चर्चा:कसारा लोकल
Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic उल्लेखनीयता
उल्लेखनीयता
संपादन@अभय नातू:, @संतोष गोरे: खरंच या पानाची आवश्यकता आहे का? या पानावर फक्त कसारा लोकल कुठून कुठे धावते आणि कोणत्या मार्गावर जलद कुठे धिमी एवढीचं माहिती आहे आणि यासाठी लेखाची आवश्यकता असावी असे मला वाटत नाही म्हणून मी काल ते पान पुनर्निर्देशित केले होते. तसेच जर कसारा लोकल पान असू शकते मग सर्व प्रमुख स्थानकांची पाने निर्माण होऊ शकतात जसे पनवेल लोकल, कर्जत लोकल, इ. कृपया याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. Khirid Harshad (चर्चा) १०:३८, २५ जून २०२२ (IST)
- मला वाटते असावे. वाटल्यास इतर चर्चा येथे नवीन चर्चा सुरू करावी. संतोष गोरे ( 💬 ) १५:२७, २५ जून २०२२ (IST)
- @Khirid Harshad:
- आपण मुंबईच्या सुदूर उपनगरांत रहात असाल तर तुम्हाला माहिती असेलच की कर्जत आणि कसारा लोकल यांना मुंबईच्या चाकरमान्यांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. अंदाजे दोन तास एकमार्गी प्रवास करणाऱ्या या गाड्यांमधून अनेक विशिष्ट प्रथा आहेत, जसे -- रोज/नेहमी एकत्र प्रवास करणारे कंपू, त्यांतील एखादा येण्यास उशीर झाला तर त्याच्यासाठी जागा अडवून ठेवणारे ओळखीचे किंवा अनोळखी मित्र, वाढदिवस/लग्न साजरे करणे, भजनमंडळी, पत्तेकंपू, इ.
- या व इतर अनेक कारणांसाठी या दोन लोकल उल्लेखनीय ठरतात.
- याहून महत्वाचे म्हणजे तुम्हाला एखादा लेख उल्लेखनीय न वाटल्यास त्यावर {{उल्लेखनीयता}} साचा लावावा. परस्पर लेख उडवू नयेत. इतर संपादकांनी वेळ घालवून लिहिलेल्या लेखांत उत्पातत किंवा वात्रटपणा नसल्यास ते लेख थेट घालवू नयते. अशाने संपादकांमध्ये तेढ निर्माण होत व नसते वाद उभे राहतात.
- धन्यवाद.
- cc: @संतोष गोरे:
- अभय नातू (चर्चा) ०६:३६, २७ जून २०२२ (IST)