चर्चा:गणपती
लेख छान तयार झाला आहे, पूर्ण झाल्यास मासिक सदर म्हणून सुचवा. पाठिंबा द्यायला केव्हाही तयार
अजयबिडवे ०९:४४, ६ फेब्रुवारी २००९ (UTC)
लेख चांगला आहे. फक्त धर्मशास्त्र या विषयाची संशोधक म्हणून मला त्यात काही सुधारणा कराव्याशा वाटत आहेत. तेवढ्या करण्याचा प्रयत्न करते.आर्या जोशी (चर्चा)
भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही गणपतीचा जन्मदिवस नाही. ते गाणपत्य संप्रदायाचे एक व्रत आहे आर्या जोशी (चर्चा)
आवश्यकता
संपादन१) गणपती / गणेश या विषयावर मराठी विकिपीडियावर बरेच संबंधीत लेख आहेत. वाचकांच्या सुविधेसाठी साचा:गणपती असा तळसाचा लेखाच्या तळाशी लावण्यासाठी कुणी बनवून दिल्यास हवा आहे.
2) सोबतच गणपती (निःसंदिग्धीकरण) आणि गणेश (निःसंदिग्धीकरण) पाने बनवून हवी आहेत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२९, २७ जुलै २०१७ (IST)
गणेशोत्सव नजीक आला आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखात काही सुधारणा आवश्यक वाटत आहेत. त्या करण्यासाठी साचा लावीत आहे. आर्या जोशी (चर्चा) १६:५९, २३ ऑगस्ट २०१८ (IST)
या लेखात एक भला मोठा मजकूर हा प्रत्यक्ष या लेखाशी संदंधित नसलेला असा होता. तो काढला आहे मी. तो मजकूर खात्रीशीर असल्याचा संदर्भही नोंदवलेला दिसला नाहि. हा लेख मुखपृष्ठावर येऊन छेल्याचे लक्षात येते आहे. माझ्यासह आपण सर्वच संपादकांनी या गोष्टीकडे विशेषलक्ष देणे आवश्यक वाटते. ही काळजी सर्वांनीच घेऊया. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०८:२४, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
@आर्या जोशी: आपण येथे जाऊन संदर्भ सुधारू शकता, ह्या लेखामध्ये अनेक संदर्भ साध्या रुपात दिलेले आहेत जे सुधारण्याची आवश्यकता आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:२०, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
@Sureshkhole: धन्यवाद! नक्की वापरते. आधी लेखाचे स्वरूप नेमके करते आणि मग आवश्यक ते संदर्भ नोंदविते. आर्या जोशी (चर्चा) १८:३६, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
@अभय नातू: नमस्कार ! या लेखात गणपतीविषयक अनेक आख्यायिका यापूवी नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामध्ये पुनरुक्ती बरीच दिसते आणि यांचे अचूक संदर्भही सापडणे कठीण जात आहे. असा मजकूर काढून टाकावा की ठेवावा? लेख विस्तृत आहे खूप त्यामुळे नव्या माहितीची भर घालताना प्रश्न पडतो आहे की लेखाचा विस्तार नेमका किती करावा? यात पूर्वी नाहीत पण आता घालता येतील असेही महत्वाचे मुद्दे अजूनही शिल्लक आहेत. मार्गदर्शन करावे. मुखपृष्ठ सदरात बदल करताना आपले मार्गदर्शन महत्वाचे वाटते आहे. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा) ०७:५६, १ सप्टेंबर २०१८ (IST)