चर्चा:उमरगाम विधानसभा मतदारसंघ

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by अभय नातू

ह्या मतदारसंघाचे नाव उंबरगांव असे आहे. मतदारसंघ क्रमांक १८२ असून हा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. [१] अभय पेठे (चर्चा) १२:३२, १९ जुलै २०२० (IST)Reply

वरील दुवा उघडत नाही आहे. हा मतदारसंघ गुजरामध्ये असून या गावाचे गुजरातीमध्ये नाव उमरगाम आहे.
अभय नातू (चर्चा) ०२:१९, २० जुलै २०२० (IST)Reply
गुजरात राज्यात दोन गावे आहेत, १) उंबरगाव, वलसाड जिल्हा आणि २) उमरगाम, वालिया तालुका, भरूच जिल्हा.

उंबरगाव, वलसाड जिल्हा हे गाव आधी ठाणे जिल्ह्यात होते. ह्या गावाचे नाव जनगणनेत आणि महसूल खाते, गुजरात इथे अजून उंबरगाव आहे. ह्या नावाचा मतदारसंघ असून क्रमांक १८२ असा आहे. ह्या विकीत उल्लेख झालेले छबीभाई पटेल हे अबदासा अबडासा मतदारसंघ, कच्छ जिल्हा येथून निवडून आले आहेत. उमरगाम, वालिया तालुका, भरूच जिल्हा हे गाव झगाडीआ, क्र १५२ च्या मतदारसंघात येते. ह्या नावाचा वेगळा मतदारसंघ नाही. https://ceo.gujarat.gov.in/download/Detail_Report_AC2012.pdf ह्या अहवालात उंबरगाव मतदारसंघ, छबीभाई पटेल, झगाडीआ झघडिया मतदारसंघ ह्या सर्वांचा उल्लेख सापडेल.

अजून् एक दुवा उमरगाम गावाचा नकाशा - https://revenuedepartment.gujarat.gov.in/downloads/bharuch_valia.pdf
अभय पेठे (चर्चा) १०:०२, २० जुलै २०२० (IST)Reply
वरील दुवेही उघडत नाही आहेत. नंतर पुन्हा प्रयत्न करेन.
एकंदरीत गुजरातीमध्ये गावांची नावे मराठी, इंग्लिश किंवा इतर भाषांपेक्षा वेगळी असू शकतात. अनेकदा गुजरातमधील दस्तऐवजांमध्येही गावांचे नाव वेगवेगळे लिहिले जाते, उदा. वडोदराचा उल्लेख हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजरातीमध्ये अनुक्रमे बडौदा, बरोडा, बडोदा, वडोदरा असा होतो. स्थानिक (व अधिकृत) नाव हे वडोदरा आहे.
गांव/गाव --> गाम हे याचे नेहमी आढळणारे उदाहरण आहे. नावांचा उल्लेख शक्यतो स्थानिक उच्चारांप्रमाणेच असावा हा मराठी विकिवरील संकेत आहे.
तरीही पुन्हा एकदा वर दिलेले दुवे उघडून पाहतो.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:२६, २० जुलै २०२० (IST)Reply
ठीक आहे. परंतु माझ्या मते अधिक्रुत नोंद हेच मुळ नाव वापरावे. स्थानिक अपभ्रंश दुसरे नाव म्हणून लिहावे असा माझा विचार आहे. अशा वापराने त्रयस्थपणा राखला जाउ शकतो उदा. वेसावे का वर्सोवा, इर्ला पार्ला का विले पार्ले? गुजरात राज्य महसुल खाते, जनगणना अहवाल, इ-कोर्टस, रिजर्व बँक अशा अनेक ठिकाणी ह्या गावाचा उल्लेख उंबरगांव असा आढळतो. काही ठिकाणी उमरगाम लिहिले जाते. त्यासाठी वलसाड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे अधिक्रुत नावाची चौकशी केली आहे, उत्तर अपेक्षीत आहे. मतदारसंघ उंबरगांव नावानेच आहे.
वासुदेव गोपाळ परांजपे ह्या लेखात देखील उंबरगाव असाच उल्लेख आहे. ह्या गावावर मराठीत काही लेख नाही, माझा लिहायचा विचार होता. तुम्ही देखील लेख कुठल्या नावाने लिहावा ते कळवा. धन्यवाद.

अभय पेठे (चर्चा) २३:०२, २० जुलै २०२० (IST)Reply

अधिकृत नावांतही भाषा/लिपीमध्ये फरक पडतो. वरील मी दिलेल्या उदाहरणा वडोदरा महापालिका गुजरातीमध्ये नाव वडोदरा महानगरपालिका असे तर हिंदीमध्ये अनेकदा बडौदा महानगरपालिका असे लिहिते.
अमदावाद (गुजराती), अहमदाबाद (इंग्लिश, हिंदी), इ. अनेक उदाहरणे सापडतील.
परांजपे यांचे लिखाण मराठीत आहे का? मग नावांचे उल्लेख मराठी प्रकारानेच असणार असे गृहित धरतो. पुण्याचा उल्लेख (अद्यापही) पूना असलेले अनेक संदर्भ सापडतील पण त्यानुसार लिखाण बदलू नये.
जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. चौकशी गुजरातीमध्ये केली कि मराठी/हिंदी/इंग्लिशमध्ये? :-)
अभय नातू (चर्चा) १७:०४, २१ जुलै २०२० (IST)Reply
परांजपे लिखाण मराठीतच आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी सद्ध्या इंग्रजी भाषेतील विपत्राने केली आहे. गरज पडल्यास माहिती अधिकाराचा वापर केला जाउ शकतो. पण ते फक्त अधिक्रुत नावाची खात्री करण्यास उपयुक्त ठरेल.
अर्थात सरकारी उत्तरे कधी / कशी मिळतिल ह्या बद्दल अनिश्चित्तता राहणारच, कोविडच्या काळात तर जास्तच.
लेखाचे शीर्षक काय असावे हा मुद्दा राहतो.
वेगवेगळे वापर शोधून ठेवले आहेत. जे गावावरिल लेखात नमूद करायचा विचार आहे. वाचणारा विचार करून योग्य वापर करू शकतो.
अभय पेठे (चर्चा) १९:५५, २१ जुलै २०२० (IST)Reply
चिकाटीने पाठपुरावा करीत असल्याचे पाहून आनंद झाला.
जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत शीर्षक आहे तेच ठेवावे. खात्री झाली की लगेचच बदलावे. तोपर्यंत इतर उच्चारांपासून पुनर्निर्देशने करावी म्हणजे त्यांचा शोध घेणाऱ्यासही लेख सापडेल. प्रस्तुत लेखासाठी उंबरगाव विधानसभा मतदारसंघ हे पान तयार केले आहे.
इतर ठिकाणीही नमूद करा. तेथेही वर उल्लेखिलेले संकेत ध्यानात ठेवावेत ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०७:४६, २२ जुलै २०२० (IST)Reply
  1. ^ "मुख्य निवडणुक अधिकारी, गुजरात राज्य".
"उमरगाम विधानसभा मतदारसंघ" पानाकडे परत चला.