ब्लॉगसाठी मराठी जालविश्वात प्रचारित असलेला अनुदिनी शब्द वापरत आहे. मराठी विकीच्या प्रथेप्रमाणे हा लेख अनुदिन्या असा अनेकवचनी घेता येईल. कृपया आपलई मते मांडावित. सध्या हा लेख अनुदिनी नावानेच लिहिन, Dakutaa ०६:१०, १८ फेब्रुवारी २००९ (UTC)

मराठी विकिपीडियावर लेख सहसा एकवचनी तर वर्ग बहुवचनी असतात. [[अनुदिनी]] बरोबर आहे, [[वर्ग:अनुदिन्या]] होईल.
अभय नातू २२:४७, १८ फेब्रुवारी २००९ (UTC)


जाहिरात करणे हा विकीचा उद्देश नसल्याने अनुदिन्यांचे बाह्य दुवे शक्यतो टाळले आहे. परंतु एकाही अनुदिनीचा दुवा न देणे विषयावर अन्याय करणारे ठरले असल्याने इतर भाषिक विकींचा संदर्भाने काही निवडक/लेखासाठी महत्वाच्या जालनिश्यांचे दुवे दिले आहेत. भविष्यात या लेखाचा अग्रगण्य ब्लॉग वा किंवा इतर काही शीर्षकाख्आली स्वत:च्या अनुदिन्यांचे दुवे देण्याचे संभाव्य प्रकार संपादंकांनी टाळावेत. माझ्या माहितीप्रमाणे मेटाब्लॉग स्वरूपाची मराठीब्लॉग्स डॉत् नेट् हे मराठीतील एकमेव स्थळ आहे. अशी अन्य स्थळे असल्यास त्याचे नि:संकोच दुवे द्यावेत. या धोरणास आपले मतभेद असतील तर इथे नोंदवावेत. Dakutaa ०६:२१, १ मार्च २००९ (UTC)


नवीन शब्द

संपादन

Corporate Blogs साठी उद्यमनिशी; Blogroll साठी अनुदिनीहजेरी या आणि अशा अनेक नव्या शब्दांचा वापर केला आहे. वापरलेले शब्द चुकीचे वाटत असतील किंवा त्याचे आणखी चांगले पर्याय माहित असतील तर सुचवण्या सुचवाव्यात Dakutaa ०६:२१, १ मार्च २००९ (UTC)

Blogroll = अनुदिनीपट, अनुदिनीनामा, अनुदिनीतक्ता, अनुदिन्यावली - कोल्हापुरी ११:३०, १ मार्च २००९ (UTC)

IMP

मला असे वाटते की, ब्लॉग हा शब्द आता मराठीत रुढ झाला आहे. मग अनुदिनी हा नवा शब्द कशासाठी हवा. "सोवळ्यात राहून भाषा वाढत नसते, हे शिरवडकरान्चे वचन आपण लक्षात ठेवले पहिजे. suryakant palaskar 21 april 2012. ..............................................

अनुदिनी विरुद्ध ब्लॉग

संपादन

हाच आक्षेप उलटाही घेता येईल. अनुदिनी हा प्रचलित रूढ शब्द असताना तो बदलून ब्लॉग का करायचा?...J (चर्चा) १०:५३, २२ एप्रिल २०१२ (IST)Reply

इतरत्र सापडलेला मजकूर

संपादन

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा.


जालपत्रिका किंवा अनुदिनी किंवा जालनिशी- blog - weblog (वेब‌लॉग) म्हणजे जालपानाच्या (WebPage) स्वरूपातील रोजनिशी diary or Journal) जी बहुतांशपणे सर्वांसाठी खुले असते(accessible). इंग्रजी ब्लॉग (blog) हा शब्द web आणि blog यांचे एकत्रीकरण असून जालावरील रोजनिशी असा त्याचा ढोबळ अर्थ सांगता येईल. मराठीत या अर्थाने जालपत्रिका किंवा जालनिशी किंवा अनुदिनी शब्द वापरला जातो. एकप्रकारे जालपत्रिका म्हणजे वैयक्तिक/सामूहिक/सांस्थिक स्वरूपातील मते/विषय/बातम्या वा इतर कोणत्याही विषयावरील जालपान (WebPage) होय.

जालपत्रिकेच्या संपादकास जालपत्रले़खक (इंग्रजीत bloggers) म्हणतात.

सर्वसामान्यपणे उलटकालगणतीप्रमाणे लिहिलेल्या नोंदी असे जालपत्रिकेचे स्वरूप असते. यामुळे सर्वात नवीन लिखाण सर्वात वर दिसते. जालपत्रलेखक स्वतःचे अनुभव किंवा कोणत्याही विषयावरील विचार स्वतःच्या जालनिशीवर मांडतो. जालपानाचे स्वरूप असल्याने कोणतीही संपादने तत्काळ प्रकाशित होतात. बहुतांश जालपत्रिकांवर अभिप्राय देण्याचीही सुविधा असते. त्यामुळे वाचक आपले अभिप्रायही तत्काळ देऊ शकतात. यामुळे लेखक-वाचक आदानप्रदान सहज व सुलभ होते. जालपत्रिका अशा प्रकारे विचार, अनुभव व संपर्काचे माध्यम म्हणून काम करते.

ओळख

आंतरजालाच्या प्रसारासोबत जालपत्रिकेच्या संकल्पनेचा प्रसारही वेगाने झाला. जालपत्रिकेच्या लोकप्रियतेची कारणे म्हणजे

  • संपादनाचे स्वातंत्र्य
  • प्रकाशन करणे सहज सोपे आहे
  • वाचक ते लेखक आणि लेखक ते वाचक असा दुहेरी संवाद शक्य आहे.

बरेचसे जालपत्रलेखक जालपत्रिकेच्या स्थापनेचे कारण सांगण्यात उत्सुक नसले तरी आत्म-प्रकटन हाच बऱ्याच जालपत्रिकांचा गाभा आहे असे दिसते. जालपत्रलेखक स्वतःचे अनुभव आणि विचार मांडण्यासाठीच वापरतात असे जर्मन आणि इंग्रजी भाषिक जालपत्रलेखकांच्या २९ तुलनात्मक संशोधनातून निष्पन्न झाले.[] जालपत्रिका आणि पुस्तके यातील महत्त्वाचा फरक म्हणजे लोकप्रिय होऊ शकण्याचा वेग. जालपत्रिकांचा हा गुण अनेकांना लिहिण्यास उद्युक्त करतो. जालपत्रिका बहुतेक वेळा सर्वांसाठी खुली असली तरी जालपत्रिका खाजगी स्वरूपाच्याही असू शकतात. अशा जालपत्रिकांवरील प्रवेश संकेतशब्दांनी (Password) निर्बंधित केला जातो.

इतिहास

 
ब्राड् फिट्झपॅट्रिक्, एक आद्य जालपत्रलेखक.

आंतरजाल प्राथमिक अवस्थेत असताना म्हणजे १९८३ -१९९० या काळात लेखन (Posting) वापरकर्त्यांच्या गटामंध्ये होई. ( ) या काळातील एकमेव अपवाद म्हणजे ब्रायन् रेडमन् चा (Brian E. Redman) स्वतंत्र जालमंच. यावर रेडमन् आणि त्याचे सहकारी आंतरजालाच्या प्रगतीवर लेख लिहित.

१९९० - २००१

पहिली प्रारंभिक स्वरूपाची जालपत्रिका १९९०सालच्या मध्यात अवतरली. या जालपत्रिका महाजालावरच्या वह्या(On-line Diaries) अशा स्वरूपात होत्या. जालपत्रिकांचे सद्यस्वरूप प्रारंभीच्या या डायरींपासून विकसित झाले आहे. १९९३ सालचा Gaia's Forest Conservation Archives[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती ही आजच्या स्वरूपातील पहिली जालपत्रिका डॉ.ग्लेन बॅरी यांनी सुरू केली. ही जालपत्रिका आजही (फेब्रु २००९) मध्येही कार्यरत आहे. जस्टिन् हॉल्, ब्राड् फिट्झपॅट्रिक्, जॉन् कॅरिमॅक् हे आरंभीच्या जालपत्रलेखकांपैकी काहीजण. १९९६ पासूनझांगा , , en:Movable Type, en:Blogger किंवा en:LiveJournal सारख्या जालिय सोई उपलब्ध झाल्या. यामुळे जालपत्रिका बनवणे सहजशक्य झाले. अशा स्वरूपामुळे एकट्या झांगावर जालपत्रिकासंख्येने सुरूवातीच्या १०० पासून २००५ सालापर्यंत २ कोटी इतकी मजल मारली. इंग्रजी वेबलॉग (weblog) शब्द १९९७ साली पहिल्यांदा जॉन बार्गर यांनी वापरला; त्याचा ब्लॉग असा संक्षेप १९९९ साली पिटर् मेर्होल्झ (Peter Merholz) यांनी केला. याच काळात काही जालपत्रिका पर्यायी माध्यमे म्हणून उदयास येऊ लागल्या.[]

२००१-२००४

आज प्रख्यात असलेल्या अनेक जालपत्रिकांचा जन्म २००१च्या सुमारास झाला. (उदा: en:Political Wire , en:Instapundit, en:Little Green Footballs, en:MyDD) अशा प्रख्यात जालपत्रिकांवर रोज ७५००० इतक्या संख्यने अभ्यागतभेटी होतात. (Visitor Hits) ११ सप्टेंबर २००१ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पडसादही जालपत्रिकाविश्वात उमटले होते. २००१च्या सुमारास पत्रकारिताविद्येच्या अभ्यासकांनी या नवीन गवेषणेचा अभ्यास करणे सुरू केले. २००२ सालच्या इराक युद्धामुळे युद्ध-पत्रिकांचा (War-Blogs) जन्म झाला. २००२ साली अमेरिकन सिनेटर स्ट्रॉम्‌ थर्मंण्ड् en:Strom Thurmond यांच्या वांशिक स्वरूपाच्या काही टिपण्ण्याविरोधी मते जालपत्रिकाविश्वाने (Bloggosphere) लावून धरली. पारंपारिक माध्यमांनी या टिप्पण्या दुर्लक्षिल्या होत्या. अशा घटनांमुळे पर्यायी माध्यमे म्हणून जालपत्रिकाविश्वाचा दबदबा वाढू लागला.

जालपत्रिकांच्या लोकप्रियतेचा उद्योगजगतात शिरकाव होऊन उद्यमपत्रिका (corporate blogs) बनणेही सुरू झाले. इंग्रजी ब्लॉग शब्दाची अमेरिकन मेरिअम-वेब्स्टर शब्दकोशाने (en:Merriam-Webster) २००४ सालचा शब्द म्हणून निवड केली.

२००४-आजतागायत

पाश्चात्य जगतात जालपत्रिका २००४ सालापासून मतमतांतरे घडवणारे माध्यम होऊ लागले. २००४ साली आलेला त्सुनामी (en:December 2004 Tsunami) किंवा ऑगस्ट २००५चे कॅटरिना चक्रिवादळात जालपत्रिकांनी बातम्यांचा स्रोत म्हणून काम केले. पारंपारिक माध्यमांनी ही जालपत्रिकांची दखल घेणे सुरू केले. इंग्लंडमधील गार्डिअन (en:The Guardian) सारख्या प्रख्यात वृत्तपत्राने सप्टेंबर २००५ पासून निवडक जालपत्रिकांची माहिती देणे सुरू केले. इतर वृत्तसंस्थेप्रमाणे जून २००६ साली बीबीसीने स्वतःच्या संपादकांच्या जालपत्रिका सुरू केल्या. जानेवारी २००५ मध्ये फोर्च्यून नियतकालिकाने उद्योगजगतासाठी महत्त्वाच्या असलेल्या ८ जालपत्रलेखकांची नावे अनुसूचित केली. (Peter Rojas, Xeni Jardin, Ben Trott, Mena Trott, Jonathan Schwartz, Jason Goldman, Robert Scoble, and Jason Calacanis.)

२००७ साली टिम्‌ ओ रिअलीने जालपत्रिकांची आचारसंहिताही बनवली. यात त्याने सात कलमे घातली -

  • तुमच्या जालपत्रिकेवरिल तुमची मते व त्यावरिल टिप्पण्ण्यांची जबाबदारी घ्या. (Take responsibility not just for your own words, but for the comments you allow on your blog.)
  • अपशब्द झेलण्याबाबत तुम्ही किती सक्षम आहात हे जाहीर करा. (Label your tolerance level for abusive comments.)
  • निनावी टिपण्ण्या वगळण्याबाबत विचार करावा. (Consider eliminating anonymous comments. )
  • कडे दुर्लक्ष करा. (Ignore the trolls.)
  • एकमेकामधील टिपण्ण्यांचा संवाद जालाबाहेर घेऊन व्यक्तींशी थेट बोला. (Take the conversation offline, and talk directly, or find an intermediary who can do so. )
  • तुमच्या परिचयातील व्यक्ती जालपत्रिकेवर मर्यादाभंग करत असेल वा वाईट वागत असेल तर तिला/त्याला थेट सांगा. (If you know someone who is behaving badly, tell them so)
  • तुम्ही प्रत्यक्ष जगतात जे कधीही बोलणार नाहीत त्या स्वरूपाची टिपण्णी जालावर करू नका, (Don't say anything online that you wouldn't say in person)

जालपत्रिकांमागचे तंत्रज्ञान

जालपत्रिकांसाठी जालपत्रिका प्रकाशन प्रणाली en:Weblog Publishing System किंवा मजकूर व्यवस्थापन प्रणाली en:Content management system चा वापर केला जातो. वर्ड्प्रेस्, सेरेंडिपिटी , न्यूक्लियस् CMS, मुव्हेबल टॅप सारख्या स्थळावर खाते उघडुन कोणत्याही नवख्या मनुष्यास सहजपणे जालपत्रिका सुरू करता येऊ शकते. यामागे PHP, CGI सारख्या संगणक भाषा असतात. जालपत्रिकांचे लेखाशिवाय सामान्यपणे दोनभाग असतात - blogrolls (लेख) व commenting (अभिप्राय). जालपत्रिकांमध्ये नवीन लेख सुरूवातीस (reverse chronological order) या स्वरूपात लेख प्रकाशित होतात.

बहुतांशी जालपत्रिका अभिप्राय लिहिण्यास परवानगी देतात. ही परवानगी दोन प्रकारची असते-

  • निनावी अभिप्राय स्वीकारार्ह असणाऱ्या जालपत्रिका.
  • अभिप्रायांसाठी प्रवेश (Log-in) अनिवार्य असणाऱ्या जालपत्रिका.

अभिप्राय जालपत्रलेखकांकडून संपादित केल्या जाऊ शकतात. शिवीगाळ/अश्लिल स्वरूपाचे अभिप्राय रोखणे किंवा अनैच्छिक(स्पॅम) (जालपत्रिकांवर अनेक अभिप्राय लिहून केला जाणारा हल्ला) रोखणे ही याची प्रमुख कारणे.

स्थिरदुवे (Permanent Links / Permalinks) हे लेखांचे वा अभिप्रायांचे कायमस्वरूपी जालीय पत्ते (URL) होत. इतर संकेतस्थळांना जालपत्रिकांच्या लेखाचे संदर्भ देण्यास हे कामी येतात.

माझ्या जालपत्रिकेचा जालीय संदर्भ/दुवा कोणीकोणी घेतला आहे ही माहिती माग काढण्याच्या (Trackback / Pingback) सोईमुळे जालपत्रलेखकाला समजते. जालपत्रिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज या सोईमुळे जालपत्रलेखकाला येतो.

अधिग्रहण किंवा भरण (Feed) जालपत्रिकेवरील मजकूर एकसंध स्वरूपात देतो. ही सोय जालपत्रिकांच्या वाचकांना नवनवीन लेखाचा सुगावा देते. RSS newsfeed readable आणि गुगलचा FeedBurner या यातील लोकप्रिय सोई आहेत.

जालपत्रिकासूची (Blogroll) म्हणजे इतर जालपत्रिकांच्या जालिय पत्त्यांची यादी. सामान्यपणे जालपत्रलेखक स्वतःस आवडणाऱ्या इतर जालपत्रिकांची यादी येथे साठवतो. ही यादी वाचकांस उपलब्ध असते.

जालपत्रिका विविध लेखांचा संग्रह असतो. वाचकांच्या सोईसाठी जालपत्रलेखक लेखांना संदर्भनामे (बिल्ले) (Tag Cloud / Tag ) लावतो. संदर्भनामांमुळे लेखाचे वर्गीकरण होते. उदा. प्रवास, अध्यात्म, पाककृती अशा विविध विषयांवर लिखाण करणारा जालपत्रलेखक त्यात्या विषयांची संदर्भनामे लेखांना लावून वर्गीकृत करू शकतो. वर्गीकरण कसे असावे हे जालपत्रलेखक ठरवतो. त्यामुळे निव्वळ अध्यात्म विषयाला वाहिलेल्या जालपत्रिकांवर जालपत्रलेखक आपल्या इच्छेप्रमाणे हटयोग, भक्तीगीते, अनुभव अशी संदर्भनामे लावून वर्गीकृत करू शकतॉ.

प्रकार

मजकुराप्रमाणे

  • कलापत्रिका (Artblogs): कला आणि संस्कृती
  • शिक्षणपत्रिका (Edublogs) : शिक्षण, अध्यापन, अध्ययन यावरील.
  • उद्यमपत्रिका (Corporate blog): कंपन्यांच्या स्वतःच्या जालपत्रिका. स्वतःच्या उत्पादनाचा प्रसार, त्यावरिल चर्चा, सुधारणेबद्दलच्या टिप्पण्या जाणून घेण्यासाठी कंपन्या यांचा वापर करतात.
  • तज्ज्ञपत्रिका (Expert blog) : कोणत्याही एका ज्ञानविषयावर नवनविन कल्पना, संशोधन यावरील
  • मौजपत्रिका (Funblog): विनोदविषयक
  • रोजगारनिशी (Joblog): नोकरीविषयक.
  • ज्ञानपत्रिका (Knowledge Blog): ज्ञानव्यवस्थापनेसअठी वापर २ प्रकार - विशिष्ट विषयावरिल व्यक्तीगत जालपत्रिका किंवा विशिष्ट विषयावरिल सामुदायिक जालपत्रिका.
  • रहस्यपत्रिका (Mystery blog): गुन्हे, त्यावरिल कथा.
  • साहित्यपत्रिका (Litblog): साहित्याची समिक्षा टिप्पणी वा परीक्षण याविषयी.
  • संचयपत्रिका (Metablog): इतर जालपत्रिकांची वा संकेतस्थळांची यादी.
  • स्थळपत्रिका (Place Blogs): स्थळवर्णन.
  • सौदापत्रिका (Bargain Blog): जुन्या नव्या वस्तू विकण्यासाठीचा ग्राहकांमधील जालसंपर्कित (ऑनलाईन) बाजार.
  • भ्रमणपत्रिका (Tumblelog): जालपत्रलेखक जालभ्रमण करत असताना सापडलेल्या चित्र, दुवे, मजकूर आणि दृश्यचित्रफीत (व्हिडिओ) यांचा संग्रह.
  • निवडणूकपत्रिका (Election blog): निवडणूकीवरील जालपत्रिका. ही संकल्पना पाश्चात्य जगतात लोकप्रिय आहे. २००८ सालच्या अमेरिकी अध्यक्षीय निवडीत याचा खूप वापर दिसला.
  • युद्धपत्रिका(Warblog): युद्धस्थळी आलेल्या अनुभवांचे वर्णन. २००२च्या इराकयुद्धाने या प्रकाराचा जन्म झाला.
  • विज्ञानपत्रिका(Science Blog): विज्ञान, संशोधनाला होणारा अर्थपुरवठा आदी विषयांशी संबंधित.
  • जालपत्रिका निरिक्षण(Blog Watch): संस्था, कंपन्या वा प्रसारमाध्यमे यांच्यावरील टिकाकारांची समीक्षा.

स्वरूपाप्रमाणे

  • भ्रमणपत्रिका (मोब्लॉग)
  • प्रकाशचित्रपत्रिका / छायाचित्रपत्रिका (फोटोब्लॉग)
  • दृश्यचित्रफीत पत्रिका (व्हिडिओ ब्लॉग)

संचालकांप्रमाणे

  • व्यक्तीगत जालपत्रिका
    • व्यक्तीगत आवडीनिवडी/ मते दर्शिवण्यास उपयोगात आणले जाणाऱ्या जालपत्रिका
    • एखाद्या विषयास वाहिलेली व्यक्तिगत जालपत्रिका.
  • महामंडळे/उद्योग-पत्रिका
    • व्यावसायिक उद्देशांसाठी वापरण्यात येनाऱ्या जालपत्रिका
    • संघटना, क्ल्ब किंवा बिगर व्यावसायिक संस्था यांच्या जालपत्रिका.[]
समस्या
  • अनैच्छिक (स्पॅम) हल्ले: एखाद्या लोकप्रिय जालपत्रिकेवर विरोधी मताच्या गटाकडून अनैच्छिक (स्पॅम) हल्ले करून ती बंद पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
  • जालपत्रिकेच्या स्वरूपामुळे जालपत्रलेखकाच्या व्यक्तीमत्वाबाबत निष्कर्श काढणे संभव असते. कारण बहुतेक वेळा आपले आयुष्य जालपत्रलेखक लोकांसमोर मांडत असतो.
  • एखाद्या जालपत्रिकेच्या लोकप्रियतेचा फायदा एखादी कंपनी स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेऊन शकते.

मराठी जालपत्रिकाजगत
भारतीय जालपत्रिकांची संख्या दहा लाखावर [] असली तरी यात इंग्रजी भाषीक जालपत्रिकांची संख्या जास्त आहे. मराठी भाषेतील जालपत्रिकाजगत जागतिक भाषांच्या तुलनेत छोटे असले तरी सक्रियपणे जालपत्रलेखन (ब्लोंगिंग) होणाऱ्या भारतीय भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. आजघडीला (फेब्रु २००९) मराठीत किमान १२०९ जालपत्रिका अस्तित्वात आहेत. त्यात पाककृती, साहित्य, कविता, प्रवासवर्णन, ललितलेख हे मराठी जालपत्रलेखकांचे आवडते विषय असल्याचे दिसते. मराठीत ज्योतिष, पाककृती अशा एका विषयाला वाहिलेल्या जालपत्रिकाही आहेत.


 : संतोष गोरे (💬 ) ०७:०९, १ जुलै २०२१ (IST)Reply

  1. ^ Neuberger, Christoph / Christian Nuernbergk / Melanie Rischke: Weblogs and Journalism: compete, complement or integration? In: Media Perspektiven, 2 / 2007, p. 96-122. Online: http://www.media-perspektiven.de/uploads/tx_mppublications/02-2007_Neuberger.pdf [मृत दुवा]
  2. ^ http://andrewsullivan.theatlantic.com/
  3. ^ ((Literature | Author = Christian Hauschke, Sarah and Nadine Ullmann Lohre | title = Libworld. Biblioblogs globally | Aggregate Plant LIBREAS number = 10/11 (3 / 4 - 2007) | pages = 3 | = http://opus.bsz-bw.de/fhhv/volltexte/2008/8/pdf/002hau.pdf Online))
  4. ^ http://www.hindu.com/2006/11/14/stories/2006111403801902.htm
"अनुदिनी" पानाकडे परत चला.