उमरगाम विधानसभा मतदारसंघ

(उंबरगाव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

उमरगाव विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. उमरगाम हे ह्या मतदारसंघातील प्रमुख नगर आहे.

समाविष्ट

संपादन

ह्या मतदारसंघामध्ये २७५ मतदान कक्ष आहेत. संपूर्ण यादी मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात राज्य ह्यांच्या संकेतस्थळावर [] उपलब्ध आहे. जिल्हा “२५-वलसाड” आणि मतरसंघ “१८२-उंबरगांव” असे निवडावे.

आमदार

संपादन

२०१७ च्या निवडणुकीत येथून रमणलाल नानूभाई पाटकर(भाजप) निवडून आले आहेत. त्यांनी अशोकभाई मोहनलाल पटेल (काँग्रेस) ह्यांचा ४१,६९० मतांनी पराभव केला.

हा मतदारसंघ लोकसभेच्या वलसाड मतदारसंघात समाविष्ट आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथून के सी पटेल (भाजप) निवडून आले आहेत.

२०१७ विधानसभा निवडणुका

संपादन

मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात राज्य ह्यांच्या संकेतस्थळावर [] ह्या निवडणुकांचा सांख्यिकीय अहवाल ठेवला आहे. खाली लिहिलेली माहिती ह्या अहवालातून घेतलीआहे. पृष्ठसंख्या “PDF, अहवाल” ह्या संकेताने लिहिली आहे.

  • निवडणूक १३० ठिकाणच्या २३७ मतदार कक्षात घेतल्या गेल्या. (पृष्ठ - २०६, १९०)
  • एकूण मतदान २,४४,४८२ लोकांनी केले, ज्यात १,३०,५१५ पुरुष आणि १,१३,९६७ स्त्रिया होत्या (पृष्ठ - २३५, २१९)
  • एकूण ११ उमेदवारी अर्ज आले, त्यातील ४ बाद केले गेले. उरलेल्या ७ उमेदवारांत निवडणूक घेण्यात आली. ५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. (पृष्ठ - २६२, २४६)
  • ७ पैकी ३ उमेदवार राष्ट्रीय स्तरावरील पक्षांचे होते, २ इतर पक्षांचे तर २ अपक्ष होते. (पृष्ठ - , २७०, २५४)
  • २,४४,४८२ पैकी १,५७,४९० जणांनी मतदार यंत्राचा वापर केला. २३८ जणांनी पत्राद्वारे मतदान केले. अशातऱ्हेने १,५७,७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६४.४२% टक्के मतदान झाले. (पृष्ठ - ३१५, २९९)
  • मतदार यंत्र वापरणारे ७९,३८८ पुरुष होते आणि ७८,१०२ स्त्रिया होत्या. (पृष्ठ - ३२९, ३१३)
  • नोटाला २,७४५ जणांनी यंत्राद्वारे तर ५ जणांनी पत्राद्वारे मत दिले. (पृष्ठ - ३३७, ३२१)
  • मिळालेल्या मतांप्रमाणे नोटाचा क्रम तिसऱ्या स्थानी आहे. (पृष्ठ - ३३७, ३२१)

हे सुद्धा पहा

संपादन

२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल

संदर्भ

संपादन
  1. ^ मतदार कक्षांची यादी (इंग्रजी मजकूर)
  2. ^ गुजरात २०१७ विधानसभा निवडणुका सांख्यिकीय अहवाल (इंग्रजी मजकूर)[permanent dead link]