खोरनिनको हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?खोरनिनको

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लांजा
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान संपादन

हे गाव लांजा बस स्थानकापासून वेरवली, कोर्ले मार्गाने २२ किमीवर वसलेले आहे.हे अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले एक छोटेशे खोरे आहे आणि लोकसंख्या ५०० च्या खाली आहे.पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो व असंख्य लहान मोठे धबधबे कोसळत असतात. धबधब्याची मजा लुटण्यासाठी येथे हौशी पर्यटक आवर्जून येतात.इथूनच डोंगरी वाटेने विशालगडावर जाता येते.हिवाळ्यात थंडगार तर उन्हाळ्यात जास्त उष्ण असे येथील हवामान आहे.

लोकजीवन संपादन

येथील लोक फार कष्टाळू, मेहनती, काटक, जिद्दी, धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. नागलीशेती, भातशेती,तसेच शेतीपूरक जोडधंदे म्हणून शेळीपालन, बकरीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय हे येथील व्यवसाय आहेत. जवळच असलेल्या प्रभानवल्ली गावाच्या आठवडा बाजारात सामान खरेदी विक्री केली जाते.

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा संपादन

लांजा बस स्थानकातून येथे थेट एसटी बससेवा उपलब्ध आहे. सार्वजनिक स्वच्छता, वीजपुरवठा, आरोग्यसेवा ग्रामपंचायतमार्फत उपलब्ध केली जाते.पाणीपुरवठा विहिरी, बोरिंग, झरे, व बारमाही वाहणाऱ्या मुचकुंदी नदीतून होतो.

जवळपासची गावे संपादन

बुद्धवाडी तर्फे सालपे,केळवली, नामे, पालू, बाणखोर, प्रभानवल्ली, भांबेड, हर्दखळे, कुडेवाडी, वाघणगाव, विलवडे ही जवळपासची गावे आहेत.खोरनिनको ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]

संदर्भ संपादन

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html