क्रिकेट दिनविशेष
क्रिकेटच्या इतिहासातील लक्षवेधक घटनांची तारीखवार नोंद ह्या लेखात घेण्यात आलेली आहे.
जानेवारी
संपादनफेब्रुवारी
संपादनमार्च
संपादनएप्रिल
संपादनमे
संपादनजून
संपादनजुलै
संपादनऑगस्ट
संपादनसप्टेंबर
संपादनऑक्टोबर
संपादन९ ऑक्टोबर
संपादन- १९७६ - न्यू झीलंडच्या पीटर पेथ्रिकने पदार्पणाच्या कसोटीत त्रिक्रम साधला. ही घटना लाहोरात पाकिस्तान-न्यू झीलंड कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान घडली. पदार्पणात त्रिक्रम साधणारा पेथ्रिक हा केवळ दुसराच कसोटी गोलंदाज ठरला. त्याचे बळी होते - जावेद मियांदाद, वसिम राजा व इंतिखाब आलम. जावेद मियांदादसाठीही ही पदार्पणाची कसोटी होती आणि पेथ्रिकने बाद करण्यापूर्वी त्याने १६३ धावा काढल्या होत्या. पदार्पणाच्या डावातच शतक झळकाविणारा इबादुल्लानंतरचा तो दुसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला. [१]
- १९८७ - तत्कालीन मद्रासमधील एम. ए. चिदंबरम मैदानावर विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एका धावेने पराभव केला. विश्वचषक स्पर्धांमधील हा सर्वांत निसटता विजय होता आणि आहे. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असताना मनिंदर सिंगने दोन दुहेरी धावा काढल्या आणि षटकातील पाचव्या चेंडूवर स्टीव वॉने त्याला त्रिफळाबाद केले. डीन जोन्सने मारलेले दोन फटके षटकार असूनही नजरचुकीने चौकार दिले गेले, ही गोष्ट भारतीय कर्णधार कपिल देवने मध्यंतरादरम्यान खिलाडूवृत्तीने मान्य केली आणि भारताचे लक्ष्य दोन धावांनी वाढविण्यात आले, असे विज्डेन वार्षिकीने नमूद केले आहे. [२]
- १९९४ - ऑस्ट्रेलियाच्या डॅमिएन फ्लेमिंगने पदार्पणाच्या कसोटीत त्रिक्रम साधला. ही घटना रावळपिंडीत पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीदरम्यान घडली. पदार्पणात त्रिक्रम साधणारा पेथ्रिक हा केवळ तिसराच कसोटी गोलंदाज ठरला. त्याचे बळी होते - आमेर मलिक, इंझमाम-उल-हक व सलिम मलिक. [३]
१० ऑक्टोबर
संपादन- १९२२ - हॅरी केव्हचा जन्म.
- १९३६ - आर्टी डिकचा जन्म.
- १९४९ - लान्स केर्न्सचा जन्म.
११ ऑक्टोबर
संपादन- १९७२ - संजय बांगरचा जन्म.
१२ ऑक्टोबर
संपादन- १९४६ - अशोक मानकडचा जन्म.
१३ ऑक्टोबर
संपादन- १९६४ - फॅनी डिव्हिलियर्सचा जन्म.
१४ ऑक्टोबर
संपादन- १९७६ - तिलकरत्ने दिलशानचा जन्म.
नोव्हेंबर
संपादनडिसेंबर
संपादनसंदर्भ
संपादन- ^ या कसोटीचा धावफलक http://www.espncricinfo.com/pakistan/engine/match/63168.html
- ^ विज्डेन आल्मनॅक http://www.espncricinfo.com/wisdenalmanack/content/story/150630.html
- ^ या कसोटीचा धावफलक http://www.espncricinfo.com/australia/engine/match/63655.html