गेरेरो (संपूर्ण नाव: गेरेरोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Guerrero)हे मेक्सिको देशाच्या दक्षिण भागातील एक राज्य आहे. गेरेरोच्या दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. शिल्पांसिंगो ही गेरेरोची राजधानी तर आकापुल्को हे सर्वात मोठे शहर आहे.

गेरेरो
Guerrero
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

गेरेरोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
गेरेरोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी शिल्पांसिंगो
क्षेत्रफळ ६३,६२१ चौ. किमी (२४,५६४ चौ. मैल)
लोकसंख्या ३३,८८,७६८
घनता ५३ /चौ. किमी (१४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-GRO
संकेतस्थळ http://www.guerrero.gob.mx

१८४९ साली स्थापन झालेल्या गेरेरो राज्याला मेक्सिकोचा स्वातंत्र्यसेनानी व दुसरा राष्ट्राध्यक्ष व्हिसेंते गेरेरो ह्याचे नाव दिले गेले आहे. पर्यटन हा गेरेरोमधील सर्वात मोठा व्यवसाय असून आकापुल्को हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

सध्या येथील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमुळे गेरेरो हे मेक्सिकोमधील सर्वात धोकादायक राज्य मानले जाते.

भूगोल

संपादन

मेक्सिकोच्या दक्षिण भागात ६३,६२१ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १४व्या तर लोकसंख्येने बाराव्या क्रमांकाचे मोठे आहे.


चित्र दालन

संपादन
 
व्हिसेंते गेरेरो
व्हिसेंते गेरेरो  
 
शिल्पांसिंगोमधील एक कॅथेड्रल
शिल्पांसिंगोमधील एक कॅथेड्रल  

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: