गोंदिया विमानतळ
बिरसी विमानतळ हा गोंदिया शहरापासून ईशान्येस सुमारे १२ किमी अंतरावर असणारा एक विमानतळ आहे. यास गोंदिया विमानतळ असेही म्हणतात. या विमानतलावर १३ एप्रिल २०२२ पासून यात्री प्रवासाला सुरुवात झाली आहे. तसेच याचा वापर खास व्यक्तींची विमाने व पायलट प्रशिक्षणसाठी सुद्धा करण्यात येतो. तसे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे पण त्याचा वापर सध्या (२०१८ साल) पूर्ण क्षमतेने करण्यात येत नाही.[१]
गोंदिया विमानतळ बिरसी विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: नाही – आप्रविको: VAGD | |||
नकाशा | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | गोंदिया | ||
स्थळ | गोंदिया, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १०२० फू / ३११ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 21°31′27″N 080°17′21″E / 21.52417°N 80.28917°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०४/२२ | ७५१५ | २२९० | Paved |
इतिहास
संपादनमूलतः हा विमानतळ फक्त एक धावपट्टी होती. ती ब्रिटिशांनी सन १९४०मध्ये तयार केली होती. पूर्वी हिची देखरेख महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.[२] पण नंतर सन १९९८मध्ये ही धावपट्टी महाराष्ट्र इंडस्ट्रियल काॅर्पोरेशनला हस्तांतरित करण्यात आली.[३] त्यानंतर सन २००५मध्ये भारतीय विमान प्राधिकरणाने या धावपट्टीचा ताबा घेतला. त्या प्राधिकरणाने मग या धावपट्टीचा विस्तार केला व तिला एअरबस व बोईंगसारखी विमाने उतरण्यास सक्षम बनविले.[४]
वर्णन
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Akola, Gondia next aviation hot spots". 2012-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- ^ "Airstrips in Maharashtra". 2021-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2012 रोजी पाहिले.
- ^ "MIDC airports". 28 मार्च 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 जानेवारी 2019 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ "Akola, Gondia next aviation hot spots". 2012-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |