चर्चा:पंढरपूर वारी

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी in topic पंढरपूर वारी

पंढरपूर वारी संपादन

जाऊ देवाचिया गावा, देव देइल विसावा | देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल भूक || घालू देवासीच भर, देव सुखाचा सागर | राही जवळी देवापाशी, आता जड़ोनी पायाशी || तुका म्हणे आम्ही बाले, या देवाची लडिवाले ||

पंढरपूर वारी दरसाल आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून निघत असते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या एकादशीच्या दहा ते पंधरा दिवस आधी या पायी वारी(त्यांना दिंडी असे म्हणतात) चे प्रस्थान होत असते. मुख्य दिंडी पैकी ज्ञानेश्वर माउलींची दिंडी श्री क्षेत्र देवाची आळंदी येथून निघते ती आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखारी या मार्गे पंढरपूरला पोहचते. तसेच संत श्री तुकाराम महाराजांची दिंडी श्री क्षेत्र देहू वरून तर एकनाथ महाराजांची पैठण वरून निघते. अजून काही प्रमुख दिंडी मध्ये नामदेव महाराज, सोपान महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ यांच्या दिंडीचा समावेश होतो.

जेव्हा शेतकरी भर उन्हाळ्या मध्ये पावसाळ्याची वाट बघत असतो. आणि या वर्षी चांगला पाऊस व्हावा म्हणून पंढरपूर च्या पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला पायी वारी मध्ये जातो अशी एक सरळ सरळ आख्यायिका आहे. तशी दिंडी हि ज्ञानेश्वरांनी चालू केलेली पायी वारी आहे. या द्वारे ते समाज प्रबोधन करत पंढरपूर पर्यंत जात. त्यांच्या सोबत आणि नंतर तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज व इतर संतानी त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिंडी अखंड चालू ठेवली.

या दिंडी मध्ये विविध पारंपारिक खेळ खेळले जातात. जसे फुगडी इ. त्यानंतर दिंडी चे प्रमुख आकर्षण म्हणजे रिंगण. दिंडी मध्ये पालखी असते आणि पालखी मध्ये पादुका असतात. पालखी च्या मागे आणि पुढे दिंडीतील वारकरी असतात. हे वारकरी नाचत, भजन आणि नामस्मरण करत मार्गक्रमण करत असतात. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी सर्वजन सोबत जेवतात व झोपतात. आणि सकाळी लवकर उठून परत मार्गस्थ होतात. या मध्ये स्वावलांबनाची शिकवण मिळते. आणि समाजातील बंधूभाव वाढीस लागतो. दिंडी मध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पंथाचे लोक असतात. पण त्यांच्या मुखावर एकाच नाम असते

|| ज्ञानेश्वर माउली तुकाराम ||

Saeekiranbinorkar (चर्चा) १६:५०, ११ मे २०१२ (IST)Reply

@अभय नातू:, पान वगळावे. कारण - प्रशिक्षणादरम्यान अनवधानाने तयार झालेले पान.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:१३, २० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"पंढरपूर वारी" पानाकडे परत चला.