चर्चा:गजानन महाराज
चमत्कार व अलौकिक शक्ती.
संपादनगजानन महाराजांच्या चमत्कारांबद्दल एक वेगळा लेख करून त्यात त्यांनी घडवलेल्या चमत्कारांबद्दल माहिती द्यावी असे माझे मत आहे. तसेच या लेखातील पी.ओ.व्हि टेक्सट बरेच आहे,लेख पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रबंधकांना विनंती आहे की योग्य ते बदल करावेत.
अजयबिडवे १४:४३, १३ जुलै २००९ (UTC)
- या लेखातील बरेचसे लेखन नवख्या अनामिक सदस्याकडून झाले आहे.सदस्याची स्वतःची मते आणि दासगणू महाराजांच्या पोथीतील संदर्भासहीत मते कोणती याचा फरक सांगणे ज्यांनी ती पोथी वाचली नाही त्यांना कळणे कठीण आहे.मला वाटते जाणकार चा साचा लावावा.
Mahitgar १५:४१, १३ जुलै २००९ (UTC)
हा उल्लेख का गाळला?
संपादनसंदर्भासहीत असलेला हा उल्लेख का गाळला? ते कळले तर बरे होईल. महाराजांनी इगतपुरीजवळील मुकना नाल्यापाशी असलेल्या कपिलधारा तीर्थावर तप केले आणि
चित्र जोडणे
संपादनखूप प्रयत्न केला पण चित्र जोडले जात नाही. कृपया मदत करावी संतोष गोरे (चर्चा) ०१:१७, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)
तुम्ही लेखात वापरत आहात ते चित्र विकिमिडिया कॉमन्सचे नसून इंग्रजी विकिपीडियाचे आहे म्हणून ते इंग्रजी विकिपीडिया शिवाय इतर कुठेही वापरता येत नाही. --संदेश हिवाळेचर्चा १३:४५, १६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:४५, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)
सदर लेखात अविश्वकोशीय मजकूर पुष्कळ आहे. तसेच चमत्कार आणि त्यासंबंधी गोष्टी प्राबल्याने आहेत त्यामुळे यालेखातील मोठा मजकूर काढून टाकत असून लेख विश्वकोशीय लेखनास अनुसरून सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे.--आर्या जोशी (चर्चा) १९:१७, १४ फेब्रुवारी २०२० (IST)