ग्रेस केली

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.

ग्रेस पॅट्रिशिया केली (Grace Patricia Kelly; १२ नोव्हेंबर १९२९, फिलाडेल्फिया - १४ सप्टेंबर १९८२, मोनॅको) ही एक अमेरिकन अभिनेत्री व मोनॅकोची युवराज्ञी होती.

१९५६ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी आलेली ग्रेस केली आणि प्रिन्स रेनिये

वयाच्या विसाव्या वर्षी अभिनयास सुरुवात करणाऱ्या केलीला १९५४ सालच्या द कंट्री गर्ल ह्या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. १९५६ साली वयाच्या २६व्या वर्षी केलीने अभिनयातून संन्यास घेतला व मोनॅकोचा युवराज रेनिये तिसरा ह्याच्यासोबत विवाह केला.

१९८२ साली मोनॅको येथे केलीचे निधन झाले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: