घोरक टिलवा, पाण टिटवा, ठाठा, लांब पायांची कुडावळ किंवा शेकाटी (इंग्लिश:Indian Blackwinged stilt; हिंदी:गजपाव, टिंघुर, सरागनी) हा एक पक्षी आहे.

घोरग टिलवा
पाण टिटवा

आकाराने अंदाजे तित्तिराएवढी असते.काटकुळे उंच पाय असतात.सडपातळ,काळा,राखट,उदी व पांढरा जलचर पक्षी.सरळ,बारीक,काळी चोच असते.लांब पाय व पायांचा रंग तांबूस.ऋतुमानाप्रमाणे नर-मादीच्या रंगांत पालट होतो.उडताना शेपटीजवळचा पांढरा भाग पाचरीसारखा पाठीपर्यंत दिसतो.शेपटीच्या सम पातळीत पाय ताणलेले.पाठ व पंख काळेभोर असतात.

वितरण

संपादन

भारत,पाकिस्तान,श्रीलंकाब्रह्मदेश येथे प्रामुख्याने आढळून येतात.निवासी,तसेच स्थानिक स्थलांतर करणारे आणि हिवाळी पाहुणे. युरोप,आशिया,अमेरिकन या भागात एप्रिल ते ऑगस्टमध्ये वीण.

निवासस्थाने

संपादन

दलदली व चिखलाणी.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली