गोठा हे पाळीव जनावरांच्या निवाऱ्यासाठी व त्यांचे थंडी, ऊन , पाऊस यांचेपासून रक्षण करण्यासाठी बांधलेले एक प्रकारचे बांधकाम असते.त्यामध्ये जनावरे बांधल्याने त्यांचे संरक्षण होते व मालकाचे नुकसान होत नाही. तसेच याद्वारे जनावरांची चोरी इत्यादी गोष्टींपासून सुरक्षा करता येते.

गोठा कसा असावा संपादन

  • जागा उंचावर व मुरमाड असावी. मुरमाड जमिनीत जनावरांच्या मुत्राचे शोषण होते.
  • उत्तर - दक्षिण बांधकाम असले तर सकाळची व संध्याकाळची उन्हे गोठ्यात पडून अनायासे कोरडेपणा राहतो व रोगजंतू नष्ट होतात.
  • पावसाळ्यात गोठ्यात पाणी येऊ नये म्हणून पुरेशी योजना केलेली असावी.
  • गोठ्यात व शेजारच्या मोकळ्या जागेत स्वच्छ पाण्याची व्यवस्था असावी.
  • परिसराला तारेचे कुंपण असावे.
  • कळपातील आजारी व जखमी जनावरांसाठी वेगळी व्यवस्था असावी.
  • गोठ्यातील जमिन वरचेवर स्वच्छ करीत जावी.
  • जनावरांचे खाद्य/चारा इत्यादी ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी.

गायी म्हशींचा गोठा संपादन

गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या १६ पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि १६ पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे (ई.:tail to tail) ही रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते. संसर्गजन्य रोग होण्याचा धोका नसतो. दुध काढणे सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाली असावी. गोठ्याची उंची १४ ते १५ फुट असावी. ८ फुट भिंत आणि ४ फुट खिडकी ठेवावी. गाई-म्हशीला १.५ ते १.७ मीटर लांब आणि १ ते १.२ मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज ३% वाळलेला आणि हिरवा चारा असावा. प्रत्येक लिटर दुधापाठीमागे ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देणे महत्त्वाचं आहे. अ, ब, क, आणि ई जीवनसत्त्वासाठी हिरवा चारा दिला गेलाच पाहिजे. म्हणजे दुधात घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक दुधनिर्मितीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर देवी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रेबीज, डेंग्यू, हे विषानुजान्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहते.

शेळ्या मेंढ्यांचा गोठा संपादन

  • खाद्य खातांना शेळ्या मेंढ्या बरीच नासाडी करतात.त्यामुळे गव्हाणीत (त्यांचे खाद्य ठेवतात ती जागा) त्यांचे फक्त तोंड जाईल अशी व्यवस्था असावी.
  • शेळ्या अथवा मेंढ्या यातील करडे/नर/दुभत्या व नुकत्याच व्यालेल्या शेळ्या याचेसाठी वेगवेगळी सोय असावी.

घोडा संपादन

घोड्याच्या निवाऱ्यास तबेला म्हणतात.

संदर्भ संपादन