गोविंद पुंडलिक हेगडे देसाई

भारतकार गो.पुं. हेगडे देसाई (७ नोव्हेंबर, १८८५:केपे तालुका, गोवा, भारत - १९४९) हे एक मराठी पत्रकार होते. हेगडे देसाईंनी प्राथमिक शिक्षणानंतर पोर्तुगीज शिक्षण घेतले. पोर्तुगीजमधून त्यांनी वकिलीचे आणि औषधशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. त्यांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. परंतु त्याला नकार देउन पत्रकारिता सुरू केली. त्यांनी ६ नोव्हेंबर १९१२ रोजी भारत हे मराठी व पोर्तुगीज भाषेतील द्विसाप्ताहिक सुरू केले.[] नंतर ते केवळ मराठीतच चालू केले. ते या नियतकालिकाचे मालक तसेच संपादकही होते. हेगडे देसाई यांचे अग्रलेख खंड १ आणि खंड २. त्यांनी सामाजिक आणि राजकीय लेख लिहिले. त्यांनी सदैव समाजकार्य केले. गोमंतक मराठी अकादमीने प्रकाशित केले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ गडकरी, माधव (२००५). असा हा गोमंतक. मुंबई: अशोक कोठावळे. pp. २११.
  2. ^ नार्वेकर, शशिकांत (७ जुन१९९९). 'भारत' कार हेगडे देसाई यांचे निवडक अग्रलेख खंड :१. पणजी: गोमंतक मराठी अकादमी,पणजी. pp. पृ.क्र. ११, १२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)