देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :-

  • असिस - ऑस्ट्रेलियाची आशिया-पॅसिफिक प्रदेशावर हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना.
  • आय.बी. - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था.
  • आय.एस.आय. (इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स) - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रांमध्ये उचापत्या करणारी संस्था.
  • एम.आय.सिक्स - इंग्लंडची लष्करी गुप्तचर संस्था
  • एम.एस.एस. - चीनची कम्युनिस्ट पक्षासाठी गुप्तहेरी करणारी संस्था.
  • के.जी.बी. - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव.
  • गेस्टापो - दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा.
  • जी.आय.यू.. - रशियाची ताकदवर परदेशी लष्करांची गुपिते शोधून काढणारी संस्था.
  • डी.जी.एस.ई. - छोटे-मोठे संभाव्य परकीय हल्ल्यांचा शोध घेणारी फ्रान्सची लष्करी संस्था.
  • बी.एन.डी. - जर्मनीची आंतरराष्ट्रीय संदेशांवर लक्ष ठेवून असणारी गुप्तहेर संस्था.
  • मोसाद - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्‌व्यापी कारवाया करणारी संस्था.
  • रॉ - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था.
  • सी.आय.ए. - अमेरिकेची जगड्‌व्याळ गुप्तहेर संघटना.
  • सी.आय.डी. - भारताची अंतर्गत गुन्हेशोधक संस्था.

पुस्तके

संपादन
  • अमेरिकेची सी.आय.ए. (लेखक : पंकज कालुवाला) - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे.
  • इस्रायलची मोसाद (लेखक : पंकज कालुवाला) - परममित्र पब्लिकेशन्स
  • गॉर्डन थॉमस यांच्या ‘गिडिऑन्स स्पाइज : द सीक्रेट हिस्टरी ऑफ मोसाद’ या पुस्तकात इस्रायली गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ने आजवर विविध देशांमध्ये केलेल्या अधिकृत सरकारी चोऱ्या आणि खुनाच्या कहाण्या वाचायला मिळतात.
  • जर्मन गुप्तचर यंत्रणा (लेखक : पंकज कालुवाला) - परममित्र पब्लिकेशन्स
  • ब्रिटिश गुप्तहेर संघटना (लेखक : पंकज कालुवाला) - परममित्र पब्लिकेशन्स
  • राजकीय हत्या (लेखक : पंकज कालुवाला) - परममित्र पब्लिकेशन : या पुस्तकाला 'समाजविज्ञान कोशकर्ते' गर्गे पारितोषिक मिळाले आहे.
  • राॅ : भारतीय गुप्तचर संघटनेची गूढगाथा (लेखक : रवी आमले) - मनोविकास प्रकाशन
  • सोव्हिएत रशियाची के.जी.बी. (लेखक : पंकज कालुवाला) - परममित्र पब्लिकेशन्स