गुळाचा गणपती (चित्रपट)

(गुळाचा गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)
गुळाचा गणपती
दिग्दर्शन पु. ल. देशपांडे
निर्मिती विनायक राजगुरू
कथा पु. ल. देशपांडे
पटकथा पु. ल. देशपांडे
प्रमुख कलाकार पु. ल. देशपांडे, चित्रा, वसंत शिंदे
संवाद पु. ल. देशपांडे
संकलन गंगाराम माथफोड
कला म. द. ठाकूर
गीते ग. दि. माडगूळकर
संगीत पु. ल. देशपांडे
पार्श्वगायन आशा भोसले, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी
नृत्यदिग्दर्शन महंमद
वेशभूषा एस. कर्णे
रंगभूषा गुराप्पा तुरतुरे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९५३


उल्लेखनीय संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • ही कुणी छेडिली तार
  • इथेच टाका तंबू
  • इंद्रायणी काठी
  • श्रीहरी विदुराघरी पाहुणा
  • केतकीच्या बनात

पार्श्वभूमी संपादन

  • या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे सबकुछ पु. ल. असा हा चित्रपट आहे!!

चित्रपटाची हस्तलिखित प्रत संपादन

या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. ती त्यांनी २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली. हा चित्रपट १९५३ साली प्रकाशित झाला होता, त्याअर्थी ही हस्तलिखित प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत.