- १/२ कप तांदूळ पिठ
- २ टेस्पून चणा पिठ
- दिड कप आंबट ताक
- १/४ कप बारीक चिरलेला कांदा (ऑप्शनल)
- २-३ हिरव्या मिरच्या
- २ पाकळ्या बारीक चिरलेली लसूण
- १/२ टिस्पून हळद
- १/२ टिस्पून जिरे
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ
- १/२ कप तेल
- तांदूळ पिठ आणि चणा पिठ एकत्र करून त्यात ताक घालावे. गुठळ्या न होता पातळसर भिजवून घ्यावे.
- त्यात जिरे, कांदा, मिरच्या, हळद, कोथिंबीर, लसूण, मीठ घालून निट ढवळून घ्यावे.
- नॉनस्टीक फ्राईंग पॅन गरम करावा. त्यामध्ये किंचीत तेल घालून घावन घालावे. लसणीच्या तिखटाबरोबर गरम गरम खावे.