गजनी (२००५ तमिळ चित्रपट)


गजनी(तमिळ:கஜீனீ (कजीनी) /तेलुगु:గజీనీ/ इंग्लिश: Ghajini/Kajini) हा एक भारतात बनलेला एक व्यावसायिक तमिळ भाषेतील चित्रपट आहे.(प्रदर्शित : २९ सप्टेंबर २००५).हा एक थरारक कथानकाचा तमिळ भाषेतील २००५ साली निर्माण झालेला चित्रपट आहे."ए.आर.मुर्गदास" हे हया चित्रपटाचे दिग्दर्शक असून "हॅरिस जयराज" यांनी त्याला संगीत दिले आहे. "सुर्या सिवकुमार ","असिन","नयनतारा" तसेच प्रदिप रावत,रियाज खान ह्यात मुख्य भुमिकेत आहेत.त्यानंतर २५ डिसेंबर २००८ रोजी हा ("गजनी")चित्रपट ह्याच नावाने हिंदीत पुनःर्निमित करून पुनःप्रदर्शित करण्यात आला.हिंदी गजनीत दोन मुख्य बदल करण्यात आले होते. सुर्याच्या जागी अभिनेता म्हणुन निर्माता आमिर खान ने काम केले होते तसेच साहाय्यक भुमिकेत नयनतारा ऐवजी जिया खान हिला घेण्यात आले होते.हा आता पर्यंत निर्माण झालेल्या हिंदी चित्रपटांतील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणुन गाजला.

गजनी /कजीनी
கஜினி.jpg
गजनी/कजीनी (तमिळ)
दिग्दर्शन ए.आर.मुर्गदास
निर्मिती सेलम ए.चंद्रसेकरन
कथा ए.आर.मुर्गदास
पटकथा ए.आर.मुर्गदास
प्रमुख कलाकार असिन, सुर्या सिवकुमार,प्रदिप रावत,रियाझ खान,नयनतारा.
संवाद ए.आर.मुर्गदास
संकलन ॲंथनी(आंटनी)
छाया आर.डी.राजसेकर
कला सुनिल बाबु.
संगीत हॅरिस जयराज
पार्श्वगायन कार्तिक,चित्रा,
नृत्यदिग्दर्शन राजू सुंदरम,वृंदा,कल्याण,दिनेश.
साहस दृष्ये कनल कण्णन.
देश भारत
भाषा [[तमिळ. भाषा|तमिळ.]]
प्रदर्शित सप्टेंबर २९, २००५
वितरक श्री सरवणा मुव्हीज
अवधी १८०मी.
पुरस्कार फिल्मफेअर,तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार.
निर्मिती खर्च ७ कोटी.
एकूण उत्पन्न $१० दशलक्ष.(सुमारे ५५ कोटी रुपये.)


कथानकसंपादन करा

पात्रसंपादन करा

  • असिन तोट्टुंकळ- नायिका, कल्पना शेट्टी(जाहिरात नायिका).
  • सुर्या सिवकुमार-नायक, संजय रामस्वामी उर्फ मनोहर(एअरव्हॉईस सेल्यूलर कं.चा मालक).
  • नयनतारा- साहाय्यक नायिका ,चित्रा वैद्यकीय महाविद्यालयातील एक विद्यार्थी.
  • प्रदिप रावत- खलनायक,रामदेव आणि लक्ष्मण जुळे बंधू,एक प्रसिद्ध व्यवसायिक.
  • रियाझ खान- साहाय्यक कलाकार,पोलिस इन्स्पेक्टर.

पुरस्कारसंपादन करा

इ.स. २००६ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार

इ.स. २००६ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण

हेसुद्धा पहासंपादन करा