चर्चा:दत्तात्रय पारसनीस

@अभय नातू:, 'दत्तात्रय बळवंत पारसनीस' या पानावरून येथे पुनर्निर्देशन केलेले आहे. वस्तुत: योग्य नाव 'दत्तात्रय बळवंत पारसनीस' आहे. पहा: https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/1 त्यामुळे या पानावरून 'दत्तात्रय बळवंत पारसनीस' येथे पुनर्निर्देशन करावे लागेल. आणि इथला मजकूर तिथे हलवावा लागेल. सध्या नाव चुकीचे असल्यामुळे विकिस्रोतात पारसनीस यांनी लिहीलेले पुस्तक असूनही ते शोध निकालात दिसत नाही. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:३२, १४ मे २०२० (IST)Reply

झाले. -- अभय नातू (चर्चा) १०:३५, १४ मे २०२० (IST)Reply

मराठी मुद्रक, प्रकाशक आणि मुखपृष्ट करणारे चित्रकार यांचे मराठीचे ज्ञान फार मर्यादित असते; अश्या चुका नेहमीच आढळतात. बुकगंगा संकेतस्थळावरही पुस्तकांच्या आणि लेखकांच्या नावांत बऱ्याचदा चुका सापडतात. दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे नाव योग्य आहे, दत्तात्रय नव्हे. त्यासाठी खालील पुस्तकांतील योग्य ती पाने उघडून वाचावी.

  1. TATYA TOPE IMMORTAL FIGHTER OF 1857 (प्रकरण सेन्टर ऑफ रिव्हाॅल्युशन : काल्पी)
  2. Vārṣika itivr̥ṭta: śake 1836
  3. War and Religion: An Encyclopedia of Faith and Conflict [3 ... - Page 574
  4. Issues in Modern Indian History: For Sumit Sarkar - Page 43, वगैरे, वगैरे अनेकानेक पुस्तके. .... (चर्चा) १२:४६, १४ मे २०२० (IST)Reply

@: 'मराठी मुद्रक, प्रकाशक आणि मुखपृष्ट करणारे चित्रकार यांचे मराठीचे ज्ञान फार मर्यादित असले' असे गृहीत धरले तरीही लेखक पुस्तक छापले जात असताना स्वत:च्या नावात चूक होऊ देणार नाही, असे वाटते. त्यांची इतर पुस्तके आपल्याला मिळाल्यास त्यातही नाव बघून घेता येईल. तरीही दोन्ही नावांनी सर्च केला जाईल असे गृहीत धरूनच दोन्ही लेख ठेवून पुनर्निर्देशन करण्यात आलेले आहे. लेखकाचे पुस्तकही या लेखातील दुव्यावरून वाचले जावे, एवढाच हेतू आहे. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:२९, १४ मे २०२० (IST)Reply


@ज्ञानदा गद्रे-फडके: मी ज्या पुस्तकांची नावे वर दिली आहेत, ती उघडून पाहिली का? त्या सर्व पुस्तकांत दत्तात्रेय हेच नाव सापडेल. 'लेखक पुस्तक छापले जात असताना स्वत:च्या नावात चूक होऊ देणार नाही, असे वाटते.' हे नेहमीच होते असे नाही. पुस्तक निर्दोष होते ह्याच्यामागे मुद्रित शोधकांची मेहनत असते. मुद्रित शोधकांना शाधारणपणे फक्त पुस्तकात प्रसिद्ध होणार असणारा मजकूरच तपासायला दिला जातो. मुखपृष्ठ, पुस्तकाचे व लेखकाचे नाव असलेले आतले पहिले पान आणि प्रस्तावना ह्या बाबी मुद्रित शोधकाला बहुधा बघायला मिळत नाहीत. लेखकाला तर पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरच पहायला मिळते, अशी अनेक लेखकांची तक्रार असते.

कविता महाजन यांचे बोलणे आणि लिहिणे अशुद्ध होते, हे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. पण त्यावरून कविता महाजन यांच्या श्रेष्ठपणाला बाधा येत नाही. प्रयत्न करूनही त्या मुलाखतीचे तपशील मला सध्यातरी आंतरजालावर सापडलेले नाहीत; सापडले की जरूर काॅपी-पेस्ट करीन. ..... (चर्चा) २१:००, १४ मे २०२० (IST)Reply

"दत्तात्रय पारसनीस" पानाकडे परत चला.