चर्चा:केंद्रीकृत बँकिंग प्रणाली

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय होतू

@अभय नातू:

केंद्रीकृत हे चुकीचे व केन्द्रीकृत हे बरोबर ..... असे का?

--अभय होतू (चर्चा) १८:२८, ३ डिसेंबर २०१७ (IST)Reply

केन्द्र हे शुद्धलेखन वापरले गेलेले पाहिले आहे. मला यामागची कारणे नक्की माहिती नाही.
@: सांगू शकतील.
अभय नातू (चर्चा) ००:१२, ४ डिसेंबर २०१७ (IST)Reply

--- मराठीत केन्द्र असे लिहिण्याची गरज नाही. केंद्र हेच प्रचलित आहे. केन्द्र हे हिंदी-संस्कृत लिखाण झाले.

दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प असे पर-सवर्ण वापरून केलेले लिखाण मराठीत अशुद्ध समजले जाते. मात्र असे लिखाण खाली शब्दांत करणे आबश्यक आहे. - अॅन्ड, बॉम्ब, वेदान्त, देहान्त वगैरे...

... (चर्चा) ००:३४, ४ डिसेंबर २०१७ (IST)Reply


मराठीत केंद्र आणि हिंदीत केन्द्र हे बरोबर आहे. जसे मराठीत मुंबई आणि हिंदीत मुम्बई. --अभय होतू (चर्चा) ०७:०७, ४ डिसेंबर २०१७ (IST)Reply

"केंद्रीकृत बँकिंग प्रणाली" पानाकडे परत चला.