गंगाखेड तालुका
हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या गावात गोदावरी नदीच्या काठावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. प्राचीन इतिहास असलेल्या या गावात अनेक जुन्या घरांचे राजवाड्यांचे अवशेष सापडतात. गोदावरी नदीकडील परिसरातील अनेक घरांचे बांधकामे ही जुन्या पद्धतीची आणि दगडांनी बनलेली आहेत. जस जसा गंगाखेडचा विस्तार होत गेला. तस तशा या गावात अनेक नवनवीन पद्धतीची बांधकामे होण्यास सुरुवात झाली आणि नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत.
?गंगाखेड जनाईनगरी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | २२.८१ चौ. किमी |
मुख्यालय | परभणी |
विभाग | औरंगाबाद विभाग |
जिल्हा | परभणी |
भाषा | मराठी |
तहसील | गंगाखेड |
पंचायत समिती | गंगाखेड |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 431514 • MH 22 |
भौगोलिक स्थान
संपादनगंगाखेड तालुका हा महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे. हा तालुका परळीपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे ही मोठे मंदिर आहे. गंगाखेड हे गाव दक्षीण काशी म्हणूनही ओळखले जाते.
गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी दुसऱ्या कुठल्याही मिठाई पेक्षा कलम ही मिठाई जास्त पसंद करतात. गंगाखेड मध्ये सोमवार बाजार भरतो, या आठवडी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात. तसेच तालुक्यातील बहुतांश गावातील लोक आठवडी बाजार करण्यासाठी गंगाखेड येथे जमा होतात, त्यामुळे गंगाखेड शहर व बाजारपेठ समृद्ध झाले आहे.
तालुक्यातील गावे
संपादनअकोली आनंदनगर (गंगाखेड) आनंदवाडी (गंगाखेड) अंतरवेली अरबुजवाडी बडवणी बनपिंपळा बेलवाडी भांबरवाडी भेंडेवाडी बोर्डा बोथी बोथीतांडा ब्रह्मनाथवाडी चिलगरवाडी चिंचटाकळी दगडवाडी (गंगाखेड) दामपूरी देवकतवाडी धनगरमोहा धारासुर धारखेड ढवळकेवाडी ढेबेवाडी (गंगाखेड) डोंगरगाव शेळगाव डोंगरजवळा डोंगरपिंपळा दुसलगाव गंगाखेड गौळवाडी (गंगाखेड) गौंडगाव घटांग्रा घटांग्रातांडा गोदावरी तांडा गोपा गुंजेगाव (गंगाखेड) हनुमाननगर (गंगाखेड) हरंगुळ इलेगाव इरळद इसाद जवळारुमना कड्याचीवाडी कांगणेवाडी कासारवाडी (गंगाखेड) कातकरवाडी कौडगाव (गंगाखेड) खादगाव खळी खंडाळी (गंगाखेड) खोकलेवाडी कोद्री कुंडगीरवाडी लिंबेवाडी लिंबेवाडी तांडामहातपुरी मैराळसावंगी माखणी मालेवाडी (गंगाखेड) मानकादेवी मरगळवाडी मरडसगाव मरगळ वाडीमसला मसनेरवाडी मुळी नागठाणा (गंगाखेड) नरळद निळानाईकतांडा पडेगाव पांधरगाव पांगरी (गंगाखेड) फुगनारवाडी पिंपळदरी पिंपरीझोला पोखर्णीवाळके पोटा राणीसावरगांव रुमनाजवळा सांगळेवाडी सायळासुनेगाव शंकरवाडी शेलमोहा शेंडगा शिवाजीनगर (गंगाखेड) सीरसम शेगाव सुणेगावसयाला सुप्पा(जागीर) सुप्पा(खालसा) सुप्पातांडा सुरळवाडी टाकळवाडी तांदुळवाडी (गंगाखेड) टोकवाडी उखळी खुर्द उमलानाईकतांडा उंबरवाडी (गंगाखेड) उंडेगाव विठ्ठलवाडी (गंगाखेड) वाघलगावगोपा वागदरा (गंगाखेड) वागदरातांडा वागदरी (गंगाखेड) वरवंटी झोला खोकलेवाडी
हवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.