क्रूप (किंवा लॅरिंगोट्राकिओ ब्रॉनकाइटिस ) हा एक श्वसनासंबधीचा आजार आहे. सामान्यत: हवेच्या मार्गातील वरच्या भागातील तीव्र विषाणू (रोगजंतू) संसर्ग त्यास कारणीभूत ठरतो. या संसर्गामुळे गळयाला सूज येऊन सामान्य श्वसनास अडथळा निर्माण होतो व “कोरडा खोकला (सील माश्याच्या ओरडण्यासारखा आवाज)” खाकरणे, श्वसन करताना येणारा आवाज, आणि घोगरेपणा ही अभिजात लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे सौम्य, संयमित किंवा तीव्र असु शकतात आणि अनेकदा रात्री अधिक त्रासदायक होतात. अनेकदा मुखावाटे घायच्या औषधाच्या स्टरॉईड एकाच घटकाने त्यावर उपाय केला जातो; कधीकधी जास्त तीव्र आजारामध्ये एपिनेफ्रिन वापरले जाते. क्वचितच रुग्णालयात दाखल करायची वेळ येते.

क्रूप
----
क्रूपपिडित बालकाच्या गळ्याच्या ए.पी. एक्स रे (क्ष किरण चित्रामध्ये) दिसणारे मनोऱ्यासारखे चिन्ह
ICD-10 J05.0
ICD-9 464.4
DiseasesDB 13233
MedlinePlus 000959
eMedicine ped/510 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2
MeSH D003440

जर लक्षणांच्या संभवनीय अतितीव्र कारणांना (म्हणजे एपिग्लोटिटिस किंवा हवेच्या मार्गातील परका भाग वगळले असेल, तर क्रूपचे निदान वैद्यकीय पद्धतीने केले जाते. पुढील तपासण्या, उदाहरणार्थ रक्ताची तपासणी, क्ष-किरण चित्र, आणि (विषाणूंच्या) विकासाचा अभ्यास यांची सामान्यतः गरज नसते. तुलनात्मक दृष्टीने पाहता हा एक सर्वत्र आढळणारा आजार असून सुमारे १५% मुलांमध्ये तो कधीनाकधी, जास्त करून ६ महिने ते ५-६ वर्षाच्या वयामध्ये आढळून येतो. पौंगडावस्थेतल्या मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये तो बहुतेक दिसून येत नाही. एकेकाळचे मुख्य कारण डिफ्थेरिया,यासलसीकरणाच्या यशामुळे आणि सुधारित निरोगी जीवनपद्धतीमुळे पाश्चिमात्य जगात आता मुख्यतः ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.

चिन्हे व लक्षणे

संपादन
[[:File:Stridor 2OGG.ogg|]]
13 महिन्याच्या क्रूपपिडित बालकामध्ये श्वास आत घेताना व बाहेर सोडताना येणारा आवाज.

Problems playing this file? See media help.

"कोरडा ख़ोकला (सील माश्याच्या ओरडण्यासारखा आवाज)" खाकरणे, श्वसन करताना येणारा आवाज, घोगरेपणा, आणि शवसनास अडथळा ही क्रूपची वैशिष्ट्ये असून त्यांची तीव्रता रात्री वाढते.[] कोरडया खोकल्याचे वर्णन नेहमी त्याचेसील किंवासी लायनच्या आवाजाबरोबर असलेले सार्धम्य दाखवून केले जाते.[] व्याकुळ होण्याने किंवा रडण्यामुळेश्वसनाच्या आवाजाची (स्ट्राइडर) तीव्रता वाढते, आणि जर का श्वसनाचा आवाज (स्ट्राइडर) आरामदायक अवस्थेत पण ऐकु येत असेल तर ते हवेच्या मार्गाचे चिंताजनक संकुचणे दर्शविते. क्रूपची तीव्रता वाढत गेली की श्वसनाचा आवाज बराच कमी होऊ शकतो.[]

इतर लक्षणांमध्ये ताप, कराइझा (सर्दी सारखा आजर) (सामान्य सर्दीची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे ), आणिछातीच्या भिंतीचे आत ओढले जाणे यांचा समावेश आहे.[][] लाळ गळणे किंवा अतिशय आजारी दिसणे ही लक्षणे दुसरा कोणतातरी आजार असल्याचे दर्शवितात.[]

कारणे

संपादन

सामन्यतः क्रूप हा विषाणू संसर्गामुळे होतो असे समजले जाते.[][] काहीजण हा शब्द ढोबळ मानाने, तीव्र लॅरिंगोट्राकाईटिस,मधून मधून येणारा क्रूप (स्पॅझ्मॉडिक क्रूप), लॅरिंगिअल डिप्थेरिया , बॅक्टेरिअल ट्राकाईटिस , लॅरिंगोट्राकिओ ब्रॉनकाइटिस, आणि लॅरिंगोट्राकिओब्रॉनकोन्युमोनिटिस या आजारांसाठी वापरतात. पहिल्या दोन आजारंमध्ये विषाणूसंसर्गाचा समावेश असतो आणि सामान्यतः वैद्यकीय लक्षणांच्या अभ्यासाच्या तुलनेत सौम्य असतात; शेवटचे चार हे जैवाणिक (सूक्ष्म रोगजंतूच्या) संसर्गामुळे होतात व सामान्यतः तीव्र असतात.[]

विषाणू संसर्गाने होणारा

संपादन

विषाणू संसर्गाने होणारा क्रूप किंवा तीव्र लॅरिंगोट्राकाईटिस हा पॅराइंफ्लुएंझा विषाणूमुळे होतो, प्रामुख्याने ७५% रोग्यांमध्ये त्याचे प्रकार १ आणि २ दिसून येतात.[] इतर विषाणूंच्या अभ्यासामध्ये (एटिओलॉजी), इंन्फ्लुएंझा अ आणि ब, गोवर (मीझल्झ, अ‍ॅडेनो विषाणू आणिरेस्पिरेटरी सिंसिटिकल विषाणू (आर. एस. व्ही.)यांचा समावेश आहे.[] मधून मधून येणारा क्रूप (स्पॅझ्मॉडिक क्रूप) हा, तीव्र लॅरिंगोट्राकाईटिस ज्या विषाणूंमुळे होतो त्याच वर्गातील विषाणूंमुळे होतो, पण संसर्गाची सामान्य लक्षणे दिसून येत नाहीत (जसे ताप, घसा दुखणे आणि पांढऱ्या रक्तपेशींच्या संख्येत वाढ).[] उपचार, आणि उपचारास मिळणारा प्रतिसाद सुद्धा समान असतात.[]

जिवाणूंमुळे (अतिसुक्ष्म रोगजंतूंमुळे) होणारा

संपादन

अतिसुक्ष्म रोगजंतूंमुळे होणाऱ्या क्रूपचे लॅरिंगिअल डिप्थेरिया, जैवाणिक ट्राकाइटिस, लॅरिंगोट्राकिओ ब्रॉंकाइटिस आणि लॅरिंगोट्राकिओब्रॉनकोन्युमोनिटिस यांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.[] लॅरिंगिअल डिप्थिरिया हा 'कॉरिनिबॅक्टेरियम डिप्थेरिए मुळे होतो तर जवाणिक ट्राकाइटिस, लॅरिंगोट्राकिओ ब्रॉंकाइटिस आणि लॅरिंगोट्राकिओब्रॉनकोन्युमोनिटिस हे सामन्यतः सुरुवातीला विषाणूंच्य संसर्गाने आणि नंतर जिवाणूंच्या वाढीने होतो. स्टॅफिलोकोकस ऑरिअस, स्टॅफिलोकोकस न्युमोने, हेमोफिलस इंफ्लुएंझे, आणि मोराझेला कॅटॅऱ्हलिस हे जिवाणु सर्वात जास्त आढळतात.[]

पॅथोफिजिओलॉजी (रोगनिदान-शरीरविज्ञानशास्त्र)

संपादन

ज्या विषाणूसंर्गामुळे क्रूप होतो , त्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी (विशेषतः हिस्टिओसाईट्स, लिम्फोसाईट्स, प्लॅझ्मा पेशी, आणिन्युट्रोहिलिस [] आत शोषल्या जाऊन घसा (लॅरिंक्स, ट्राकिआ ), आणि मोठी लघुश्वासनलिका यांना सूज येते []. सूजेमुळे हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. तो जर महत्त्वपूर्ण असेल तर त्यामुळे श्वसनाचे कार्य नाट्यमयरित्या वाढते आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रक्षुब्धता, हवेच्या प्रवाहाचा आवाज म्हणजेच “श्वसन करताना येणारा आवाज (स्ट्राईडर) “ दिसून येतात.[]

रोगनिदान

संपादन
वेस्टले गुण संख्या: क्रूपच्या तीव्रतेची वर्गवारी[][]
विशिष्ट लक्षण या लक्षणास दिलेले गुण
छातीची भिंत
मागे ओढणे
अजिबात नाही सौम्य संयमित तीव्र
श्वसन करताना येणारा आवाज अजिबात नाही
व्याकुळतेने
आरामदायक अवस्थेत
त्वचा निळसर होणे (सायानोसिस) अजिबात नाही
व्याकुळतेने
आरामदायक अवस्थेत
शुद्धीची
पातळी
सामान्य गोंधळलेली
हवेचा मार्ग सामान्य कमी झालेला ठळकपणे कमी झालेला

क्रूप हे एक वैद्यकीय निदान आहे.[] सर्वप्रथम हवेच्या मार्गाच्या वरील भागातील अडथळे, जसे विशेषतः एपिलोग्लोटिटिस, हवेच्या मार्गातीलपरकी गोष्ट, सबग्लोटिक स्टिनोसिस , अ‍ॅंजिओएडेमा, रेट्रोफॅरेंजिअल गळू (अ‍ॅबसिस) , आणिजैवाणिक ट्राकाईटिस दूर केले पाहिजेत.[][]

साधारणतः गळ्याचे समोरील क्ष-किरण चित्रकाढले जात नही,[] पण जर का ते काढले असेल तर त्याच्यात श्वासनलिकेचे वैशिष्ट्यपूर्ण अरुंदीकरण झालेले दिसून येते. त्यास मनोऱ्यासारखे चिन्ह, असे म्हणतात. श्वासनलिकेचे हे अरुंदीकरण मनोरादिसणाऱ्या सबग्लोटिक स्टिनोसिसमुळे होते. मनोऱ्यासारखे चिन्ह हे आजाराचे सूचक असते, पण अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये ते अनुपस्थित असते.[]

इतर तपासण्या (जसे रक्त तपासण्या आणिविषाणूंचा विकास ) परावृत्त केलेल्या आहेत कारण त्यामुळे रुग्णामध्ये विनाकरण अस्वस्थता निर्माण होऊ शकते व आधीच अरुंद झालेल्या हवेच्या मार्गावरील ताण वाढू शकतो.[] जरी नॅसोफॅरिंगिअल अ‍ॅस्परेशन तर्फे मिळलेली विषाणूंची वाढ (विकास) नेमके कारण शोधाण्यासाठी वापरली जाऊ शकते,ती साधारणतः संशोधनासाठी मर्यादित असते.[]. जर प्रमाणित उपचाराने रुग्णाच्या तब्यतीमध्ये सुधारणा दिसत नसेल तर जैवाणिक संसर्ग लक्षात घेतला जातो, आणि त्यावेळी पुढील तपासण्या सुचवल्या जाऊ शकतात.[]

प्रखरता

संपादन

क्रूपच्या प्रखरतेचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वसामान्यपणे वेस्टले गुणमापन पद्ध्त वापरली जाते. वैद्यकीय सरावापेक्षा ती मुख्यतः संशोधनासाठी वापरली जाते.[] खालील पाच कारणीभूत गोष्टींना दिलेल्या गुणांची ती बेरीज असते: शुद्धीची पातळी, त्वचेचा निळसरपणा (सायनोसिस), श्वसन करताना येणारा आवाज (स्ट्राईडर), हवेचा मार्ग आणि छातीची भिंत मागे ओढणे.[] प्रत्येक गोष्टीला दिलेले गुण हे तक्त्यामध्ये उजवीकडे मांडले आहेत आणि अंतिम गुणसंख्या ० ते १७ च्या मध्ये असते.[]

  • एकूण गुणसंख्या ≤ २ असेल तर ती सौम्य क्रूप दर्शविते. याची वैशिष्ट्ये आहेत: कोरडा खोकला (सील माश्याच्या ओराडण्याप्रमाणे आवाज येणे) आणि घोगरेपणा उपस्थित असू शकतो पण आरामदायक अवस्थेत श्वसनाचा आवाज (स्ट्राईडर) येत नाही.[]
  • एकूण गुणसंख्या ३-५ असेल तर ती संयमित क्रूप दर्शविते. तो सहजपणे ऐकू येणाऱ्या श्वसनाच्या आवाजाने (स्ट्राईडर) ओळखता येतो आणि इतर फर कमी चिन्हे दिसून येतात.[]
  • एकूण गुणसंख्या ६-११ असेल तर ती तीव्र क्रूप दर्शविते. यात सुद्धा श्वसनाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, तसेच छातीच्या भिंतीचे आत ओढले जाणे पण दिसून येते.[]
  • एकूण गुणसंख्या ≥ १२ असेल तर ती लवकरच श्वसनसंस्था निकामी होऊ शकण्याचा धोका दर्शविते. या टप्प्यावर कोरडा खोकला (सील माश्याच्या ओराडण्याप्रमाणे आवाज येणे) आणि श्वसनाचा आवाज येणे (स्ट्राईडर) ही लक्षणे लक्षवेधी राहात नाहित[]

अतिदक्षता विभागात आणलेल्या बालकांपैकी ८५% बालकांना सौम्य आजार असतो; तीव्र क्रूप दुर्मिळ (<१%) असतो.[]

प्रतिबंध

संपादन

क्रूपच्या अनेक घटनांवर इन्फ्लुएंझा आणि डिप्थेरियाया रोगांपासुनच्या सुरक्षिततेच्या उपायांमुळे प्रतिबंध केलेला आहे. एके काळी क्रूपला डिप्थेरिअल आजार म्हणून संबोधले जायचे, पण लसीकरणामुळे आता विकसित जगामध्ये डिप्थेरिआ दुर्मिळ झाला आहे.[]

उपचार

संपादन

सर्वसामान्यपणे क्रूप झालेल्या मुलांना शक्य तेवढे आरामदायक अवस्थेत ठेवण्यात येते.[] आजाराची तीव्रता जास्त असलेल्या रुग्णांना नित्यक्रमाने एपिनेफ्राईनसह स्टरॉईड्स देण्यात येतात.[] ज्या बालकांमध्येप्राणवायुची संपृक्तता (ऑक्सिजन सॅच्युरेशन) ९२% पेक्षा कमी असते त्यांना प्राणवायु मिळाला पाहिजे [] आणि ज्यां बालकांमध्ये क्रूप तीव्र असतो त्यांना निरिक्षाणासाठी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते.[] जर प्राणवायूची गरज असेल तर "ब्लो – बाय " उपचार( बालकाच्या चेहऱ्याजवळ प्राणवायुचा पुरवठा करणे ) सुचविला जातो, त्यामुळे मुखाच्छादन(ऑक्सिजन मास्कमुळे) निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेपेक्षा कमी अस्वस्थता निर्माण होते. ref name="Cherry08_NEJM"/> उपचारामुळे 0.2% पेक्षा कमी रुग्णांना एण्डोट्राकिअल इन्ट्युबेशनची गरज पडते.[]

स्टरॉईड्स

संपादन

बालकांमधील क्रूपच्या सर्व प्रकारच्या तीव्रतेच्या पातळीमध्ये कॉर्टिकोस्टरॉईड्स , जसे डेक्सामेथाझोन आणिबुडेसोनाईड मुळे परिणामांमध्ये सुधारणा झालेली दिसली आहे.[] औषध दिल्यानंतर कमीतकमी सहा तासात रुग्णास पुरेसा आराम मिळतो.[] औषध जर तोंडाने, नसांवाटे (पॅरेंटरली) किंवा श्वसनावाटे दिल्यास ते परिणामकारक असते, पण तोंडाने औषध देणे अधिक पसंत केले जाते.[] नेहमी औषधाच्या फक्त एका भागाची गरज पडते, आणि साधारणपणे सुरक्षित समजला जातो.[] डेक्सामेथाझोनचे 0.15, 0.3 आणि 0.6 mg/kgचे भाग समान परिणामकारक असतात.[]

एपिनेफ्रिन

संपादन

मर्यादित ते तीव्र क्रूपवर नेब्युलाईझ्ड एपिनेफ्रिन ने तात्पुरता उपचार केला जातो.[] जरी एपिनेफ्रिन वैशिष्ट्यापूर्णरित्या १० ते ३० मिनिटंमध्ये क्रूपची तीव्रता कमी करते तरी त्याचे फायदे फक्त 2 तासांसाठी टिकतात.[][] उपचारानंतर जर २-४ तासांमध्ये रुग्णाची अवस्था सुधारित राहिली आणि आजारात इतर कोणतीही भर झाली नाही तर बालकाला रुग्णालयातून जाऊ दिले जाते.[][]

जरी क्रूपसाठी इतर उपचारांचा अभ्यास केला गेला असला तरी कोणत्याही उपचाराच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी त्यांचे कोणतेही पुरेसे पुरावे उपलब्ध नाही आहेत. श्वसनावाटे गरम वाफ किंवा दमट हवा आत घेणे हा एक पारंपारिक स्वतःची काळजी घेण्याचाउपचार आहे,पण वैद्यकीय अभ्यास त्याची परिणामकारकता सिद्ध करू शकला नाही [][] आणि सध्या तो क्वचितच वापरला जातो.[] खोकल्याची औषधे ज्यात नेहमी डेक्स्ट्रोमेथोरफान आणि/किंवा गिआफेन्सिन असते त्यांचा वापरसुद्धा परवृत्त केलेला आहे.[] पूर्वी श्वसन करताना हेलिऑक्स (हेलियम आणिऑक्सिजन यांचे मिश्रण), श्वसनावरील ताण कमी करण्यासाठी वापरले जायचे,पण त्याच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी खूप कमी पुरावे उपलब्ध आहेत.[१०] सामान्यतः क्रूप विषाणू संसर्गामुळे होत असल्याने, जोपर्यंत दुय्य्म जैवाणिक संसर्गाचा संशय येत नाही तोपर्यंत सुक्ष्मजंतुनाशक वापरले जात नाही.[] दुय्य्म जैवाणिक संसर्गाच्या शक्यतांमध्ये व्हॅनकोमायसिन आणि सेफोटॅक्सिम या सुक्ष्मजंतुनाशकांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.[] इंफ्लुएंझा अ किंवा ब बरोबर आजाराची तीव्रता जास्त असलेल्या रुग्णांमध्ये विषाणूनाशक (अ‍ॅन्टीव्हायरल) न्युरामिनिडेस इनहिबिटर दिले जाऊ शकते.[]

रोगाचे संभाव्य चढ-उतार

संपादन

सामन्यत: विषाणूसंसर्गामुळे झालेला क्रूप हा एक स्व-संयमित आजार आहे, पण खूप क्वचितपणे त्याची अयशस्वी श्वसनामुळे आणि / किंवा ह्रृदयक्रिया बंद पडल्यामुळे मृत्युमध्ये परिणीती होऊ शकते.[] दोन  दिवसांत लक्षणांमध्ये वाढ दिसून येते, पण ते सात   दिवसांपर्यंत राहू शकतात.[] इतर असामान्य गुंतागुंतीमध्ये जैवाणिक ट्राकाईटिस, न्युमोनिया, आणिपल्मोनरी एडेमा यांचा समावेश आहे.[]

रोगपरिस्थितीविज्ञान

संपादन

साधारण १५% बालकांना क्रूप होतो आणि सामान्यतः ६ महिने ते ५-६ वर्षे वयाच्या बालकांना होतो.[][] या बालकांमधील साधारण ५% बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागते.[] क्वचितच हा आजार ३ महिन्याच्या लहान किंवा १५ वर्षाच्या मोठ्या मुलांमध्ये दिसून येतो.[] मुलिंपेक्षा मुलांमध्ये हा आजार ५०% जास्त वारंवारितेने होतो आणि त्याचा हिवाळयामध्ये (शरद ऋतु) जास्त फैलाव दिसून येतो.[]

इतिहास

संपादन

क्रूप शब्द हा आरंभिक आधुनिक इंग्रजी मधील क्रियापद क्रूप पासून तयार झाला आहे व त्याचा अर्थ आहे " घोगऱ्या आवाजात कर्कश्शपणे रडणे "; पहिल्यांदा स्कॉटलंडमध्ये आजाराला हे नाव दिले गेले आणि अठराव्या शतकामध्ये लोकप्रिय करण्यात आले.[११] डिप्थेरिटिक क्रूप हा होमरच्या प्राचीन ग्रीसकाळापासून माहित आहे आणि सन १८२६ मध्ये ब्रेटोनाऊने विषाणू संसर्गामुळे होणारा क्रूप आणि डिप्थेरियामुळे होणाऱ्या क्रूपमधील फरक दाखवून दिला.[१२] नंतर फ्रान्सच्या लोकांनी विषाणूसंसर्गामुळे होणाऱ्या क्रूपला "फो - क्रूप" असे नाव ठेवले , कारण त्याकाळी "क्रूप"चा डिप्थेरिया जिवाणूमुळे होणारा रोग असा उल्लेख केला जायचा.[] डिप्थेरियामुळे होणारा क्रूप अतिशय परिणामकारक अशा रोगापासुनच्या सुरक्षिततेच्या उपायांच्या आगमनामुळे आता जवळ जवळ नाहिसा झाला आहे.[१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d e f g h i j Rajapaksa S, Starr M (2010). "Croup – assessment and management". Aust Fam Physician. 39 (5): 280–2. PMID 20485713. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r Cherry JD (2008). "Clinical practice. Croup". N. Engl. J. Med. 358 (4): 384–91. doi:10.1056/NEJMcp072022. PMID 18216359.
  3. ^ a b c d "Diagnosis and Management of Croup" (PDF). BC Children’s Hospital Division of Pediatric Emergency Medicine Clinical Practice Guidelines.
  4. ^ a b c d e f g h i j k l m n o p Everard ML (2009). "Acute bronchiolitis and croup". Pediatr. Clin. North Am. 56 (1): 119–33, x–xi. doi:10.1016/j.pcl.2008.10.007. PMID 19135584. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  5. ^ a b c d e f g h i j k l Johnson D (2009). "Croup". Clin Evid (Online). 2009. PMC 2907784. PMID 19445760.
  6. ^ a b c Klassen TP (1999). "Croup. A current perspective". Pediatr. Clin. North Am. 46 (6): 1167–78. doi:10.1016/S0031-3955(05)70180-2. PMID 10629679. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  7. ^ a b Russell KF, Liang Y, O'Gorman K, Johnson DW, Klassen TP (2011). "Glucocorticoids for croup". Cochrane Database Syst Rev. 1 (1): CD001955. doi:10.1002/14651858.CD001955.pub3. PMID 21249651.CS1 maint: multiple names: authors list (link)
  8. ^ Port C (2009). "Towards evidence based emergency medicine: best BETs from the Manchester Royal Infirmary. BET 4. Dose of dexamethasone in croup". Emerg Med J. 26 (4): 291–2. doi:10.1136/emj.2009.072090. PMID 19307398. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  9. ^ a b Marchessault V (2001). "Historical review of croup". Can J Infect Dis. 12 (6): 337–9. PMC 2094841. PMID 18159359. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  10. ^ Vorwerk C, Coats T (2010). "Heliox for croup in children". Cochrane Database Syst Rev. 2 (2): CD006822. doi:10.1002/14651858.CD006822.pub2. PMID 20166089.
  11. ^ Online Etymological Dictionary, croup. Accessed 2010-09-13.
  12. ^ a b Feigin, Ralph D. (2004). Textbook of pediatric infectious diseases. Philadelphia: Saunders. p. 252. ISBN 0-7216-9329-6.

बाह्य दुवे (एक्सटर्नल लिंक्स)

संपादन