आहे)
या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी अलाहाबाद बँक आणि कॅनरा बँक यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे, अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला. (हाही इतिहास)
असे असले तरी, या ’प्रतिभा प्रतिष्ठान’ नंतर महाराष्ट्रात प्रतिष्ठाने स्थापन करण्याचे पेव फुटले. आज मितीला महाराष्ट्रात दोनशेच्या आसपास प्रतिष्ठाने असावीत. त्यांतील शैक्षणिक प्रतिष्ठाने ही राजकारणी शिक्षणसम्राटांनी स्थापन केलेली असल्याने त्यांचे संचालक मुख्यत्वे पैसा जमा करण्याचे काम करतात. अर्थात त्याबरोबर शिक्षणप्रसारही होतोच. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठाने सभासदांच्या पैशावर समाजोपयोगी कामेच करतात. महाराष्ट्रात प्रतिष्ठानांचे पंजीकरण करणे सक्तीचे नसल्याने प्रतिष्ठानांची संपूर्ण यादी उपलब्ध नाही. तरीसुद्धा लेखात काही उपलब्ध नावे दिली आहेत....J (चर्चा) ००:३९, ८ एप्रिल २०१३ (IST)
याचे लेखनाव 'महाराष्ट्रामधील प्रतिष्ठाने' असे हवे काय? कारण या लेखात त्यांचाच उहापोह आहे.
न्यास आणि प्रतिष्ठान
संपादन- इंग्रजी विकिपीडियावरील en:Foundation (nonprofit) संदर्भा करिता वापरता येईल.
- याहू अन्सर्स वरील ट्रस्ट आणि फाऊंडेशन मधील नमूद फरक
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१०, ८ एप्रिल २०१३ (IST)