चर्चा:अमृत
वर्ग: काल्पनिक गोष्टी
संपादन@अभय नातू:, आपण या लेखातील वर्ग:काल्पनिक गोष्टी हटवला. आपल्या माहितीस्तव परिस, कल्पवृक्ष, स्वर्ग, अमृत, राक्षस इ. काल्पनिक गोष्टी आहेत. ४थी च्या नवोदयाच्या पुस्तकात सापडेल. --संदेश हिवाळेचर्चा २०:२४, २१ नोव्हेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २०:२४, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:,
- तुमच्या मते ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्या इतरांच्या मते आहेतच असे नाही. आपले bias येथे आणू नयेत ही विनंती.
- जर वस्तुनिष्ठ वर्गीकरण करायचे असेल तर त्याला माझा पाठिंबा आहे परंतु त्यासाठी निकष ठरवून ते संमत करुन घ्यावे लागतील.
- ४थीचे नवोदयाचे पुस्तक काय आहे?
- अभय नातू (चर्चा) २०:२७, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
कल्पना होती, तुम्ही याला माझी वयक्तिक मते म्हणाल, म्हणूनच मी वर एका पुस्तकाचा उल्लेख केलाय. जर असे करण्याला माझा धार्मिक वा नास्तिक दृष्टीकोन तुम्हाला वाटत असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून वर्गीकरण करावे.
--संदेश हिवाळेचर्चा २०:३६, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
- वर लिहिल्याप्रमाणे वैज्ञानिक/वस्तुनिष्ठ वर्गीकरणाला माझा पाठिंबा आहे.
- हे वैज्ञानिक/वस्तुनिष्ठ वर्गीकरण कसे करावे याबद्दल तुमचे मत काय आहे?
- हा विषय सर्वसमावेशक असल्याने येथे चर्चा करण्यापेक्षा चावडीवर केलील तर अधिक मते मिळतील असे वाटते.
- अभय नातू (चर्चा) २०:५१, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
- वरील मजकूर वाचला.आपसात ही चर्चा करण्यापेक्षा, यास चावडीवर नेऊन सर्वकष मत घ्यावे. अभय नातूंच्या मताशी सहमत आहे.हा विषय तेथे चर्चेस नेल्यावर त्यावरची मते-मतांतरे घेउन मग काय तो व्यापक निर्णय घेता येईल.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५५, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:,
दुसरे असे कि,संदेश हिवाळे यांच्या सहीमध्ये अनेकदा साधे 'संदेश हिवाळे' असे येते तर अनेकदा त्यांची सही रंगीबेरंगी असते.अशीच गोष्ट टायविन यांच्या सहीबद्दलही आढळली.हे काय गौडबंगाल आहे ते कळत नाही.सहज आढळले ते निरिक्षण नोंदवित आहे.त्याने विकिवरच्या संपादनांवर फरक पडत नाही हेही तितकेच खरे आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५५, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
@अभय नातू:, चावडीवर चर्चा करणे चांगला पर्याय आहे. कृपया ही चर्चा तेथे हलवा. वैज्ञानिक/वस्तुनिष्ठ वर्गीकरण कसे करावे याबद्दल माझे मत प्राथमिक रित्या मी तिथे मांडतो.
@V.narsikar:, सहीच्या सेटिंग्स बदल करून मी माझी सही रंगीत केलेली आहे. परंतु अनेकदा सही म्हणून माझे नाव दोनदा लिहलं जातं. --संदेश हिवाळेचर्चा २२:१३, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)