चंद्रशेखर

भारतीय राजकारणी
(चंद्रशेखर (पंतप्रधान) या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे.

चंद्रशेखर सिंग
[[चित्र:
|चंद्रशेखर]]

कार्यकाळ
नोव्हेंबर १०,इ.स. १९९० – जून २१, इ.स. १९९१
राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण
मागील विश्वनाथ प्रताप सिंग
पुढील पी. वी. नरसिंहराव

जन्म जुलै १, इ.स. १९२७
इब्राहीमपट्टी, बालिया जिल्हा, उत्तरप्रदेश
मृत्यू जुलै ८, इ.स. २००७
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जनता दल
समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)
अपत्ये नीरज शेखर
गुरुकुल अलाहाबाद विद्यापीठ
धर्म हिंदू
सही चंद्रशेखरयांची सही

चंद्रशेखर (१ जुलै १९२७ - ८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही सरकारी कार्यालय सांभाळलेले नाही.[] त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक "कठपुतळी" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते.[][][][] मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कंपनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बँकेने भारतास आर्थिक मदत बंद केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चंद्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली.[][][] १९९१ चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले.[][१०]

पूर्वीचे जीवन

संपादन

चंद्रशेखर यांचा जन्म १ जुलै १९२७ रोजी उत्तर प्रदेशमधील इब्राहिमपट्टी या गावात राजपूत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सतीशचंद्र पी जी कॉलेज येथे त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी मिळविली. १९५० मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

राजकीय जीवन

संपादन

चंद्रशेखर समाजवादी चळवळीत सामील झाले आणि बलिया येथील जिल्हा प्रजा सोशलिस्ट पार्टी (पीएसपी)चे सचिव म्हणून निवडले गेले. एका वर्षाच्या आत, ते उत्तर प्रदेशमधील पीएसपीच्या राज्य युनिटचे सहसचिव म्हणून निवडले गेले. १९५५-५६ मध्ये त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली. १९६२ मध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेल्याने त्यांची राष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली.

मृत्यू

संपादन

८० व्या वाढदिवसाच्या आठवडाभरानंतर चंद्रशेखर यांचे ८ जुलै २००७ रोजी निधन झाले.काही काळ ते मायलोमा ने ग्रस्त होते आणि मे पासून ते नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात होते. त्याच्या पश्चात दोन मुलं आहेत.[११] भारतीय अनेक पक्षांच्या राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि भारत सरकारने सात दिवस राज्य शोक घोषित केले. १० जुलै रोजी यमुना नदीच्या काठी जन्यक स्थळ येथे पारंपारिक अंत्ययात्रेच्या वेळी संपूर्ण राज्य सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑगस्टमध्ये त्यांची राख सिरूवाणी नदीत विसर्जित केली गेली.[१२][१३][१४][१५]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Socialist Is Installed as India's Eleventh Prime Minister". Sanjoy Hazarika. न्यू यॉर्क टाइम्स. 11 November 1990. 20 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ The Working Class. Centre of Indian Trade Unions. 1990. p. 86. 20 December 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Puppet on a String. Far Eastern Economic Review. October 1990. p. 6.
  4. ^ "Chandra Shekhar exploits fears, weaknesses of Congress(I) and Janata Dal(S)". Inderjit Badhwar,.Prabhu Chawla. इंडिया टुडे. 15 December 1990. 20 December 2018 रोजी पाहिले.
  5. ^ The Interim Man. The Economist. 1990. p. 42.
  6. ^ "How the economy found its feet". Deepak Nayar. The Hindu. 18 October 2016. 21 December 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "In fact: How govts pledged gold to pull economy back from the brink". Shaji Vikraman. The Indian Express. 5 April 2017. 21 December 2018 रोजी पाहिले.
  8. ^ Stuart Corbridge; John Harriss (28 May 2013). Reinventing India: Liberalization, Hindu Nationalism and Popular Democracy. Wiley. pp. 144–. ISBN 978-0-7456-6604-4. 20 December 2018 रोजी पाहिले.
  9. ^ "Rival of Singh Becomes India Premier". Sanjoy Hazarika. न्यू यॉर्क टाइम्स. 10 November 1990. 20 December 2018 रोजी पाहिले.
  10. ^ "1991, the untold story". Yashwant Sinha. The Hindu. 29 July 2016. 21 December 2018 रोजी पाहिले.
  11. ^ "Chandra Shekhar dead". The Hindu. 9 July 2007. 11 December 2014 रोजी पाहिले.
  12. ^ "Leaders mourn Chandra Shekhar's death". The Hindu. 9 July 2007. 11 December 2014 रोजी पाहिले.
  13. ^ "Former PM Chandrashekhar's samadhi to be called Jannayak Sthal". द टाइम्स ऑफ इंडिया.
  14. ^ "Chandra Shekhar's ashes immersed in Siruvani". The Hindu. 13 August 2007. 11 December 2014 रोजी पाहिले.
  15. ^ "Dignitaries bid adieu to Chandra Shekhar". The Hindu. 10 July 2007. 11 December 2014 रोजी पाहिले.
मागील:
विश्वनाथ प्रताप सिंग
भारतीय पंतप्रधान
नोव्हेंबर १०, १९९०जून २१, १९९१
पुढील:
पी. वी. नरसिंहराव