गाय छाप जर्दा हा संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख उत्पादन आहे. हा जर्दा (तंबाखूचा एक प्रकार) भारतातील जनतेमध्ये सुपरिचित आहे.

गाय छाप जर्दा पुडीच्या एका बाजूचे छायाचित्र
गाय छाप जर्दा पुडीच्या दुसऱ्या बाजूचे छायाचित्र

इतिहास

संपादन

'गाय छाप जर्दा' या उत्पादनाची सुरुवात या मालपाणी उद्योग समूहाने ९ जुलै इ.स.१८९४ रोजी केली.[]दामोदर जगन्नाथ मालपाणी यांनी हा जर्दा भारतीय बाजारपेठेत प्रस्तुत केला. ते जर्दा या प्रकाराचे पहिले उत्पादक होते.

साहित्यिक मूल्य

संपादन

'गाय छाप जर्दा'या तंबाखूस मराठी, हिंदी अन्य भारतीय भाषेतील साहित्यात एक साहित्यिक संदर्भ आणि मूल्य आहे.

"अरं ये नवन्या एक गाय छाप घे बर संपत आलीया पुडी... जाता जाता नवनाथच्या टपरीवरून गायछाप घेऊन खिशात कोंबत रानात जायला तो सज्ज झाला होता.[]
"(काय ढेकूण चावले हो त्या अर्ध्या तासात! आणि तो गोण्या ज्योतिषी , त्याला त्याचे काही नाही, आपला मजेत गाय छाप मळत होता)" []
"गजा शिपणे करून परतेस्तवर मनातल्या मनात बापाबरोबरच्या मीटिंगची तयारी करत आंगण्यातल्या मांडवाखालच्या माचल्यावर शवासन सुरू केले होते. "झोपू देस हो बिचाऱ्यास, दमला असेल बिचारा", गजा हळूच बायकोला म्हणाला. "मी कशास जात्ये उठवायास त्यास? तुम्हीच काहीतरी खेकटे काढून झोपमोड कराल त्याची. स्वस्थ म्हणून बसवलांय कधी तुम्हांला?" असे सणसणीत प्रत्युत्तर मिळाल्यावर मात्र तो मुकाट गाय छाप जर्दा चोळत झोपाळ्यावर झोके काढत बसला."[]
"आता मात्र एक आणि एकच आबा आहेत. हो, तेच ते, "गाय छाप'चे माजी brand ambassador आबा तासगावकर. त्यांच्याकडे एवढे मोठे सांस्कृतिक पद आहे, याचा महाराष्ट्राला पत्ताच नव्हता."[]
" प्रिन्स गुटखा होता तेंव्हा, तो नसेल तोंडात तर विल्स, दोन्हीचा कंटाळा आला असेल तर गाय छाप,"[]

वाक्यात असा उपयोग करून लेखन गेले आहे आणि केले जाते.

संवादाचे माध्यम

संपादन

"जरा पुडी बघू" म्हणून कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद सुरू होतो, तेंव्हा ती पुडी 'गाय छाप जर्दा'ची असणे, हे बहुतेकदा निश्चित असते.[ संदर्भ हवा ] या संवादाचे वर्णन केल्याखेरीज भारतीय ग्रामीण साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. याचे प्रत्यंतर सर्व प्रादेशिक भाषेतील साहित्यात, लेखनात आढळते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, कविता, यात तर ते आढळतेच. लेखकास त्याचे वर्णन करण्यासाठी खूपच निरीक्षण करणे आवश्यक असते. खास करून नाटकात 'जर्दा' खाण्याचा अभिनय करणे, ही अभिनयाची कसोटी असू शकते.

एवढेच नव्हे तर मारामारी, 'बा' 'चा 'बा'ची []ऊर्फ शिव्यागाळीतही जर्दाच्या आदरपूर्वक उल्लेखाची परंपरा आढळते. 'गाय छाप जर्दा' हे मराठी माणसाचे महाराष्ट्रातील उत्पादन असल्याने मराठी साहित्यात त्याचे साहित्यिक प्रतिबिंब प्राथम्याने आढळते. इतर प्रादेशिक भाषांमध्ये – कन्नड, तेलगू, तमिळ या दक्षिणी भाषेतही ते आढळते.[ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]

'गाय छाप' ही तंबाखू असल्याने तिच्यामुळे कर्करोग होतो. तसा वैधानिक इशाराही देण्यात येतो.[]

आरोग्यविद्या या वेबसाईटवरील तंबाखूबद्दलचा लेख

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Malpani Group,Company Profile, http://www.indiamart.com/malpani-group/ Archived 2013-02-13 at the Wayback Machine., ०७ डिसेंबर २०१५ रोजी पहिले
  2. ^ पंचनामा, किश्या, मायबोली,http://www.maayboli.com/node/48138
  3. ^ माझे ज्योतिषांचे अनुभव काही कडू , गोड आणि आंबट!, प्रेषक कागदी वाघ, मनोगत, http://www.manogat.com/node/25540,०७[permanent dead link] डिसेंबर २०१५ रोजी पहिले
  4. ^ भुरकुंडीचे देव-१, मनोगत, http://www.manogat.com/node/12400,०७[permanent dead link] डिसेंबर २०१५ रोजी पहिले
  5. ^ चंद्रहास मिरासदार, स्टुडन्ट ऑफ द इयर, सकाळ साप्ताहिक, दि.०८ डिसेंबर २०१२,http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20121208/4670711145571122797.htm,०७[permanent dead link] डिसेंबर २०१५ रोजी पहिले
  6. ^ जयंत विद्वांस, सतू..., http://jayantvidwans.blogspot.in/2015/08/blog-post_6.html,०७ डिसेंबर २०१५ रोजी पहिले
  7. ^ 'बा' चा 'बा' ची या शब्दाचा प्रताधिकार मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्याकडे जातो - श्रीनिवास हेमाडे
  8. ^ "Tobacco". National Cancer Institute (इंग्रजी भाषेत). 2018-12-29 रोजी पाहिले.