चर्चा:जयश्री गडकर
जयश्री गडकरांचा जन्म मार्च २१, १९४२ रोजी कारवार जिल्ह्यात झाला.
आता कर्नाटकात कारवार जिल्हा नाही. कारवार उत्तर कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. १९४२मध्ये कारवार असा जिल्हा होता का?
अभय नातू १६:३५, २ ऑक्टोबर २००८ (UTC)
- किंबहुना इ.स. १९४२ सालात कर्नाटक राज्य आणि भारतही नव्हता. :P.. त्यावेळेला ब्रिटिश भारतात कारवार परिसराचा समावेश मुंबई प्रांतात व्हायचा. तपशील चुकलाय असे वाटते. योग्य ती दुरुस्ती करावी. (जन्मदिनांकाबरोबरीने जन्मस्थान देताना काही वेळा सध्याचे भूराजकीय वर्णन लिहितात; तर काही वेळा तत्कालीन वर्णन लिहितात. कुठली पद्धत स्वीकारावी?)
- --संकल्प द्रविड (चर्चा) १७:०९, २ ऑक्टोबर २००८ (UTC)
इंग्लिश विकिपीडियानुसार - The British made this place their district headquarters in 1862. याहून अधिक माहिती सापडली नाही. तरी मला वाटते हा जिल्हा होता व त्याचे नंतर पुनर्नामकरण करण्यात आले असावे. एखादा कारवारी आपल्याला अधिक माहिती देऊ शकेल.
जन्मदिनांकाबरोबरीने जन्मस्थान देताना काही वेळा सध्याचे भूराजकीय वर्णन लिहितात; तर काही वेळा तत्कालीन वर्णन लिहितात. कुठली पद्धत स्वीकारावी?
मला वाटते त्याकाळची माहिती द्यावी व त्याचे आजच्या संदर्भात वर्णन करावे - उदा. जयश्री गडकरांचा जन्म मार्च २१, १९४२ रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात (आताचा उत्तर कन्नड जिल्हा) झाला. किंवा लालकृष्ण अडवाणींचा जन्म कराची, ब्रिटिश भारत (आताचे पाकिस्तान) येथे झाला.
अभय नातू १७:१८, २ ऑक्टोबर २००८ (UTC)
Start a discussion about जयश्री गडकर
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve जयश्री गडकर.