मुख्य मेनू उघडा
हे चिनी नाव असून, आडनाव वान असे आहे.
क्वोक वान

क्वोक वान (मराठी लेखनभेद: कोक वान ; रोमन लिपी: Gok Wan ) (९ सप्टेंबर, इ.स. १९७४ - हयात) हा ब्रिटिश फॅशन सल्लागार आहे. तो दूरदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींना व इतरेजनांना फॅशनविषयक सल्ले देतो. आंतरराष्ट्रीय फॅशन नियतकालिकांमध्ये त्याची फॅशनविषयक मते, लेख प्रसिद्ध होतात.

जीवनसंपादन करा

क्वोकाचा जन्म लेस्टर येथे झाला. त्याचे वडील जॉन तुंग शिंग हे चिनी आहेत (ते हाँगकाँग येथे जन्मले व वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी इंग्लंडात स्थलांतर केले) व आई मायरा ही ब्रिटिश आहे. त्याचे बालपण व्हेट्स्टोन, लेस्टरशर येथे गेले. येथे त्याच्या आईवडिलांचे रेस्टॉरंट होते. त्याला एक लहान भाऊ व एक मोठी बहीण अशी भावंडे आहेत.

कारकीर्दसंपादन करा

गेली दहा वर्षे, वानाने ब्रायन फेरी, ऑल सेंट्स्, डॅमियन लुईस, व्हनेसा मे, वेड रॉबसन, जॉनी वॉन अशा अनेक नामवंतांबरोबर कामे केली आहेत. टॅटलर, ग्लॅमर, टाईम्स स्टाईल, मेरी क्लेअर, कॉस्मॉपॉलिटन अशा अनेक फॅशनविषयक नियतकालिकांमध्ये त्याने लेखन केले आहे.

एमटीव्ही शेकडाऊन (एमटीव्ही युरोप), जीएमटीव्ही (आयटीव्ही), बिग ब्रदर्स लिट्ल ब्रदर (चॅनल ४), बॅटल ऑफ द सेक्सेस (बीबीसी१), द राईट स्टफ (फाईव्ह), मेक मी अ ग्रोन अप (चॅनल ४/टी४), द एक्स्ट्रा फॅक्टर (आयटीव्ही२) आणि टी४ (चॅनल ४) अशा अनेक दूरदर्शन कार्यक्रमांसाठी त्याने फॅशन सल्लागार म्हणून काम केले आहे.

बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.