चर्चा:डीडब्ल्यू न्यूझ
Latest comment: २ वर्षांपूर्वी by अमर राऊत in topic न्यूज की न्यूझ?
न्यूज की न्यूझ?
संपादन@अभय नातू: नमस्कार, तुम्ही हा लेख डीडब्ल्यू न्यूज" वरून "डीडब्ल्यू न्यूझ"ला हलवला. मला वाटते "न्यूज" हा शब्द बरोबर आहे. कारण देशातील ज्या ज्या वृत्तवाहिन्यांच्या नावात news शब्द आहे, तिथे सगळीकडे "न्यूज" असे लिहले आहे. उदाहरणार्थ झी न्यूज, एबीपी न्यूज. सरकारी प्रसारक असलेल्या दूरदर्शननेही "डीडी न्यूज"च नाव वापरले आहे. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) ११:५६, १२ जुलै २०२२ (IST)
- @अमर राऊत:
- येथे न्यूझ हा अचूक उच्चार आहे.
- News हा इंग्लिश शब्द आहे. त्याचे लिप्यंतरण (भाषांतर नव्हे) करताना मूळ भाषेतील उच्चार ठेवला पाहिजे. यातील शेवटच्या अक्षराचा उच्चार ज (जपान, जानकी, इ.) न होता झ (झाड, झावळ्या) असा होतो.
- हिंदीमध्ये Newsचे लिप्यंतरण करताना न्यूज हे चूक आहे. फारतर न्यूज़ असे होईल. मराठीमध्ये नुक्ता नाही तरी अशा ठिकाणी ज अक्षर वापरता येणार नाही.
- अभय नातू (चर्चा) १९:११, १२ जुलै २०२२ (IST)
- @अभय नातू: मराठीत हिंदीप्रमाणे नुक्ता वापरत नाहीत. त्यामुळे "जपान, जिव्हाळा,जानकी" आणि "जाड, जसा, जात" दोन्ही प्रकारच्या शब्दांसाठी "ज" असेच लिहिले जाते. "न्यूज"मधील "ज" साठी जपानमधील "ज" चालणार नाही, हे मान्य. पण "जाड" मधला "ज" वापरला तरी योग्य ठरेल, असं माझं मत आहे.
शिवाय न्यूझ शब्द इतरत्र कुठे वापरलेला दिसत नाही. सगळीकडे "न्यूज" असाच शब्द वाचनात येतो. अमर राऊत (चर्चा) १९:४१, १२ जुलै २०२२ (IST)
- @अमर राऊत:
- जपानचा ज किंवा जाडचा ज लिहिताना मराठीत वेगळे लिहिले जात नाही. हे झाले ज अक्षर वापरण्याजोगे असले तर.
- प्रस्तुत शब्द न्यूज असा हिंदीमध्ये लिप्यंतरित केलेला आढळतो. मराठीमध्ये हिंदीतून त्याचे लिप्यंतरण केल्यास न्यूज होणे साहजिक आहे. वर लिहिल्याप्रमाणे मूळ भाषेतील (इंग्लिश) उच्चारांच्या शक्य तितके जवळ लिप्यंतरण करणे आवश्यक आहे. येथे जाडचा ज वापरला तर तो मूळ उच्चाराच्या जवळ जात नाही, जितका झाडचा झ जातो.
- इतरत्र वापरलेला नाही हे कारण लावू नये कारण अनेक ठिकाणी इंग्लिश (किंवा इतर भाषांमधून) मराठीत लिप्यंतरण किंवा भाषांतर करताना अतिशय गचाळ आणि गलथानपणे हे केलेले दिसते. दूरचित्रवाणीवरील अनेक तथाकथित मराठी जाहिराती यांचे उत्तम उदाहरण आहे.
- अभय नातू (चर्चा) १९:४६, १२ जुलै २०२२ (IST)
तुमचा मुद्दा समजला मला, पण "न्यूज" असाच शब्द प्रचलित आहे. कुठलाही सामान्य माणूस विकिपीडियावर शोध घेताना "न्यूज" असाच घेईल. अमर राऊत (चर्चा) १९:५०, १२ जुलै २०२२ (IST)
- @अमर राऊत:
- "न्यूज" असाच शब्द प्रचलित आहे. कुठलाही सामान्य माणूस विकिपीडियावर शोध घेताना "न्यूज" असाच घेईल.
- म्हणून न्यूज --> न्यूझ असे पुनर्निर्देशन असावे. असे केल्याने शोध करताना पान सापडेल तसेच शुद्धलेखनाची तडजोड करावी लागणार नाही.
- अभय नातू (चर्चा) १९:५३, १२ जुलै २०२२ (IST)
- @अभय नातू: ठीक आहे. तुमच्या मार्गदर्शनासाठी आभार. अमर राऊत (चर्चा) १९:५६, १२ जुलै २०२२ (IST)