कोकण कपिला गाय
कोंकण कपिला हा शुद्ध भारतीय गोवंश असून मुख्यतः महाराष्ट्रातील कोंकण प्रांत, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात आढळतो.[२][३]
मूळ देश | भारत |
---|---|
आढळस्थान | ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर |
मानक | agris IS |
उपयोग | मशागतीचा गोवंश |
वैशिष्ट्य | |
वजन |
|
उंची |
|
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
डोके | मध्यम निमुळते, |
पाय | मध्यम काटक |
शेपटी | लांब, काळा शेपूट गोंडा |
तळटिपा | |
हा दुधदुभत्या साठी सुद्धा वापरला जातो[१] | |
|
शारीरिक रचना
संपादनकोंकण कपिला हा काटक आणि मध्यम आकाराचा गोवंश आहे. शरीराच्या तुलनेत मध्यम आकाराचे आणि निमुळते डोके असते. या गोवंशाचे डोळे काळे, कान मध्यम आकाराचे, सावध आणि टोकदार असतात. डोळ्याच्या बाजूने मध्यम आकाराची दोन काळी शिंगे असून, शिंग पाठीमागे वर जाऊन किंचित आत वाळलेली आणि टोकदार असतात. पाय काटक, मजबूत असून पर्वतीय क्षेत्रात फिरण्यासाठी अनुकूल असतात. पायाचे खुर मध्यम, गच्च आणि काळे असतात. या गोवंशाला शेपूट मध्यम लांब असून काळा शेपूट गोंडा असतो. तपकिरी काळा किंवा पांढरा भुरा आणि मिश्र रंगाचा गोवंश. लहान ते माध्यम आकाराचे वशिंड, चांगली रोगप्रतिकारक शक्ती. भातशेतीतील नांगरट, चिखलणी, ओढकाम त्याच बरोबरीने दुधासाठी चांगला गोवंश सरासरी प्रतिदिन २. ते ३ लिटर दूध उत्पादन. उष्ण, दमट आणि अति पावसाच्या प्रदेशात, डोंगराळ भागात चरून पोषण.
आढळस्थान
संपादनकोकणातील जिल्हे, पश्चिम घाट परिसर
वैशिष्ट्य
संपादनया गोवंशाची चाऱ्याची गरज माफक असून निगा राखण्याची सुद्धा फारशी आवश्यकता नाही. हा गोवंश मोकळा चरण्यासाठी सोडला असता काम भागते.[१] ही साधारण उंचीची, बुटकी जात असून शेतीकामासाठी उपयुक्त आहे. त्याच सोबत थोडी काळजी घेतली असता दुधाची गरज भागून जाते [१]
राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[४]
भारतीय गायीच्या इतर जाती
संपादनभारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या इतर विविध जाती
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
- Physical features, management and performance of Konkan cattle
- Konkan Kapila Cattle |Goa | Maharastra | India
संदर्भ
संपादन- ^ a b c "Konkan Kapila" (इंग्रजी भाषेत). 2021-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Konkan Kapila Cattle" (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Bajpai, Diti. "ये हैं भारत की देसी गाय की नस्लें, जिनके बारे में आप शायद ही जानते होंगे" (हिंदी भाषेत). 2020-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.