गेटवे ऑफ इंडिया
गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. त्याचे १६ व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.
मुंबईतील स्मारक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विजय स्मारक (आर्च) | ||
---|---|---|---|
स्थान | कुलाबा, मुंबई शहर जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
पाणीसाठ्याजवळ | अरबी समुद्र | ||
स्थापत्यशास्त्रातील शैली | |||
वास्तुविशारद |
| ||
मालक संस्था | |||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||
रुंदी |
| ||
उंची |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
यानंतर गेट वे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आली. गेटवे ऑफ इंडिया ही इमारत दक्षिण मुंबईतील शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर आहे. ही इमारत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.
इतिहास
संपादनगेटवे ऑफ इंडिया, बॉम्बे, १९२४,
गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात असे म्हणले आहे की, "एमसीएमएक्सआय (MCMXI -रोमन अंकलेखनपद्धतीनुसार १९११) डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली दरबारापूर्वी किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांनी हिंदुस्तानला दिलेल्या भेटीच्या आठवणींसाठी गेटवे ऑफ इंडिया तयार करण्यात आले होते. मात्र,१९११ साली या इमारतीचा नुसता आराखडा तयार झाला होता. ३१ मार्च १९१४ रोजी बाॅम्बेचे राज्यपाल सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी मंजूरी दिली. व बांधकाम १९१५ साली सुरू करण्यात आले.
घटना
संपादन२५ ऑगस्ट २००३ रोजी एका बॉम्बस्फोटामुळे गेटवे समोर उभे असलेले अनेक लोक जखमी झाल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती. ताजमहाल हाॅटेल या शहरातील सर्वात जुन्या लक्झरी हॉटेलसमोर बॉम्ब असलेली टॅक्सी पार्क केलेली होती. ताजमहाल हाॅटेलजवळच्या कारच्या खिडक्या फोडल्या गेल्या आणि मोटारी खराब करण्यात आलल्या. स्फोटाच्या शक्तीने अनेक लोक समुद्रात उडून पडले असल्याची शक्यता आहे.
२००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर सर्व जेटी बंद करण्यात आल्या आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबजवळ दोन नवी बांधकामे करण्यात आली.