केंद्रीकृत बँकिंग प्रणाली
केन्द्रीकृत बँकिंग प्रणाली ही एकाच ठिकाणी असलेल्या केन्द्रीय संगणकाद्वारे चालविलेली बँकिंग प्रणाली आहे.
यात बँकेच्या सर्व शाखा एका केंद्रीय संगणकाला जोडल्या जातात. सर्व ग्राहकांची माहिती या केंद्रीय संगणकात साठवलेली असते. त्यामुळे बँकेचा ग्राहक कुठल्याही शाखेत गेला तरी त्याच्या खात्याची माहिती उपलब्ध होते. ग्राहक आपली बँकेची कामे कुठल्याशी शाखेतून करू शकतो. संगणकीकृत केंद्रीय प्रणालीमुळे वेळेची बचत, त्वरित व्यवहार, व्यवहाराची अचूकता अशा अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. या प्रणालीमुळे बँकेच्या अंतर्गत व्यवहारांचे प्रमाणीकरण शक्य होते.
इन्फोसिसची फिनॅकल, ओरॅकलची फ्लेक्सक्यूब, टीसीएसची बँक्स, तेमेनोसची टी२४ हे केंद्रीकृत संगणक प्रणालींचे नमुने आहेत.