चर्चा:गर्भारपण
यातील 'वैद्यकिय तपासण्या' मधील नुकताच टाकलेला मजकुर कृपया उलटवा. वि. नरसीकर (चर्चा) १०:४८, १६ डिसेंबर २००९ (UTC)
- उलटवले. धन्यवाद, नरसीकर! --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:४३, १६ डिसेंबर २००९ (UTC)
आणि
"गर्भावस्था" हा लेख गर्भारपणाविषयी (Pregnancy) आहे. त्यामुळे हा लेख "गर्भारपण" या नावाने आणि गर्भावस्थेविषयी "गर्भ" हा लेख "गर्भावस्था" या नावाने पुनर्निर्देशित करावा असे वाटते.
मानवी वाढ व विकासाच्या संपूर्ण कालखंडातील एका कालखंडावरील ("वाढ व विकास" या वर्गातील) हे लेख असल्याने लेख-नावांतील सुसूत्रतेच्या दृष्टीने लेख-नावे भ्रूणावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शिशुवय, बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य अशी असावीत असे वाटते. त्यानुसार "गर्भ" या लेखाचे नाव "गर्भावस्था" असावे असे वाटते. पण तो लेख "गर्भ" या नावाने आहे.
सुसूत्रीकरणाची सुरुवात करण्यासाठी "शिशु" या लेखाचे नाव बदलून "शिशुवय" असे बदलले आहे (स्थानांतरण). कारण यात 2 ओळीच मजकूर आहे, या कालखंडाला उद्देशून "शिशुवय" असा उल्लेखही आहे आणि फार जोडण्या नसाव्यात असे वाटते.
याविषयीच्या आपल्या काही सूचना असल्यास त्या याच पानावर द्याव्यात म्हणजे सोय़ीचे होईल.
--Rajendra prabhune १२:५४, २५ सप्टेंबर २०१७ (IST)
- Thanks a lot sir for discussing this very important point here. In my opinion, गर्भ = Fetus and गर्भावस्था = Pregnancy. गर्भारपण = Pregnancy = गर्भावस्था. गर्भारपण = गर्भावस्था for sure. गर्भारपण is a word used in spoken language whereas गर्भावस्था is a scientific terminology.
- There is a great dispute on WP if articles should be written from neutral point of view of scientific point of view. Most of the times neutral point of view is scientific point of view. There is no problem then. But the real problem occurs when neural point of view is not scientific point of view. Here as there is no such dispute, surely गर्भावस्था can be the original article and either by redirecting or in definition it can be implied that गर्भारपण = गर्भावस्था. Thank you for this opportunity of discussion. -- आभिजीत १३:०६, २६ सप्टेंबर २०१७ (IST)
- तटस्थ दृष्टीकोण आणि वैज्ञानिक दृष्टीकोण हा वाद काय आहे हे माहित करून घेण्यास हरकत नाही पण अद्याप मराठी विकिपीडियावर असा काही विषय चर्चीला गेलेला नाही - आणि लगेच चर्चीला पाहीजे असेही नाही. मराठी विकिपीडिया इंग्रजी विकिपीडियाच्या निती न स्विकारता स्थानिक मराठी निती काळाच्या ओघात तयार होऊ देण्यावर भर देतो त्यामुळे डॉ. प्रभुणेंनी त्याचा ताण लगेच घेण्याची गरज आहे असेही नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४१, २६ सप्टेंबर २०१७ (IST)
मराठी विश्वकोशातील संदर्भ
"गर्भारपणा: गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या काळाला गर्भारपणा किंवा गर्भिणी-अवस्था असे म्हणतात." https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7292
मानसशास्र
विकासात्मक मानसशास्त्रामध्ये गर्भावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य, वार्धक्य या अवस्थांचाही शारीरिक-मानसिक दृष्ट्या अभ्यास करण्यात येतो. त्या त्या अवस्थेतील विकासास पोषक तसेच बाधक ठरणारे घटक, त्या ...
मराठी विश्वकोशातील वरील संदर्भांनुसार गर्भारपणा (Pregnancy) ही स्त्रीची गर्भार असण्याची अवस्था आहे आणि गर्भावस्था ही माणसाच्या वाढ-विकासातील गर्भाची ((Fetus) अवस्था आहे. "गर्भारपण" म्हणजे "गर्भावस्था" नव्हे. या बाबतीत गोंधळ नसावा.
मराठी विकीपेडियावरील (स्त्रीच्या) Pregnancy विषयीचा लेख चुकून "गर्भावस्था" या नावाने लिहिला गेलेला आहे. त्यामुळे हा लेख "गर्भारपणा" या नावाने आणि (गर्भाच्या) गर्भावस्थेविषयी "गर्भ" हा लेख "गर्भावस्था" या नावाने पुनर्निर्देशित करावा असे वाटते.
पारिभाषिक शब्दांविषयी मराठी विश्वकोशाचा (अती)काटेकोरपणा आणि आग्रह आपल्याला माहीत असल्याने त्यावरील पारिभाषिक शब्दांविषयी संशय नसावा आणि त्यामुळे मराठी विकीवर ते शब्द वापरण्यास हरकत नसावी असे वाटते.
--Rajendra prabhune १२:५२, २९ सप्टेंबर २०१७ (IST)
गर्भ पानावरील मजकुराचे विलिनीकरणास्तव स्थानांतरण
संपादन[[चित्र:Gray38.png|thumb|right|गर्भाशयस्थित गर्भ, पाचव्या ते सहाव्या महिन्यादरम्यान]]
सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म यांदरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय.
==हे सुद्धा पहा==
[[वर्ग:जीवशास्त्र]] [[वर्ग:वाढ व विकास]]
माझे म्हणणे - "गर्भावस्था" हा लेख आधी "गर्भारपणा" (स्त्रीची गर्भार अवस्था) नावाने पुनर्निर्देशित करावा.
आणि हे केल्यानंतर गर्भावस्थेविषयीचा "गर्भ" हा लेख (मूळ तसाच ठेवून)"गर्भावस्था" या नावाने पुनर्निर्देशित करावा. नाहीतर फलित बीजांड, (मानवी) भ्रूण* (Embryo), आणि गर्भाच्या (Fetus) वाढ व विकासाची माहिती कोणत्या लेखात देणार?
- नुसता भ्रूण नावाचा लेख आहे
"गर्भारपणा" (Pregnancy) या लेखाचा उद्देश गर्भारपणाच्या 9 महिन्यांच्या काळात मातेत होणारे बदल, मातेची काळजी, औषधोपचार इत्यादींसंबंधी माहिती देणे हा असावा आणि "गर्भावस्था" लेखाचा उद्देश गर्भाची वाढ व विकास एका फलित बीजांडापासून कसा होतो हा आहे.
--Rajendra prabhune १४:२९, २९ सप्टेंबर २०१७ (IST)
- पाने आता बरोबर झाली आहेत का पहावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५९, २९ सप्टेंबर २०१७ (IST)
पाने आता बरोबर झाली आहेत. वाढ व विकासातील टप्पे व त्यांची नावे आणि लेखातील वर्णने आणि शीर्षके यांतील सुसूत्रतेच्या दृष्टीने ते मला आवश्यक वाटत होते. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तसेच विश्वकोशातील टप्प्यांच्या नावांनुसार “किशोरवय” या लेखाचे शीर्षक “कुमारावस्था” असे असायला हवे होते. ती चूक माझ्याकडून राहून गेली आहे. ती दुरुस्ती आणि त्यानुसार “कुमारावस्था” आणि “पौगंडावस्था” या लेखांतील बदल मी यथावकाश करीनच.
तसेच विकीपेडियावर “किशोरावस्था” या टप्प्याचा लेखच नाही त्याचाही समावेश करावा लागेल.
या सर्व बदलांवरही आपण लक्ष ठेवावे व वेळोवेळी सूचना कराव्यात ही विनंती.