गमाल आब्देल नासेर

(गमाल अब्देल नासर या पानावरून पुनर्निर्देशित)

गमाल आब्देल नासेर (अरबी: جمال عبد الناصر, १५ जानेवारी १९१८ - २८ सप्टेंबर १९७०) हा इजिप्त देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९५७ ते १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला नासेर त्यापूर्वी देशाचा उपपंतप्रधान होता. १९३८ ते १९५२ दरम्यान इजिप्तच्या लष्करामध्ये राहिल्यानंतर नासेरने १९५२ सालच्या इजिप्तमधील क्रांतीमध्ये पुढाकार घेतला होता.

गमाल आब्देल नासेर

इजिप्त ध्वज इजिप्तचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२३ जून १९५६ – २८ सप्टेंबर १९७०
मागील मुहम्मद नजीब
पुढील अन्वर अल सादात

कार्यकाळ
५ ऑक्टोबर १९६४ – ८ सप्टेंबर १९७०
मागील योसिफ ब्रोझ तितो
पुढील केनेथ कॉंडा

जन्म १५ जानेवारी, १९१८ (1918-01-15)
अलेक्झांड्रिया, इजिप्त
मृत्यू २८ सप्टेंबर, १९७० (वय ५२)
कैरो
धर्म सुन्नी इस्लाम

शीत युद्ध काळादरम्यान नासेरने तटस्थ राहणे पसंद केले तसेच सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ह्या कारणांस्तव नासेर इजिप्त व अरब जगतात लोकप्रिय होता. त्याला विसाव्या शतकामधील मध्य पूर्व भागातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाते. १९६४ ते १९७० दरम्यान तो अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरचिटणीस होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: